भारत बांगलादेश मैत्री नव्याने उमलताना


     बांगलादेश, दक्षिण आशियातील असा देश जो ज्याची आपल्या भारताबरोबर सर्वाधिक लांबीची सीमा आहे , ज्या देशातील 8 प्रशासकीय विभागापैकी 6 प्रशासकीय विभागात आपणास जमिनीवरून चालत जाता येते . तर एका प्रशासकीय विभागता आपण समुद्रमार्गे सहजतेने जाऊ शकतो . ज्या देशाची अधिकृत भाषा आपल्या एका राज्यची देखील राज्यभाषा आहे . तसेच ज्याच्या आर्थिक क्षमतेबाबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिलेल्या एका अहवालामुळे भारताची आणि बांगलादेशच्या आर्थिक आर्थिक क्षमतेविषयी विविध चर्चाना भारतात सुरवात झाली  तर अश्या बांगलादेशाबरोबर आपल्या भारताचे सहकाऱ्यांचे नवे पर्व सुरु झाले आहे .आपल्या भारताच्या एका कोपऱ्यात असणाऱ्या ईशान्य भारताच्या विकासासठी तसेच आंतराष्ट्रीय पातळीवर भारताची ताकद वाढवण्याबरोबरच स्वविकासात देखील बांगलादेश भारताला मदत करत आहे आणि स्वतःचा विकास देखील करत आहे . मराठी माध्यमात या विषयी अत्यंत कमी बोलले गेल्याने जे जे आपणासी ठाव ते ते सकळांसी सांगावे , शहाणे करून सोडावे सकल जण या समर्थांच्या उक्तीनुसार या विषयी माहिती देण्यासाठी आजचे लेखन  सर्वप्रथम भारतचे आंतरराष्ट्रीय संबंधात महत्व वाढवणारी बांगलादेशासी संबंधित गोष्ट बघूया     

मित्रानो , आपला पाकीस्तानपेक्षा धोकादायक शत्रू असणारा चीन गेल्या काही वर्षांपासून भारताच्या सभोवताली असणाऱ्या देशांना विविध प्रकारे मदत करून, त्या देशांमध्ये विविध विकास प्रकल्प उभारून त्यांच्याभोवती आपला फास गुंडाळीत आहे. याच मालिकेत त्याने श्रीलंकेतील हंबनपोट्टा हे बंदर विकसित केले . मात्र हंबनपोट्टा हे बंदर विकसित करताना चीनने छुप्या पद्धतीने लादलेल्या अटी पूर्ण न करता आल्यान श्रीलंकेला हंबनपोट्टा हे बंदर  99 वर्षासाठी चीनला वापरण्यास देणे भाग पडले आहे .श्रीलंकेतील हंबनपोट्टा बंदराप्रमाणेच बांगलादेशातील सोनाडीया हे बंदर विकसित करण्यासाठी चीन प्रयत्नशील होता . त्यासाठी चीन सन 2006 पासून बांगलादेशाबरोबर विविध पातळीवर बोलणी करत होता . मात्र बांगलादेश चीनला या बाबत होकार अथवा नकार कळवत नव्हता . मात्र दिनांक  4  ऑक्टोबर 2020 रोजी बांगलादेशने चीनला या बाबत पूर्णतः नकार कळवला . आता हे बंदर भारताचा मित्र देश ज्या बरोबर भारतातील  सुद्धा विविध विकास कामे चालू आहेत , असा जपान हा देश आता हे बंदर विकसित करणार आहे . सध्या भारत आणि बांगलादेश यांच्यात जलमार्गाने मालवाहतूक वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे . त्याला चीनच्या बंदर विकासामुळे काही प्रमाणात अडचण झाली असती . चीनला ही एक प्रकारची चपराकच म्हणायला हवी . हे बंदर बांगलादेशच्या 8 प्रशासकीय विभागापैकी चितगाव या प्रशासकीय विभागात येते . या विभागात सोनाडीया   हे एक बेट आहे . बांगलादेशाच्या मुख्य भूमीपासून जवळच असणाऱ्या या ठिकणी मोठे जहाज येऊ शकतील अश्या प्रकारचे बंदर (DEEP SEA PORT ) उभारणे सहज शक्य आहे . अश्या ठिकाणी बंदर उभारल्यास बांगलादेशातील महत्त्वाचे बंदर असलेल्या चितगावावरील सध्या येणारा अतिरिक्त भर कमी होईल .हे जाणून बांगलादेश या ठिकाणी बंदर उभारण्यास उत्सुक होता . जी संधी चीन घेऊ इच्छित होता . याला भूगोलाच्या 2 प्रमुख शाखांपैकी एक  असणाऱ्या मानवी भूगोलाच्या राजकीय भूगोल या उपशाखेतील स्ट्रिंग ऑफ प्लस या सिध्न्तांनुसार केलेली कृती असे म्हणतात .

