अमेरिका जगातील एक क्रमांकाची घाण


     सध्या जगात काय चालू आहे? याचा आढावा घेतल्यास फ्रान्समधील घडामोडी या प्रमुखतेने लक्षात येतात. फ्रान्समधील घडामोडीवर विविध प्रकारची प्रतिक्रिया जगभरातून व्यक्त केल्या जात आहेत. मात्र या सर्व प्रकारात चोर सोडून संन्यासाला फाशी हा प्रकार सुरु आहे, हे सहजतेने लक्षात येते. या सर्व घडामोडीमागे अमेरिकेने 1950 ते 1990 या कालावधीत पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिका खंडात केलेल्या उचापती जवाबदार असल्याचे याकडे तटस्थतेने बघीतल्यास सहजतेने लक्षात येते.

अफगाणिस्तान मधील तालिबानी राजवटीची निर्मिती असो, अथवा लोका़ंची काहीही तक्रार नसताना सदाम हुसेन यांची ईराक मधील सत्ता नष्ट करणे, गडाफीला उत्तर आफ्रिकेतील प्रमुख सत्ताधिश म्हणून प्रस्थापित करणे, जगभरात लोकशाहीचा मक्ता घेतल्यासारखे वागणाऱ्या अमेरीकेने सौदी अरेबियाचा राजेशाहीविषयी कठोर भुमिका न घेणे. नैसर्गिक तेलासाठी या देशांना वापरणे मात्र त्याचे मोल म्हणून या देशात सुधारणा करण्यासाठी आपण काही लागतो,याकडे सौइस्कर दुर्लक्ष करणे,ही अमेरीकेची यासाठी लक्षात येणारी काही प्रमुख दुषकृत्ये.
मात्र गेल्या काही दिवसांपासून या संदर्भात येणाऱ्या बातम्यांकडे बघीतल्यास या बातम्यांमध्ये अमेरीकेचे नाव आपल्याला शोधून सापडणार नाही. करून सवरुन आम्ही नाही बाबा त्यातले असा सादसूळ भाव आणणे यामध्ये  जागतिक राजकारणात अमेरीकेचा हात कोणीच धरु शकणार नाही, हे कटू सत्य आहे.
               जागतिक हवामान बदलाबाबत करावयाचा कारवाईबाबत अमेरीकेची असणारी भुमिका हे त्याचेच उत्कृष्ट उदाहरण आहे. अमेरीकेची ही सवय दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरीकेला लागली, असे समजण्याचे कारण नाही. एकोणीसाव्या शतकात अमेरीकेत आलेला इंडीयन्स रिमुव्हल अँटनूसार अमेरीकन लोकांनी इतरांवर केलेला अत्याचार बघावा,म्हणजे समजेल अमेरीकेची जन्मजात सवय कशी आहे? (इंडियन्स रिमुव्हल अँटविषयी युट्युबवर खुप उत्तम व्हिडीओ उपलब्ध आहेत त्यातील काही व्हिडीओची एकत्रीत  प्लेलिस्ट लेखाच्या शेवटी दिली आहे. संदर्भासाठी ती बघू शकतात ) जगातील सर्व प्रकारचा दहशतवाद नष्ट करायचा असल्यास ईतरांचा वर्तनात बदल करण्यापेक्षा अमेरीका या देशाच्या वर्तनात बदल होणे अत्यावश्यक आहे . तो बदल करण्यासाठी लवकरच जग अमेरीकेला भाग पडो, असी इश्वरचरणी प्रार्थना करून सध्यापुरते थांबतो, नमस्कार



 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?