राजकारणाने दूर सारले, नैसर्गिक आपत्तीने जवळ केले


                           "राजकारणाने दूर सारले, नैसर्गिक आपत्तीने जवळ केले", असे म्हणावे लागेल, असी स्थिती नुकतीच जागतिक राजकारणात निर्माण झाली, आणि त्याला निमित्य ठरले , तो तूर्कस्थानच्या इम्रली या राज्यात आलेला शक्तीशाली भुकंप . या भुकंपामुळे ग्रीस या देशाचे देखील काही प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे ग्रीसचे पंतप्रधान कोस्तास कारामान्लिस यांंनी तूर्कस्थानच्या अध्यक्ष एर्डोगन यांना फोन करुन आपल्या दोन्ही राष्ट्रात राजकीय मतभेद कितीही तीव्र असले तरी या नैसर्गिक संकटाशी आपण एकत्र लढले पाहिजे, असा संदेश दिला . ज्यामुळे जागतिक राजकारणात एक वेगळा संदेश दिला गेला .
                          या दोन शत्रू राष्ट्रांना एकत्र येण्यास भाग पडणारा भुकंप (नैसर्गिक) घडला दिनांक 30, आँक्टोबर रोजी जागतिक प्रमाणवेळेनुसार सायंकाळी पाच वाजून वीस  मिनीटांनी.  युरोपिय प्लेट,आफ्रिकन प्लेट, आणि अरेबियन प्लेट या क्षेत्रात एकत्रीत येतात . त्यातील अरेबियन प्लेट ईतर दोन प्लेट पासून दूर जात असल्याने (ती प्लेट भारतीय प्लेटकडे येत आहे)तसेच आफ्रिकन प्लेट आणि युरेशियन प्लेट सातत्याने एकामेकांवर घासत असल्याने या क्षेत्रात वारंवार भुकंप होत असतात . मात्र यावेळचा भुकंप हा फार मोठा आहे. रशियन भुकंप मापक संस्थेचा मते याची तीव्रता रिक्टरस्केलवर 7 आहे. तर तूर्कस्तान भुकंप मापक रिक्टरस्केलवर याची तीव्रता 6.6आहे. गुजरातचा आणि किल्लारीच्या भुकंपाची तीव्रता ही साडेसहाच्या सुमारास होती . तर आजपासून दहा वर्षापुर्वी जपानमध्ये प्रचंड विध्वंस करणारा भुकंप हा साडेसात रिक्टरस्केलचा होता . या तिन्ही भुकंपात किती हानी झाली, हे आपण बघीतलेच आहे. जेव्हा या रिक्टरस्केलमध्ये एकाचा फरक पडतो ,तेव्हा निर्माण होणारी शक्तीत 10 पटीचा फरक पडतो, म्हणजेच पाच रिक्टरस्केलचा भुकंपामुळे जर क्ष एव्हढी उर्जा निर्माण झाली तर जेव्हा सहा रिक्टरस्केलचा भुकंप होईल तेव्हा 10क्ष एव्हढी शक्ती निर्माण होईल.
               हा भुकंप ज्या क्षेत्रात झाला , त्या क्षेत्रात अनेक बेटे आहेत. जी भौगौलिकदृष्ट्या ग्रीसपेक्षा तूर्कस्तानच्या मुख्य भुमीपासून जवळ आहेत. मात्र ती आपली असल्याची ग्रीसची भुमिका आहे, यावरुन दोन्ही देशात विवाद आहे. या वादाच्या पार्श्वभुमीवर या फोन कडे बघायला हवे. फ्रान्स हे युरोपिय राष्ट्र आणि  अल्जेरीया हा आफ्रिका खंडातील देश यांची मदत घेवून अनुक्रमे ग्रीस आणि तूर्कस्तानने या क्षेत्रात नुकतेच शक्तीप्रदर्शन देखील केले होते. हे देखील आपण यावेळी लक्षात घेयला हवे. त्यामुळे हे सकारात्मक पाउल स्थिरच रहावे असी मनोकामना करुन सध्यापुरते थांबतो,नमस्कार.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?