भारताचे परसदार आणि भारत

             

        सध्या भारताच्या शेजारील देशांचे भारतासी असणारे सबंध अत्यंत नव्या वळणावर आहेत. बांगलादेश , म्यानमार,  भूतान, मालदिव, श्रीलंका आदी सर्वच देशांशी भारत नव्याने मैत्री विकसीत करत असल्याचे आपणास माहिती असेलच. यातील बांगलादेश आणि म्यानमार यांच्या बरोबरच्या भारताच्या मैत्रीसंबधी मी या आधीच लिहले आहेत. या लेखाच्या शेवटी त्या लेखाच्या लिंक दिलेल्या आहेत . जिज्ञासू त्या बघू शकतात. यावेळेस मी बोलणार आहे. मालदिव या राष्ट्राबरोबर असलेल्या भारताच्या मैत्रीबाबत.(भारताच्या मालदिव बरोबर असणाऱ्या मैत्री बाबत मी या आधी लिहले होते, ज्याची लिंक या लेखाच्या शेवटी दिलेली आहे)
                          भारताची मालदिव बरोबर असणारी मैत्री नव्याने चर्चेत आली, ती 3 नोव्हेंबर 2020 रोजी असणाऱ्या मालदिवच्या व्हिटरी डे कार्यक्रमात मालदिवच्या राष्ट्रप्रमुख असणाऱ्या इब्राहिम मोहमद सोली यांनी  केलेल्या विधानामुळे. सन 1988 च्या 3नोव्हेंबरमध्ये श्रीलंकेच्या एका मासेमारी करणाऱ्या नौकेने मालदिववर सशस्त्र हल्ला केला. त्यावेळेस भारताच्या नौदलाने त्याचा प्रतिकार करत त्यांंना धूळ चारली होती. म्हणून मालदिवचे स्वातंत्र्य अबाधीत राहीले होते.तेव्हापासून दर वर्षी 3 नोव्हेंबर हा दिवस मालदिव मध्ये व्हिटरी डे म्हणून साजरा करण्यात येतो. (त्यावेळेस भारताची मदत मागणारे तत्कालीन राष्ट्रप्रमुख नंतर उघडपणे भारतविरोधी आणि चीनची बाजू घेणारे झाले. मालदिवने त्यांचा अनेक बेटांपैकी एक बेट चीनला 50 वर्षे भाडे करारावर दिले आहे.असो ) मालदिवचे सध्याचे शासनकर्ते इब्राहिम मोहमद सोली भारताच्या बाजूचे आहेत .,जे 2018मध्ये सत्तेत आले, या आधीचे शासनकर्ते जे सध्या विरोधी पक्षात आहेत. ते उघडपणे चीन समर्थक आहेत. त्यांनी "Quite India"ही मोहिम सुद्धा चालवली आहे. सध्या विरोधी पक्षात असणारे सन 2013 ते 2018 पर्यत सत्तेत होते. 
                 सध्याचा मालदिवच्या राष्ट्रप्रमुख असणाऱ्या इब्राहिम मोहमद सोली यांनी मालदिवच्या प्रगतीत भारताचे प्रचंड योगदान असल्याचे आणि मालदीव भारत मैत्री दिवसोंदिवस घट्ट करण्यावर आमच्या सरकारचा भर असल्याचे देशासमोर उघड भाषणात सांगितले आहे.

           मालदिवच्या प्रमुख धर्म इस्लाम आहे.मालदिव  हवामानबदलामुळे सर्वाधिक समस्याग्रस्त होणाऱ्या  देशांच्या यादीत खुपच वरच्या क्रमांकावर आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी त्या देशाच्या प्रमुखांनी एकदा मंत्रीमंडळाची बैठक समुद्राच्या आत घेतली असल्याचे आपणास आठवत असेलच. मालदिव सार्कचा सदस्य देश आहे. हेही आपण यावेळी लक्षात घेयला हवे. भारताचे सध्याचे परराष्ट्र धोरण शेजारील देशांसी मैत्री वाढवण्याचे आहेत. त्यामुळे मालदिव आणि भारत यांची मैत्री चांगली होणार यात शंकाच नाही. मालदिवचे सध्याचे सरकार 2023 पर्यत सत्तेत असणार आहे. तो पर्यत काय घडामोडी घडतात हे बघणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यातील बदल तूम्हाला सांगण्याचा माझा प्रयत्न असेलच, मात्र तूर्तास इतकेच, नमस्कार
म्यानमार विषयक लेखाची लिंक 

बांगलादेश विषयक लेखाची लिंक 

मालदीवच्या आधीच्या लेखाची लिंक 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?