नव्या खंडाच्या प्रसवकळा

           
  मी अनेकदा चँनेल न्युज एशिया, एन एच के वर्ल्ड, सि एन एन आदि वृत्तवाहिन्यांच्या संकेतस्थळाला भेट देत असतो . अनेक नविन माहिती त्यामुळे होत असते. मी तीन चार दिवसापुर्वी अशीच भेट दिली असता बिबिसी वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावरील  विज्ञान विषयक विभागामध्ये दोन  नविन माहिती मिळाल्या.  त्यानंतर मी मराठी वृत्तवाहिन्यांवर सबंधित बातमी शोधण्याचा प्रयत्न केला असता, ती न मिळाल्याने आजचे लेखन त्या बातमीविषयी .पहिल्यांदा या संकेतस्थळावर त्या दोन बातम्यांमध्ये लेटेस्ट अपडेट असणारी बातमी बघूया .नंतर काहीसी जूनी असणारी बातमी बघूया .या दोन्हीच्या लिंक मी या लेखाच्या खाली दिलेल्या आहेत .
                 तर मित्रांनो आफ्रिका खंडाजवळ असणारी सोमालियन प्लेट ही आफ्रिकन प्लेटपासून दुर जात  इंडो आँस्टोलियन प्लेटकडे वेगाने सरकत असल्याने आफ्रिका खंडाचे दोन अथवा तीन भागात विभाजन होण्याची प्रक्रीया सुरु झाल्याची भुगर्भ शास्त्रज्ञांना खात्री पटल्याची ती बातमी होती .तसे बघायला गेले तर असे काही होत असेल याबाबत भुगर्भ शास्त्रज्ञांना सन 2016 पासून अंदाज होताच, मात्र त्याचे ठोस म्हणता येतील असे पुरावे मिळत नव्हते . जे आता मिळाले आहेत , या पुराव्यानुसार आजपासून 5ते 6कोटी वर्षानंतर पृथ्वीवर सध्या असणाऱ्या 7खंडामध्ये एका खंडाची भर पडेल .त्यावेळचे विद्यार्थी पृथ्वीवर आठ खंड असल्याचे शिकतील . आफ्रिका खंडाच्या इशान्य दिशेला असणाऱ्या  एथोपिया या देशाच्या इशान्य दिशेला असणाऱ्या आफ्रक या प्रदेशापासून ही तूकडे पडण्याची सुरवात झाली आहे.  ज्यामुळे या प्रदेशात मोठ्या प्रमाणात भुकंप येतील 
             . मित्रांनो आपल्यापैकी ज्यांचा भुगोलाशी जवळचा सबंध आला असेल, अश्या लोकांना वेगनर या भुगर्भ शास्त्रज्ञांची काँटिनेक्टल ड्रिफ्ट  थेअरी माहिती असेलच .त्या थेअरीत मांडलेल्या विचारानुसार ही प्रक्रीया होत आहे . याच थेअरीनुसार हिमालयीन प्रदेशात भविष्यात फार मोठे भुकंप येवू शकतात . ज्याला आपण काहीच तयार नाही ,हे ही आपण जाणतातच.असो .
आता दुसऱ्या बातमीकडे वळूया .
            मित्रांनो, आपणास द्वारका हे शहर पाण्यात बुडाल्याचे माहिती आहेच . मात्र त्याच प्रमाणे न्युझीलंड या देशाच्या सभोवताली असणारा बराच मोठा  भुभाग समुद्रात बुडाल्याचे देखील दिसून आले आहे .आँस्ट्रोलिया खंडाच्या अर्ध्या भुभागाएव्हढा हा भाग समुद्रात बुडाला  आहे, याचे स्पष्ट  पुरावे भुगर्भ शास्त्रज्ञांना मिळाले आहेत . भुगर्भ शास्त्रज्ञांनी या भागाला झिलेंडिया असे नाव दिले आहे . या समुद्रात बुडालेल्या भागाची प्राकृतीक रचना करण्याचे गेल्या दोन अडीच वर्षापासून सुरु होते . जे नुकतेच पुर्ण झाल्यावर याची अधिकृत घोषणा करण्यात आली . 
              मी भुगोल विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले असल्याने यातील अनेक मुलभुत संकल्पना मला चांगल्या प्रकारे माहिती आहेत  .मात्र ज्याला भूगोलाची काहीही पार्श्वभूमी नाही अस्या व्यक्तीला देखील समजेल अश्या प्रकारे मी हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे , जो तुम्हला आवडला असेल अशी मी अशा व्यक्त करतो . आणि सध्यापुरती आपली रजा घेतॊ नमस्कार 
आफ्रिका खंडाविषयीची लिंक 
नवीन भूभाग सापडला त्याची लिंक 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?