अमेरिकी इराण संघर्ष (भाग 1)

                   सध्या समस्त जगाचा केंद्रबिंदू बनलेल्या इराण या देशाच्या सध्याच्या घडामोडीकडे बघताना आपणास आजपासून 40 वर्षांपूर्वी झालेल्या इराणी क्रांतीकडे दुर्लक्षून चालणार नाही . आपणास सध्याच्या अमेरिका आणि इराण या देशांच्या तणावाची पायांमुळे सन 1979 साली झालेल्या इराणी क्रांतीत सहजतेने सापडतात . तेव्हापासून सुरु असलेल्या अमेरिकाविरोधी कारवाईचा  आता वटवृक्ष झाला आहे . ज्याची फळे आपणस इंधन दरवाढीचा स्वरूपात सहन करावी लागू शकतात . त्यामुळे हा प्रश्न मुळात समजून घेणे अत्यावश्यक आहे . माझे आजचे लेखन त्यासाठीच .
     
       इराण आणि सभोवतालचा प्रदेश नैसर्गिक इंधनाच्या साठ्याने समृद्ध आहे . या साठ्यावर नियंत्रण मिळावे , यासाठी मुख्यतः अमेरिका आणि तिचे मित्र  देश विविध क्लृप्त्या लढवत असतात . देशातील शासक कितीही लोकोपयोगी कामे करत असला तरी त्याला सत्तेतून उठवणे , देशातील शासक लोकांवर कितीही अन्याय करत असला तरी त्यास मदत करणे , ही त्याची या सर्व प्रदेशासाठी नीती आहे . अफगाणिस्तानमधील तालिबान असो अथवा इराक  मधील सद्दाम  हुसेन , इजिप्त मधील गडाफी राजवट असो , ही सर्वच अमेरिकेची निर्मिती आहे .
    आता सध्याचा प्रश्नाकडे वळूया .सध्याचा प्रश्नाची  सुरवात होते . सन 1979 पासून .या प्रश्नाचे दोन भाग

आहेत . त्यातील पहिला भाग बघूया .  सन 1979 साली इराणमध्ये त्यावेळच्या इराणमधील धार्मिक नेता "रोहोम्मा खोमोनी " ज्यांना अयातुल्ला ही पदवी देण्यात आल्याने जे बहुतेकवेळा अयातुल्ला खोमोनी या नावाने ओळखले जातात , यांच्या नेतृत्वाखाली क्रांती झाली जी इराणियन क्रांती म्हणून ओळखली जाते .आणि इस्लामी पध्द्तीची राजवट सुरु झाली . ज्याचा पाया अमेरिका विरोध हा होता . तीला त्यावेळेस विरोध न
केल्याने सध्याची समस्या निर्माण झाली आहे .   सन 1979 पूर्वीचे इराणमधील सरकार अमेरिकाधार्जिणे होते .

मात्र त्या सरकारने राबवलेल्या सुधारणा या इराणमधील जनमताच्या विरोधात गेल्याने त्या सरकार विरोधात

असांतोष निर्माण झाला , त्या असंतोषाचा फायदा घेत अयातुल्ला खोमोनी यांनी घेत त्या वेळेचा इराणचा
सत्ताधीश वैद्यकीय उपचारासाठी अमेरिकेत गेला असता उठाव करत इरानियन क्रांती केली .
आता दुसरा भाग बघूया .  आपणच एकेकाळी इराकच्या सत्ताधीश -पदावर बसवलेला सद्दाम हुसेन आपले

ऐकत नाही हे लक्षात आल्यावर  इराककडे जग नष्ट करणारी शस्त्रे असा आरोप करत  अमेरिकेने सद्दाम हुसेन
यांची सत्ता  उलथवून लावत अमेरिकेन तेथील सत्ता ताब्यात घेतली .आणि शिया बहुसंख्य असलेल्या
इराकाविषयी दुसऱ्या शिया  बहुसंख्य असणाऱ्या  इराणमध्ये सहानभूती निर्माण झाली . त्यामुळे इराकमधून अमेरिका बाहेर जाऊन तो प्रदेश आपल्या ताब्यात यावा यासाठी इराणतर्फे कारवाया सुरु झाल्या . ज्याची
सध्याची परिणीती म्हणजे अमेरिकेच्या दूतावासावर झालेला हल्ला . ज्याचा वचपा काढण्यासाठी इराणच्या गैरलष्करी सशस्त्र दलाच्या प्रमुखाची अमेरिकेने केलेली हत्या . आणि त्यामुळे आखाती देशात पेटलेला वणवा  ज्याचा सामना आपण आपण इंधन दरवाढीने करत आहोत .
मित्रानो , हा खूप गुंतागुंतीचा विषय आहे . यामध्ये सौदी अरेबिया सारख्या अनेक राष्ट्रांचे हितसंबंध गुंतलेले आहेत त्या विषयी नंतर बोलतो , तूर्तास इथेच थांबतो , नमस्कार . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?