भारताच्या विकासात बांगलादेशचे योगदान देखील  सध्या अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढत आहे   भारताचा विचार केला असता काहीश्या बाजूला असणाऱ्या ईशान्य भारताचा भारताचा इतर भागाशी अधिक प्रमाणात संपर्क यावा , ज्यामुळे भारताची एकत्मकता अधिक प्रमाणत वाढीस लागेल या हेतूने अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत . ज्याचामध्ये भारताचा महत्तवाचा साथीदार म्हणून बांगलादेश महत्तवाची भुमिका बजावत आहे. 

तर मित्रांनोगेल्या महिन्याभरात ईशान्य भारताशी जलद संपर्क व्हावा या हेतून बांगलादेशाबरोबर 2  कामांचा शुभारंभ करण्यात आला, आणि एका कामासंदर्भात  काही महत्व्वाचे करार करण्यात आले . ज्या कामाच्या शुभारंभ करण्यात आला ती कामे बांगलादेशाबरोबर जलवाहतुकीद्वारे संपर्क साधून त्याद्वारे ईशान्य भारतात विविध सामानाची नेआण करण्या संदर्भात आहे . ज्यामध्ये समुद्री मार्गाबरोबर बांगलादेशातील नद्यांचा वापर करत ईशान्य भारतापर्यंत पोहोचण्याचा उपाय योजनांचा समावेश आहे . ज्या कामासंदर्भात करार करण्यात आले त्यामध्ये भारतातून बांग्लादेशात जाणाऱ्या तीन नवीन रेल्वे मार्गाची निर्मिती हे प्रमुख काम आहे . आता प्रत्येक काम विस्ताराने बघूया .

पहिले रेल्वेलाईन विषयी बोलूया तर मित्रानो भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारत आणि त्यावेळच्या पूर्व पाकिस्तान  या दरम्यान 7 रेल्वेलाईन होत्या . ज्या कालांतराने बंद करण्यात आल्या . बांगलादेशला पाकिस्तान  पासून स्वतंत्र मिळाल्यावर त्यातील 4 रेल्वेरूट पुन्हा सुरु करण्यात आले . जे आहेत गेंडे (भारत ) ते दर्शन (बांगलादेश ), पेट्रापोले (भारत )ते बेनपावलो (बांगलादेश ) सिंघबाड (भारत ) ते रोहनपूर आणि राधिकापूर (भारत )ते बर्नोल (बांगलादेश ) मात्र ईशान्य भारताशी चिकन नेक चा जेमतेम 65 किमी रुंद असणाऱ्या बांग्लादेश, नेपाळ  भूतान या तीन देशांनी वेढला गेलेल्या चीनच्या सीमारेषेपासून जवळ असणाऱ्या भागात दुर्दैवाने काही अडथळा आल्यास आपल्या भारताचा 2.5%  भूभाग असणाऱ्या ईशान्य भारताचा मूळ भूभागाशी असणारा संपर्क तुटू नये यासाठी बांगलादेशाची मदत घेण्याचे केंद्र सरकारने ठरवले आणि भारत बांगलादेश या दरम्यान .चार    रेल्वे लाईन नव्याने प्रस्तावित करण्यात आल्या ज्या आहेत हल्लिडाबरी (भारत ) ते छिल्लरी (बांगलादेश ), शहाबाझार (भारत )  ते महिशासन (बांगलादेश ) आणि आगारतला  (भारत ) ते अखूरा (बांगलादेश ) तसेच कोलकाता   (भारत ) ते राजशाही  (बांगलादेश )  यातील आगारतला  (भारत ) ते अखूरा (बांगलादेश )  या रेल्वेलाइनचे काम गेल्या काही वर्षापसून सुरु आहे . मात्र या पंधरा किमीच्या अंतरातील बंगलादेशाच्या हद्दीतील दहा किमीसाठी बांगलादेशला जमीन अधिग्रहणात काही  काम थांबले होते  तर नव्या तीन  मार्गांना मंजुरी देण्यात आली आहे .आता बोलूया जलमार्गाविषयी .जलमार्गाविषयी बोलताना प्रथम बोलूया समुद्रातून जाणाऱ्या मार्गाविषयी 

