एक कटू वास्तव

       

                    मी दिवाळीच्या दिवसातील मोकळ्या वेळात आपल्या हिंदीतील एक प्रतिभावंत सिने निर्माते दिग्दर्शक जे वास्तवदर्शी चित्रपट तयार करणारे म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांचा अर्थात मधूर भांडारकर यांचा "जेल" हा चित्रपट बघीतला. चित्रपटाचे कथानक एका चांगल्या घरातील व्यक्तीला फसवणून तरुंगवारी घडवण्यावर आहे, या चित्रपटाच्या माध्यमातून सिनेदिग्दर्शक, निर्मात्याने आपणास तूरुंगातील वास्तव समोर मांडले आहे. ज्यांंना ते गुन्ह्यात दोषी ठरले असते तर जेव्हढी शिक्षा झाली असती, त्याचा कित्येक पट अधिक कालावधी संशयीत म्हणून तूरुंगात कोणत्या प्रकरे काढावा लागतो? पुरेसे पैसे नसल्याने जामिनाला पात्र असूनदेखील अनेक निपराधी तरुंगाचा भिंतीत कसे खितपत पडतात याचे दाहक वास्तव या चित्रपटातून दाखवले आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने तो बघावाच, असे मी म्हणेल. तसेही मधूर भांडारकर यांचे सर्वच चित्रपट उत्तमच आहेत, चांदणी बार , मै माधूरी दिक्षीत बनना चाहती हूं, पेज थ्री, कापोरेट, ट्रँफिक सिग्नल. मात्र जेल हा चित्रपट अंगावर अक्षरशः  अत्यंत शहारे आणतो .
              नुकत्याच एका पत्रकाराला झालेल्या अटक आणि सुटकेच्या पार्श्वभुमीवर मधूर भांडारकर यांचा हा चित्रपट बघणे अत्यावश्यक आहे. लोकशाही च्या चार स्तंभापैकी एका स्तंभाचे काम कोणत्या प्रकारे चालते, याचे दाहक वास्तव यातून समजते. एखाद्याला सहजतेने न्याय कोणत्या आधारावर मिळतो,मात्र 100% निर्दोष असून देखील काही जणांना काही जणांना न्यायासाठी कसे खितपत पडावे लागते, याचे दाहक वास्तव या चित्रपटातून आपल्याला दिसते. 

         निपराधी लोकांची होणारी होरपळ, समाजात होणारी नाच्चकी, आणि प्रत्यक्ष दोषी व्यक्तींना समाजात मिळणाऱ्या मानतराब, यावर हा चित्रपट प्रकाश टाकतो. निपराध आणि पैसाने गरीब व्यक्तींना तूरुंगात होणारा त्रास, आणि पैसे असणाऱ्या दोषी व्यक्तींना मिळणाऱ्या सोईसुविधा यावर हा चित्रपट जळजळीत भाष्य करतो.
आणि सध्या  गाजत असलेल्या एका पत्रकाराच्या अटक, सुटका या नाट्यावर या गोष्टी अत्यंत महत्तवाचा आहेत.ना ?
                      भारतात  न्यायालयात दाखल होणाऱ्या दाव्यांची संख्या, न्याय प्रकरणांची  न्यायाची संथ गती, त्यामुळे निपराधी निर्दोषी व्यक्तीची होणारी कुंचबना, न्यायालयाने निर्दोष सोडल्यावर देखील समाजाचा अस्या व्यक्तींकडे बघायचा दृष्टिकोन, यावर देखील हा चित्रपट भाष्य करतो .
         तसेच सध्याचा काळातील तंत्रज्ञानाच्या काळात तंत्रज्ञानस्नेही रहाणे, किती गरजेचे आहे,अन्यथा कशी फसगत होवू शकते, हे देखील या चित्रपटातून समजते .
मग बघताय ना हा, हा सध्याचा वस्तूस्थितीवर आधारित चित्रपट

 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?