संविधानाची ७० वर्षे

           
   
           दोन वर्षे ११ महिने १८ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर २६ नोव्हेंबर १९४९ ला भारताच्या संविधान समितीने  संविधान तयार केले . आजच्या २६ नोव्हेंबर २०१९ ला या घटनेला ७० वर्षे पूर्ण होतील . कोणत्याही देशाच्या वाटचालीत त्या देशाचे संविधान अत्यंत महत्वाची भूमिका बजावते . देशाची प्रगती तेथील राजकीय परिस्थिती तेथील संविधानावर अवलूंबून असते . आपल्या भारताचा शेजारी असणाऱ्या नेपाळ या देशात संविधान निर्मितीच्या प्रक्रियेत झालेल्या गोंधळामुळे झालेली परिस्थिती आपण बघत आहोच . पाकिस्तानची सध्याची   परिस्थितीसुद्धा त्याचे पहिले  संविधान निर्मितीला लागलेल्या विलंबामुळे  (आज पाकिस्तानात ३ रे संविधांची अंमलबजावणी सुरु आहे ) निर्माण झालेली आपण बघत आहोत .  त्यामुळे भारतासारख्या विविधेतेनेने नटलेल्या देशाचे संविधान तयार करणाऱ्या सर्व कायदेपंडितांना या निमित्याने विनम्र अभिवादन .
          भारताचे संविधान तयार करताना घटना समितीमध्ये झालेली चर्चा उपलब्ध आहे . तुम्ही या ब्लॉगच्या शेवटी दिलेल्या लिंकवर क्लीककरून तुम्ही ही चर्चा बघू शकतात . मित्रानो आपल्या संविधानात सर्व गोष्ट सविस्तरपणे सांगितल्या आहेत , हे आपणस माहिती आहेच . मला आपले लक्ष वेधायचे आहे ते आपल्या संविधानात  राज्य आणि केंद्र सरकारचे अधिकार , कर्तव्य  या बाबत असलेल्या  कलमाबाबत उदाहरणार्थ भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची तरतूद  १२३ व्या कलमात आहे तर त्याची कार्बन कॉपी वाटावी अशी तरतूद राज्यांच्या उच्च न्यायालयात आहे . आणि त्याचा क्रमांक आहे . २१३ . अश्या अनेक तरतुदी आपल्या भारताच्या संविधात आहेत माझ्या  मते हे एक संविधानाचे वैशिष्ट आहे . आपल्या संविधान निर्मितीच्या वेळी झालेली चर्चा राज्यसभा या सरकारी वृत्तवाहिनीवर एका कार्यक्रमाअंतर्गत दाखवण्यात आली आहे . ज्यांना हा कार्यक्रम बघायचा आहे , त्यांना तो युट्युबवर उपलब्ध आहे . जिज्ञासूंनी तो बघावा .
          मित्रानो भारताच्या प्रशासनातील पाठीचा कणा असलेल्या प्रशासकीय सेवेचा संविधानात  स्पष्ट उल्लेख आहे .अशा प्रकारचा स्पष्ट उल्लेख असणारा  भारत जगातील  एकमेव देश आहे हे विशेष  मागास भागाला कायद्न्यवये विशेष तरतुदी करणारे कलम ३७१ सारखे कलम असणे , हे देखील भारतीय संविधानाचे एक वैशिष्ट म्हणता येईल .   भारताच्या संविधानातील अनेक तरतुदी या  १९३५ च्या  गव्हर्मेंट ऍक्ट १९३५ पासून
घेण्यात आलेल्या आहेत . या शिवाय जगातील अन्य संविधानाच्या भारतीय समाजमनाला उपयुक्त ठरतील अश्या तरतुदी घेण्यात आलेल्या आहेत . मात्र या सर्व तरतुदी निव्वळ कॉपी पेस्ट नसून यामध्ये आवश्यक ते बदल करण्यात आलेले आहे . तर अश्या भारतीय संविधानाला येत्या २६ नोव्हेंबरला ७० वर्षे पूर्ण झालेली आहे . त्यानिमित्याने समस्त भारतीयांना शुभेच्छा देऊन सध्या पुरतो थांबतो , नमस्कार .
        घटना समितीच्या सदस्यांमध्ये झालेली चर्चा वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
http://164.100.47.194/Loksabha/Debates/cadebadvsearch.aspx

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?