तर बांगलादेश पाकिस्तानपासून स्वतंत्र झाल्यावर दुसऱ्याच वर्षी म्हणजेच 1972 त्या वेळच्या दोन्ही सरकारने दोन्ही देशाच्या विशिष्ट बंदरावरून विशिषष्ट मार्गाने जलवाहतूक सूर करण्याविषयी प्राथमिक बोलणी झाली होती  मात्र त्यावर पुढे काही कार्यवाही झाली नाही सन 2010 बांगलादेशने त्यांचे चित्तगाव आणि मंगलो या  दोन \बंदरासाठी   transit  agreement भारताबरोबर केले सन  2015 यासाठी MOU करण्यात आले यासाठीच करार 2018 केल्यावर काही बाबींची पूर्तता 2019 केल्यावर आता जुलै महिन्यात भारताकडून पहिल्यांदा यामार्गे ईशान्य भारतात माल पाठवण्यात आला 2020 च्या मी महिन्यात यामध्ये भारताकडून मूळ प्रस्तवात बदल करण्यात आला ज्यामुळे सध्या या मध्ये 10मार्ग आणि  11 बंदराचा समावेश करण्यात आला आहे . या पहिल्या मालवाहतुकीद्वारा  भारताच्या  कोलकाताच्या बंदरातून  बांगलादेशातील चित्तगाँव आणि मंगलो या बंदरात माल पाठवण्यता आला तिथून बांगलादेशातील अखूरा या शहरातून भारतातील आगारताला या शहारत तर तमाबाईल या बांगलादेश मधील गावामधून  भारतातील दावकी आणि सुतारमाला या भारतातील गावात शेईला या बांगलादेश मधील गावामधून आणि बांगलादेशमधील बिरबीरबझार या गावातून भारतातील श्रीमंतपूर या शहरात रेल्वे जलवाहतूक आणि रस्ते रस्ते मार्गे माल पोहोचवण्यात आला

आता बोलूया बांगलादेशच्या नद्यांतून होणाऱ्या मालवाहतुकीविषयी

तर मे 2020 केलेल्या करारानुसार बांगलादेष्टील दौंडीकंडी या जिल्ह्यातून भारताच्या त्रिपुरा राज्यातील सोनमुरा या शहरापर्यंत गुमती या नदीमार्फत जलवाहतूक करता येणार आहे .

मित्रानो या नव्या रेल्वे आणि जल वाहतुकीच्या मार्गामुळे बांगलादेशातील वाहतूक व्यवस्थेचा  दर्जा सुधारणार आहे .ईशान्य भारताशी इतर भारताच्या संपर्क करण्याचे नवे मार्ग अस्तित्वात  येणार आहे तसेच यामुळे बांगलादेशला काही प्रमाणत धन संचय देखील करता येऊ शकतो . ज्यामुळे भारत आणि बांगलादेश या दोन्हीचा फायदा होईल . भारताच्या शेजारी एक मित्र देश तयार होईल त्यामुळे आपण या नव्या मार्गाचे स्वागतच करायला हवे .


