अजून किती बळी

     
   कालचीच गोष्ट आहे, सहज टिव्हीवरील बातम्या बघत होतो . पावसाचा बातम्या झाल्यावर बघीतलेल्या एका बातमीमुळे मन अक्षरशः विष्णण झाले . अभिनेता समीर शर्मा नावाच्या एका अभिनेत्याचा आत्महत्येची ती बातमी होती .
             मित्रांनो,सध्या समस्त भारतापुढील फारच महत्त्वाची समस्या कोणती असेल तर ती वाढत्या आत्महत्या होय . सुमारे दहा वर्षापुर्वी आलेल्या  थ्री इडीयट या चित्रपटात एका संवादात अमीर खानने भारतातील विद्यार्थ्यांचा आत्महत्येचा आलेख किती भयानक आहे, हे सांगितले आहे. त्यावेळच्या वृत्तपत्रातील  पहिल्या पानावरील मथळे आठवून बघा, विद्यार्थ्यांचा आत्यहत्येच्या आकड्यांनी ते सजलेले असायचे. मात्र त्यावर फारकाही झाल्याचे नंतर मला दिसले नाही .(माझे निरीक्षण परीपुर्ण आहे, असा माझा दावा नाही.) . शेतकऱ्यांचा आत्महत्येबाबत बोलताना कृषी  उत्पादकांना रास्त भाव मिळाला पाहिजे , याबाबत बोलले जाते , मात्र त्यांचा मानसिक आरोग्याबाबत चुपी साधली जाते . आज आपल्या भारतातील मानसिक आरोग्याची अवस्था अत्यंत वाईट आहे . जागतिक पातळीवर दर हजार लोकसंख्येमागे किमान किती मानसोपचार तज्ज्ञ असावेत याचे प्रमाण निश्चीत करण्यात आले आहे , ते आहे   आठ ते दहा हजर लोकसंख्येसाठी एक  . मात्र भारतात हे प्रमाण आहे  एक लाख लोकसंख्येसाठी एक  इतके . या आकड्यावरुन आपली याबाबची अनास्था लक्षात यावी .
        डिसेंबर 2019च्या शेवटच्या आठवड्यात  प्रसिद्ध झालेल्या इंडियन मेडिकल असोसिएनच्या अहवालानुसार भारतात मानसिक आरोग्याची अवस्था भीषण आहे. मात्र या अहवालावर काही कार्यवाही झाल्याचे मलातरी आढळले नाही . कोणाला आढळले असल्यास सांंगा . मला ते आवडेलच . 
                  माझ्या मते देशातील ढासळत जाणारे  मनाचे आरोग्य हा मुद्दा अधिक प्राधान्य क्रमाने घेयला हवा. जर देशातील लोकांचे मानसिक आरोग्य चांगले नसेल तर इतर सोयीसुविधांचा वापर कोण करणार ?  जर आता काहीच केले नाही, ज्या प्रमाणे भारत एडस् या आजाराबाबत भारत पहिल्या पाचात  असतो त्याप्रमाणे मानसिक अनारोग्याबाबत भारत पहिल्या पाचात आल्यास आश्चर्य वाटायला नको. भारतात मानसिक आरोग्याबाबत फारच कमी खर्च केला जातो .तो वाढवणे अत्यावश्यक आहे .
              त्याचप्रमाणे कठीण परीस्थितीत मनाचा तोल ढासळू न देण्यासाठी काय करावे,काय करु नये, याची माहिती देण्यासाठी विविध गैर सरकारी समाजसेवी संस्थांनी कार्यक्रम करावेत .मुक्या प्राण्यांचे हाल होवू नयेत म्हणून अनेक लोक अनेक NGO कार्यरत आहेत. मात्र आपल्या देशात मानसिक आरोग्याबाबत स्किझोफेनिया अवरनेस असोसिसेयन सारख्या हाताच्या बोटावर मोजता येतील , इतक्याच संस्था कार्यरत आहे, त्याही सर्व देशभरात पसरलेल्या आहेत असे नव्हे, या चित्रात बदल होणे आवश्यक आहे. तर आणि तरच भारताच्या महासत्तापदाला महत्त्व असेल . हे आपण विसरता कामा नये . आणि यासाठी युद्धपातळीवर काहीतरी करुन दाखवण्याची हीच वेळ आहे , यावेळेस आपण काही केले नाही, तर इतिहास आपणास माफ करणार नाही. हे त्रिकाल सत्य आहे . अर्थात अजूनही वेळ हातातून पुर्णपणे गेलेली नाही, अजूनही आपण काही केले तर परीस्थितीत नक्कीच सुखावणारा बदल होवू शकतो .ते करण्याची सुबुद्धी समाजाला येवो , अशी इश्वरचरणी मनोकामना करुन आपली सध्यापुरती रजा घेतो, नमस्कार  


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?