पाउले चालती हिंदू ग्रोथ रेटकडे

                    अमेरीकेतील एका चर्चेमध्ये राजशेखर नावाच्या अर्थतज्ञाने सन 1981मध्ये  भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भात एक  कल्पना मांडली होती . जी कालांतराने हिंदू ग्रोथ रेट या नावाने प्रचलीत झाली होती . त्याकाळी भारतीय अर्थव्यवस्था सर्वसाधरण साडेतीन टक्याचा गतीने वाढत असे . त्यालाच काहिसा हस्यास्पद रितीने सांगण्यासठी त्यांनी ही संकल्पना वापरली होती . ज्यामध्ये ज्या प्रकारे धर्म बदल सहजतेने स्विकारत नाही ,  त्याच प्रमाणे भारतीय अर्थव्यवस्था बदल स्विकारत नसल्याने ती खुप कमी गतीने वाढत असल्याचे सांगितले होते .पुढे  सन 1991च्या जूलै महिन्यात आर्थिक पातळीवर विलक्षण धक्का मिळाल्यावर यामध्ये झपाट्याने बदल झाले , आणि भारतीय अर्थव्यवस्था हिंदू ग्रोथ रेटच्या टप्यातून बाहेर येउन भारतीय अर्थव्यवस्था जगातील क्रमांक दोनची सर्वात वेगाने वढणारी अर्थव्यवस्था बनली
                              .हा सर्व इतिहास येथे सांगण्याचा हेतू हा आहे की गेल्या काही दिवसापासून भारतीय अर्थव्यवस्थेची  सूरु  असलेली घसरगुंडी आता ज्या पातळीवर येऊन ठेपली आहे . ती पातळी हिंदू ग्रोथ रेट म्हणून जी पातळी सांगितली जात असे त्या पातळी पर्यंत पोहोचली आहे .   मित्रांनो  त्या वेळेस आपल्या अर्थव्यवस्थेसमोर अनेक आव्हाने होती . त्यातील काही आव्हाने आपणास वरील व्यंगचित्रात दिसत आहे . त्यातील अनेक आव्हानांवर आपण नंतरच्या काळात विजय मिळवला असून देखील सध्याची परिस्थिती उद्द्भवली आहे . ही गोष्ट लक्षात घेणे अत्यावश्यक आहे . स्वर्गीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात बजेटरी डेफिसिट यावर नियंत्रण मिळवण्यासाठी संसदेने कायदा केला . ज्याची सध्या कोणाला आठवण देखील नसेल . त्याचा प्रमाणे बॅलन्स ऑफ पेमेंट साठी सुद्धा मनमोहनसिंग पंतप्रधान
असताना प्रयत्न झाले होते . जे कालांतराने बंद पडले .त्यामध्ये सातत्य टिकवणे आवश्यक होते . जे ना झाल्याने  आजची स्थिती उद्द्भवली असल्याचे मला वाटते . ज्या प्रमाणे हाताची पाची बोटे सारखी नसतात त्या प्रमाणे माझी मते आपणास पटणार नाहीत . आपल्या मतभेदाचे मी स्वागतच करेल . असो
                मित्रानो सन  1991साली देशात परकीय गांजाजली जेमतेम हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्याच दिवसाची शिल्लक होतो . त्यावेळीस भारतात खासगी क्षेत्रात फारशी उत्पादने बनत नव्हती . मात्र त्यावेस सुद्धा नव्हती इतकी बेरोजगारी आज 2019 साली आहे . त्यामुळे यातील गांभीर्य अजूनच वाढले आहे . सरकारी पातळीवर या परिस्थिती बदल करण्याचे कसोशीने प्रयत्न चालू आहेत . त्याला सकारात्मक फळ मिळेल अशी आशा व्यक्त करून सध्यापुरते थांबतो . नमस्कार . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?