बांगलादेशाच्या विकासात देखील भारताचे योगदान आहे . आता ते बघूया 

भारतीय रेल्वेने 27 जूलैला भारतीय रेल्वेसाठी जून्या तंत्रज्ञानावर आधारीत, ज्यांचे वापरण्याचे आयुष्य जवळपास संपल्यात जमा आहे, आणि जे सध्याचा भारतीय रेल्वेच्या संपुर्ण विद्युतीकरण करण्याचा मार्गात अडथळा ठरू शकतील अशी  'WDM 3D' या सिरीजची 10इंजिने बांगलादेश रेल्वेला दिली . ही सर्व रेल्वे इंजिने ब्राडगेज प्रकारची डिझेलवर चालणारी होती . या इंजिनाखेरीज डिझेलवर चालणारी मिटरगेज प्रकारची 10 डिझेल इंजिने बांगलादेशला भारताकडून हवी होती . मात्र या प्रकारची रेल्वे इंजिन भारताकडे उपलब्ध नसल्याने भारत ती बांगलादेशाला देवू शकला नाही . सध्या बांगलादेश रेल्वेला डिझेलवर चालणाऱ्या रेल्वे इंजिनांची नितांत आवश्यकता आहे.तसेच भारतात सर्वत्र विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरु असल्याने डिझेल इंजिन ही भारतासाठी एक प्रकारची अडचणच आहेत. यागोष्टीचा फायदा उचलत हा व्यवहार झाला. .ही रेल्वे इंजिने भारतात 110किमी प्रती तास चालवता येवू शकत होती . मात्र बांगलादेशातील रेल्वे रुळांची स्थिती बघता ही इंजिने तिथे 50ते 60किमी प्रती तास या वेगानेच चालवावी लागतील .परीणामी हळू चालवल्या गेल्यामुळे त्यांचे वापरण्याचे आयुष्य वाढेल, आणि भारतीय रेल्वेसाठी निरोपयोगी ठरत असणाऱ्या या रेल्वे इंजिनांमुळे बांगलादेश रेल्वेला मदत होत असल्याने बांगलादेश वांसीयाचे आशिर्वाद  भारतीय रेल्वेला मिळतील 

आपले संबंध अधिक दृढ व्हावे या हेतूने नुकतेच बांग्लादेशच्या नौदलाबरोबर भारतीय नौदलाने सयुक्त युद्ध सरावाचा कवायती देखील करण्यात आल्या होत्या . बोनगोसागर या नावाने झालेल्या  झालेल्या या सरावातर  सीमाक्षेत्र इव्हिओलूशन ., सर्फेस वॉ जहाज असते रफेस ड्रिल्स, तसेच हेलिकॉप्टर एक्शरसाईझ  या प्रकारचा युद्ध सराव करण्यात आला . बंगालचा उपसागराच्यादहा  उत्तर भागात झालेल्या या युद्ध सरावात   भारतातर्फे INS किल्डन आणि INS खुकरी  या नावाच्या  युद्ध करणाऱ्या  जहाजांनी सहभाग नोंदवला , तर   बांगलादेशातर्फे अबू बकर  आणि प्रोट्रॉय या नावाच्या  युद्ध करणाऱ्या  जहाजांनी सहभाग नोंदवला. भारतातर्फे सहभाग नोंदवलेल्या युद्ध जहाजांपैकी INSकिल्डन हे जहाज अँटी सबमरीन वॉर फेअर कॉरवेट या प्रकारातील होते (कॉरवेट  म्हणजे आकारणे अत्यंत लहान मात्र युद्द करण्यासाठीचे साहित्य असणारे परिपूर्ण असे जहाज असते . तर INS कुकरी भारताने स्वतः बांधलेली क्षेपणास्त्र डागू शकणारे कॉरवेट प्रकारचे जहाज होते . बांगलादेशाकडून सहभाग नोंदवलेल्या जहाजांपैकी  अबू बकर हे जहाज फ्रिगेट प्रकारचे जहाज होते ( फ्रिगेटचा आकार कॉरवेट चा तुलनेने बऱ्यापैकी मोठा असतो . ) तर प्रोट्रॉय हे  सुद्धा कॉरवेट  प्रकारातील जहाज होतेअबू बकर हे जहाज फ्रिगेट प्रकारचे जहाज होते ( फ्रिगेटचा आकार कॉरवेट चा तुलनेने बऱ्यापैकी मोठा असतो . ) तर प्रोट्रॉय हे  सुद्धा कॉरवेट  प्रकारातील जहाज होते .



