आखाती देशातील राजकारण नव्या वळणावर

             

           सध्या आपल्या भारतातील वृत्तवाहिन्या एका अभिनेत्याच्या मृत्यूबाबत नको एव्हढ्या तपशीलात वार्तांकन करत असताना, जगातील स्फोटक प्रदेशांपैकी एक असणाऱ्या आखाती देशात काहीसे सकारात्मक राजकारण घडत आहे. दुर्देवाने जगाच्या राजकाराला प्रचंड प्रमाणात बदलणाऱ्या या घटनेविषयी मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये फारच कमी माहिती देण्यात येत आहे . ती उणीव भरुन काढण्यासाठी आजचे लेखन.
                  तर मित्रांनो, जे आखाती देश  एकेकाळी आम्ही गवत खावून जगू, मात्र इस्राइलचे अस्तिव या पृथ्वीवरुन नष्ट करु, अशी वल्गना करायचे,  आपली एकत्र मोट बांधून 1948,1956, तसेच 1967 असे तिनदा ज्या  राष्ट्राला बेचिराख करण्यासाठी युद्ध केले, त्या इस्राइलबरोबर आपले राजनैतिक सबंध प्रस्थापित करत आहेत . हा मजकूर लिहित असताना (16 सप्टेंबर 2020) गेल्या दोन महिन्यात इस्राईलबरोबर युनाटेड अरब अमिरात (UAE),जाँडन आणि बहारीन या देशांनी आपले राजनैतिक सबंध प्रस्थापित केले आहेत . इजिप्त या देशाने या आधीच आपले राजनैतिक सबंध प्रस्थापित केले आहेत, त्या अर्थाने चार आखाती देशाने इस्राइलला मान्यता दिली आहे. 
                   गेल्या दिड ते दोन महिन्यापुर्वी युनाटेड अरब आमिरात या देशाने इस्राइलबरोबर इब्राहिम अकाँर्ड हा शांततेचा करार केला . इस्राईलचा प्रमुख धर्म असलेल्या ज्युधर्म आणि युनाटेड अरब अमिरात चा प्रमुख धर्म असणाऱ्या इस्लाम धर्म या दोन्ही धर्मात शांतीदूत म्हणून ईब्राहिम या देवतेचा उल्लेख आहे , त्याचाच संदर्भ घेत या शांती कराराला इब्राहीम या देवतेचे नाव देण्यात आले आहे . हा करार झाला त्याच्या नंतर 4 ते 5 दिवसात जाँँडन हा या करारात सहभागी झाला , तर या करारामध्ये 15सप्टेंबर रोजी बहारीन हा देश सहभागी झाला .आणि मध्यपुर्व देशांमध्ये शांततेचे नवे पर्व सुरु होण्याची आशा निर्माण झाली .

                     या करारा संदर्भात जगभरात विविध प्रतिक्रीया उमटत आहे. आखाती देशामध्ये प्रमुख देशांमध्ये गणना होत  असलेल्या सौदी अबेरीया या देशाने या बाबत या लेख लिहीत असेपर्यत काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. हा लेख लिहीत असताना याविषयी भारताची भुमिका इस्राइल आणि युनाटेड अरब अमिराती हे दोन्ही देश  भारताचे मित्र देश आहेत, त्यातील मित्रतेचे आम्ही स्वागतच करतो असी आहे .पाकिस्तानने मात्र  युनाटेड अरब अमिरात ने इस्राईलशी करार केला, त्याच दिवशी आम्ही या करारात सहभागी होणार नाही, जर आम्ही या करारात सहभागी झालो तर आमच्या काश्मीरविषयक दावा अडचणीत येइल अशी भुमिका जाहिर केली .
                           इस्राइल आणि अरब राष्ट्रे यांचा संघर्षाला रक्तलांच्छीत इतिहास आहे . या प्रश्नावरुन इस्राइल आणि अरब राष्ट्रे यांच्यांत 3 युद्धे झाली आहेत. या तिन्ही युद्धात इस्राइलच विजयी झाले .1972 सप्टेंबर 5 ला पश्चिम जर्मनी येथील म्युनिच येथे भरलेल्या आँल्मपिंंकमध्ये पँलेस्टाईन अतिरेक्यांनी 11इस्राइली खेळांडूची हत्या केली होती . इस्राईलने पँलेस्टाइन या देशात विविध वेळी केलेल्या हल्यात हजारो निरपराध पँलेस्टाइनचे नागरीक मृत्युमुखी पडलेले आहेत. त्या पार्श्वभुमीवर या सर्व बाबींकडे बघायला हवे .
ही घटना 1948 सप्टेंबर मध्ये युनाटेड किंंग्डम या देशाने त्यांचा ताब्यातील पँलेस्टाइन या वसाहतीला स्वातंत्र्य देताना केलेल्या गुत्यांची सोडवणूक म्हणून बघता येणार नसले तरी आखाती देशातील तणाव यामुळे नक्कीच कमी होणार यात शंका नसावी .  पहिल्या महायुद्धात आँटोमन साम्राजातील हा प्रदेश युनाटेड किंग्डमचा ताब्यात आला . त्यावेळी येथे ज्युधर्मीय लोकांचे राष्ट्र तयार करण्यात येईल, असे आश्वासन ब्रिटीशांनी ज्यू धर्मीयांना दिले .सप्टेंबर 1948 ला पँलेस्टाईनला स्वातंत्र्य देताना तेथील अरबांना विश्वासात न घेता  इस्राइलची एकतर्फा निर्मिती केली आणि एका संघर्षाला सुरवत झाली , ज्यातील एक महत्त्वाची घटना म्हणून याकडे बघता येईल .
         ही घडामोड सध्या वेगाने विधिध वळणावर जात आहे, तिची वाटचाल वेळोवेळी आपणापर्यत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असेलच, तूर्तास इतकेच, नमस्कार  
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?