खाजगी रेल्वे विरुद्ध तोट्यातील सरकारी रेल्वे (भाग 1)

                         गेल्या काही दिवसांपासून दोन बातम्यांनी भारतीय रेल्वेविश्व अक्षरशः ढवळून निघाले . त्यापैकी एका बातमीवर रेल्वे कर्मचाऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटली . दुसऱ्या बातमीवर हा लेख लिहीत असताना तरी रेल्वे कर्मचाऱ्यांकडून अद्याप कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आल्याचे  वृत्त नाही . पहिली बातमी म्हणजे  150 खाजगी रेल्वे चालवण्याचा निर्णय होय ज्यावर रेल्वे कर्मचाऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटली आणि दुसरी म्हणजे गेल्या 10 वर्षात सर्वात जास्त तोटा रेल्वेला होण्याची बातमी . मित्रानो या  दोन्ही गोष्टी एकमेकांशी निगडित बाबी आहेत . आणि त्यांची बातमी पाठोपाठ येणे हे नक्कीच काळजी करण्यासारखे आहे .  मित्रानो ,  भारतीय रेल्वे जगातील सर्वात  मोठा रोजगार देणारा सार्वजनिक उपक्रम आहे . त्यामुळे या प्रश्नाकडे गांभीर्याने बघायलाच हवे .
                         मित्रानो भारतीय रेल्वेमध्ये भारतीय तीन प्रकारे भरती होऊ शकतो . पहिल्या प्रकारामध्ये  केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत होऊ शकतो केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत जी नागरी सेवा परीक्षा ( जी आपल्या महाराष्ट्रात यूपीएससीची परीक्षा म्हणून ओळखली जाते ) घेतली जाते .तिच्यात निवड झालेल्या उनेदवाराना ज्या 17 प्रकारच्या सेवांमधून एका सेवेमध्ये काम करण्याची संधी  मिळते . त्यामध्ये एक भारतीय रेल्वे सेवा  आहे . दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकारे भरती होण्यासाठी दोन वेगवेगळी मंडळे आहेत . हे येथे सांगण्याचे कारण म्हणजे माझ्या मते  रेल्वेला तोटा होण्यामागचे हे मोठे कारण आहे . केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या भरत्या आपण बाजूला ठेऊ क्षणभर . मात्र राहिलेय दोन मंडळाचा प्रश्न राहतोच माझ्या मते यामुळे यामुळे भरतीवर होणार आस्थापना खर्च वाढतो . ज्याचा फटका रेल्वेचा तोटा वाढण्यात होतो . .
 
      मित्रानो , रेल्वे कर्मचाऱ्याला मिळणाऱ्या सोइ सुविधा याचा पण एकदा विचार व्हाया . रेल्वे कर्मचाऱ्याला वर्षातून एकदा मोफत फिरण्याचा पास मिळतो त्याचप्रमाणे जर रेल्वे कर्मचाऱ्यांची मुलेमुली  जर परगावी
शिकण्यासाठी असतील  तर त्यांना मूळगावी येण्यासाठी प्रवासात सूट मिळते . त्याच  प्रमाणे एक तृतीयांश रक्कम भरून रेल्वे कर्मचाऱ्यांना वर्षातून तीनदा फिरायला जाता येते . विचार करा रेल्वेचा कर्मचाऱ्याचा संख्येचा विचार करता किती लोक या सोयीसवलतीचा उपयोग करत असेल . हा लेख लिहण्यासाठी ई इंटरनेटवर शोधले असता समजेल की रेल्वे  आमदार खासदार  खेळाडू अश्या 75प्रकारच्या व्यक्तिसमूहासाठी प्रवासात अत्यंत मोठ्या प्रमाणात सूट देते ज्याचा परिणाम रेल्वेचा एकंदरीत महसुलावर होतो , या प्रकारच्या गळत्या   थांबायलाच हव्या . मित्रानो या विषयी खूप काही बोलता येऊ शकते . मात्र तुम्ही पोस्टची वेळ बघत असलाच , रात्र खूप झालीये . त्यामुळे थांबतो . नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?