तर मित्रानो ज्या बांगलादेशाबरोबर ईशान्य भारताच्या विकासासाठी भारताचे अनेक प्रकल्प सुरु आहेत त्या बांग्लादेशाबरोबर आपले काही मतभेद गेल्या काही दिवसात झाले . त्या विषयी आता बोलूया . कांदा या पिकावरून भारताचे आणि बांगलादेशाबरोबर संबंध काहीसे तणावपूर्ण बनले आहेत . भारतीय कांद्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील  सर्वात मोठा ग्राहक  हा बांगलादेश आहे . हे पण लक्षात घेयला हवे तर बुधवार दिनांक 2020 सप्टेंबर 16रोजी  बांगलादेशचे परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री शह्ररिअर आलम (Shahriar Alam )  यांनी तीव्र शब्दात या बंदीबाबत नापसंती दाखवली .बांगलादेशने या आधीच तुर्कस्तान आणि इजिप्त या देशातून कांदा आयात करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे  ऑक्टोबर च्या पहिल्या आठवड्यात तेथून जहाजे येतील असेही त्यांनी ढाका येथील पत्रकार परिषदेत सांगितले

2019 ऑक्टोबर महिन्यात देखील बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या भारत दोऱ्यावर आलेल्या असताना देखील कांद्याचा भारतीय राजकारणात वापर होतो ज्याचा बांगलादेशाला त्रास होतो . जर हे असेच चालू राहिले तर बांगलादेशला वेगळा विचार करावा लागेल असेही त्यांनी  आपल्या हिंदी भाषेतील भाषणात सुनावले होते . गुरुवारी देखील बांगलादेशाचे भारतातील हाय कमिशनर मोहमदद इम्रान यांनी भारताच्या परराष्ट्र खात्याला या बाबत डिप्लोमॅटिक नोट पाठवली आहे . ज्यांना एखाद्या देशाचे आंतरराष्ट्रीय सबंध कसे असतात हे माहिती असतात त्यांना यातील गांभीर्य लक्षात येईल .पुढे असणाऱ्या सणाचा पार्श्वभूमीवर भारतात अत्यंत लोकप्रिय असणाऱ्या हिल्सा माश्याची 1457 टन निर्यात भारताला करण्याची तयारी बांगलादेश करत असताना भारताने हि निर्यात थांबवल्याने बांगलादेश भारतावर काहीशा नाराज आहे .

बांगलादेश ज्या देशातून कांदा आयता करू इच्छितो त्या इजिप्त आणि तुर्कस्तान पैकी,  तुर्कस्तान या देशाची काश्मीर विषयक भूमिका पाकिस्तानच्या भूमिकेशी जवळीक साधणारी आहे . ही बाब दुर्लक्षून चालणार नाही

मात्र या एक्या मुद्याकडे दुर्लक्ष केल्यास भारत आणि बांगलादेश मैत्री नव्याने उमलत आहे असे म्हंटले तर वावगे ठरू नये . यातील बदल मी सातत्याने आपणास सांगेलच , तूर्तास इतकेच , नमस्कार 

 

                   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?