बांगलादेश दक्षिण आशियातील आर्थिक महासत्ता ?


बांगलादेश, दक्षिण आशियातील एक असा देश, ज्या देशातून भारतात येणाऱ्या लोकांच्या संख्येवर एकेकाळी येथील राजकीय पक्षांचे राजकारण भरभराटीस आले. ज्याला पाकिस्तानपासून वेगळे करून भारताने पाकिस्तानचे आर्थिक विश्व जवळपास नष्ट केले(सन 1947 ते 1971 पर्यत पाकिस्तानने जी जलद आर्थिक प्रगती केली, त्यात खुप मोठा वाटा त्यावेळच्या पुर्व पाकिस्तानातून आलेल्या समृद्धीचा होता. कराची सोडून इस्लामाबाद म्हणून नवी राजधानी तत्कालीन पुर्व पाकिस्तान च्या पैसामुळेच करु शकला .हे जगजाहिर आहेच) ज्या बरोबर भारत आपल्या इशान्य भारताचा विकास करण्यासाठी सयुंक्त प्रयत्न करत आहे. तर अशा बांगला देश नुकताच एका कारणामुळे विशेष चर्चेत आला , ते म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF )भारताच्या आणि बांगलादेशाच्या आर्थिक स्थितीबाबत केलेले विधान
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानूसार एका आर्थिक वर्षात देशात उत्पादित झालेल्या सर्व वस्तूंचे आंतीम एकत्रीत मुल्य ( कच्या मालाची किंमत नाही म्हणजेच उसापासून साखर तयार केली तर साखरेची किंमत उसाची किंमत नाही) अर्थात जिडिपी आणि लोकसंख्या यांचे गुण्णोत्तर म्हणजेच जिडिपी पर कँपिटलचा विचार करता या आर्थिक वर्षात  भारतापेक्षा बांगलादेश 11 अमेरीकी डाँलर ने पुढे आहे. डिसेंबर 1971 मध्ये स्वतंत्र्य झाल्यावर या आधी सन1982 आणि 1991 मध्ये बांगलादेशने जिडिपी पर कँपिटाचा विचार करता मागे टाकले होते. 

जिडिपी मोजण्यचा एकदंरीत तीन पद्धती आहेत, जिडिपीचे एकुण मुल्य , जिडीपी वाढण्याचा दर आणि जिडिपी आणि लोकसंख्येचे गुण्णोत्तर. यातील फक्त जिडीपी आणि लोकसंख्येचे गुण्णोत्तर यापैकी जिडिपी आणि लोकसंख्येचे गुण्णोत्तर यामध्येच बांगलादेशने आपल्याला मागे टाकले आहे. अन्य दोन्हींमध्ये नाही , हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
भारताच्या पिझेहाटीला प्रमुख कारणांचा वेग घेतला असता , आपणास लक्षात येते की गेल्या चार ते पाच वर्षात भारताच्या लोकसंख्या वाढीचा वेगापेक्षा बांगलादेशचा लोकसंख्या वाढीचा वेग कमी आहे . परीणामी त्यांचा जिडिपी पर कँपिटा वाढला .
उदाहरणार्थ एका क्ष देशाचा  जिडिपी 200 आहे. तसेच त्या देशाची लोकसंख्या 20 आहे त्यामुळे त्याचा पर कँपिटा झाला 200 भागिले 20 बरोबर 10. या उलट य देशाची लोकसंख्या 5 आहे ,आणि त्यांचा जिडिपी 100 आहे , त्यामुळे  य देशाचा जिडिपी पर कँपिटा झाला 100भागिले 5 बरोबर 20 अर्थात अश्या स्थितित क्ष देशापेक्षा य देश उत्तम म्हणणे कसे ठरेल? तसेच बांगलादेश आता जो भारताचा पुढे आहे?  त्याबाबत म्हणावे लागेल. बांगलादेशमध्ये भारताएव्हढे कडक लाँकडाउन नसल्याने आणि बांगलादेशातील प्रमुख उद्योग असलेला कपडा उद्योगाचा वाढीचा दर काही वर्षापासून 15 टक्याच्या आसपास असल्याने आजची स्थिती आहे. मात्र ही स्थिती तात्कालीक आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. कायम वर्गात पहिला क्रमांक विद्यार्थ्यापेक्षा , वर्गात जेमतेम पास होणाऱ्या विद्यार्थ्याला एका चाचणी परीक्षेत काही कारणाने जास्त गुण मिळाले म्हणून हुशार विद्यार्थी खच्चून जात नाही, हे अगदी तसेच आहे.

मात्र बांगलादेश हा भारतापेक्षा कमीच आहे, असे समजण्याचे कारण नाही. आर्थिक ताकद सोडून दिल्यास , महिलांची स्थिती, घर ,खाद्यपदार्थ आदी मुलभुत सोईसुविधांची स्थिती अश्या गोष्टीमध्ये बांगलादेश भारताचा कैक पटीने पुढे आहे, हे मान्य करावेच लागेल. अर्थशास्त्र हा अत्यंत किचकट विषय आहे. तो मी सोप्या भाषेत आपणापर्यत पोहचवण्याचा केलेला हा प्रयत्न आपणास आवडला असेल , असे मानूण सध्यापुरते थांबतो, नमस्कार.    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?