काँफ्रेरन्स ऑफ पार्टीझ 25 (COP25 )च्या निमित्याने भारतीय जगत

   
                                                        गेल्या आठवड्यापासून युरोप खंडातील स्पेन या देशाच्या राजधानीत अर्थात मैड्रिड  मध्ये दरवर्षी डिसेंबर महिन्यात हवामान बदल या विषयावर होणारी काँफ्रेरन्स ऑफ
पार्टीझ(जीCOP या नावाने प्रसिद्ध आहे )  ही परिषद चालू आहे . यंदा या परिषदेचे  25 वे अधिवेशन चालू आहे सध्याच्या काळातील अत्यंत ज्वलंत आणि समस्त मानवी जातीसमोरील प्रश्न म्हणजे हवामान बदल होय . आपण भारतीयही बेमोसमी पाऊसाच्या ( 1जून ते 30सप्टेंबर हा कालावधी सोडून इतर वेळी पडणाऱ्या पावसाला शास्त्रीय भाषेत बेमोसमी आणि माध्यमांच्या भाषेत  अवकाळी म्हणतात )रूपाने  त्याचा अनुभव घेत आहोत . मात्र जगातील 193 देशांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा लोकसंख्येचा  , जगातील क्षेत्रफळाच्या तुलनेत सातव्या क्रमांकाचा , अर्थव्यवस्थेच्या बाबतीत 10 व्या क्रमांकाचा , जगातील पहिल्या पहिल्या क्रमांकाचा लोकशाहीप्रधान देशात,  लोकशाहीच्या 4स्तंभापैकी एक असणाऱ्या मध्यांमध्ये याची पुरेशी दखल घेण्यात आलेली नाही , असे माझे निरीक्षण आहे . तरी जेजे आपणाशी ठाव ते सकळांसी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जना या समर्थांच्या उक्तीनुसार आपणासमोर त्याची माहिती देत आहे , आणि त्यासाठीच आजचे लेखन .
                मित्रानो या परिषदेसाठी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षेतेखाली भारतचे शिष्टमंडळ गेलेले आहे . ही परिषद जरी स्पेन या देशात होत असली तरी ती दक्षिण अमेरिका खंडातील देश चिली या देशाच्या सरकारच्या अध्यक्षतेखाली होत आहे . हे अधिवेशन 2 ते 13डिसेंबर या कालावधीत होत आहे . पुढील वर्ष अर्थात 2020 हे पॅरिस येथील काँफ्रेरन्स ऑफ पार्टीझ (COP)च्या अधिवेशनामध्ये ठरवलेल्या गोष्टी अमलात आणावयाचे शेवटचे वर्ष आहे त्या दृष्टीने जगातील राष्ट्रांच्या कामगिरीचा आढावा घेण्याचे काम सुरु आहे . भारताची भूमिका शेती उदयॊगातून निर्माण होणारे ग्रीनहाऊस गॅसेस सध्यातरी कमी करता येणे अशक्य असल्याची आहे . क्योत्यो प्रोटोकॉल नुसार करावयाच्या कामामध्ये भारताचा समावेश सर्वात उत्तम काम करणाऱ्या पहिल्या 5देशांमध्ये करण्यात आला आहे .  विकसित देशांनी त्यांची जबाबदारी अधिक काळजीपूर्वक करावी अशी आग्रहाची मागणी यावेळी भारताकडून करण्यात येत आहे जगात प्रति व्यक्तीकडून होणाऱ्या पर्यावरणनीय हानीचा विचार करता ज्या देशातील नागरिकांच्या  यामध्ये पहिला क्रमांक लागेल असा युनाटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशाने आपला नेहमीचा आम्हीच करावं का ? प्रति व्यक्ती होणारी पर्यावरणाची हानी ना बघता देशाच्या कडून होणारी एकत्रित हानी बघा आणि भारतावर तसेच चीनवर बंधने टाका हा हेका चालूच ठेवला आहे . या विषयी खूप काही बोलण्यासारखे आहे मात्र तूर्तास इथेच थांबतो . नमस्कार . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?