वेगाने विनाशाकडे !,

       

     मार्वो ,लॉरा,सँली ही नावे आहेत , गेल्या बारा दिवसात अमेरीका देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर आलेल्या चक्रीवादळांची . आँगस्ट महिन्यातील शेवटचा पंधरवाडा आणि सप्टेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात प्रत्येक आठवड्यात एक या हिशोबाने दक्षिण कोरीया प्रदेशात आलेल्या चक्रीवादळातून मानवजात सावरत असतानाच पुन्हा एकदा मानवजातीने निसर्गावर केलेल्या अत्याचाराचा प्रतिकार म्हणून निसर्ग काय करु शकतो, याची झलक म्हणून या चक्रीवादळांकडे बघू शकतो .
                            अमेरीकेत आलेली , मार्को, लाँरा, सँली सारखी चक्रीवादळे असो अथवा त्या आधी दक्षीण कोरीया प्रदेशात आलेली हैसेन, बावी, मायसर्क  ही चक्रीवादळे अधिक धोकादायक या श्रेणीमध्ये मोडणारी होती . मानवाने आपले सर्व मतभेद विसरुन पर्यावरणाचा प्रश्नावर एकत्र येणे आवश्यक असल्याचे सुचित करणारी ही चक्रीवादळे जरी अमेरीका आणि दक्षीण कोरीया या भारतापासून दुर असणाऱ्या प्रदेशात झाली आहेत, आपणाला काही घाबरण्याचे कारण नाही, असे याबाबत म्हणून चालणार नाही, आज आपण सुपात आणि ते जात्यात असले तरी यापुढील क्रमांक आपला आहे,  हे विसरुन चालणार नाही . आपण त्या दृष्टीने आताच तयारी करायला हवी .  
                         आपल्याकडे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या शेतीवर फार मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या अवलंबून आहे. आपल्या भारतातील मुंबई, सुरत, चेन्नई, कोलकाता, विशाखापट्टणम , विजायावाडा, पणजी आदी प्रमुख शहरे समुद्रकिनाऱ्यावर तरी आहेत, अथवा समुद्रापासून जवळ आहेत, तसेच वर उल्लेख केलेली शहरे भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची आहेत . सिएनएन, चँनेल न्युज एशिया या वृत्तवाहिन्यांवर ज्या प्रकारे चक्रीवादळाची दृश्ये दाखवली जात आहेत, ते बघता अमेरीका, दक्षिण कोरीया या सारखे विकसीत देशांनी देखील या चक्रीवादळापुढे हात टेकलेले आहेत .जर त्या तीव्रतेची आणि ते देश ज्या प्रकारे सातत्याने चक्रीवादळाचा सामना करत आहेत, ते बघता आपणाकडे तशी परिस्थिती आली तर काय दैना उडेल, याची कल्पनाच न केलेली बरी .
              सध्या आपल्या भारतात सुरु असणाऱ्या करोना रुग्ण वाढ तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नाने आताच आपण मेटाकुटीला आलो आहोत.त्यामध्ये हवामान बदलाचे संकट आपणास कधीच पैलवणार नाही . तरी सध्याचा काळातच वेगाने पाउल उचलणे आवश्यक आहे .आपण सर्वांनी बदलत्या पर्यावरणाशी कसे जूळवून घेता येईल याबाबत विचार करणे आवश्यक आहे . तो आपण करालच , असी आशा व्यक्त करून सध्यापुरतो थांबतो, नमस्कार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?