रम्य हे भारत श्रीलंका मैत्रीचे बंध

       

    मित्रांनो, सध्या भारताच्या सभोवतालचे देश आणि भारत यांच्यात अनेक घडामोडी घडत आहे. त्यापैकी, बांगलादेश, भुतान, मालदिव, म्यानमार या देशांविषयी मी या आधीच लिहले आहेत. ज्यांना या विषयी माहिती हवी असेल त्यांना सोईस्कर व्हावे या हेतूने त्या आधीच्या लेखांची लिंक या लेखाच्या खाली देण्यात आली आहे. 
मी यावेळेस बोलणार आहे, ते श्रीलंकेविषयी 
        श्रीलंका, भारताच्या  दक्षिणेला असणारे हिंदी महासागरातील बेट स्वरुप असणारे राष्ट्र. भारताच्या प्राचीन इतिहासातील महत्त्वाचा सम्राट असणाऱ्या अशोक यांंनी बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी आपली मुलगी संघमित्रा हीस ज्या देशात धर्मप्रसारासाठी पाठवले तो देश म्हणजे श्रीलंका. ज्या देशाच्या कँंडी या देशात भगवान बौद्धांचा दात सुरक्षीत ठेवला आहे, तो देश म्हणजे श्रीलंका. इंडो आर्यन गटातील सिंहली ही भाषा, ज्या देशातील प्रमुख भाषा आहे, तो देश म्हणजे श्रीलंका . भारताबरोबर बिमस्टेक, काँमनवेल्थ आणि सार्क या संघटनेतील सदस्य देश म्हणजे श्रीलंका. ज्या देशामध्ये भारतीय वंशाचे तामिळ भाषिक लोक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत, तो देश म्हणजे श्रीलंका. एकेकाळी हिंदी गाणी ऐकण्यासाठी ऐकला जाणारा सिलोन रेडिओ ज्या देशाचा आहे, तो देश म्हणजे श्रीलंका. रामायणातील रावणाचे राज्य म्हणजे श्रीलंका. मराठीतील सर्वोत्तम गायकांपैकी एक असणाऱ्या सुधीर फडके यांनी आपल्या गायनातून स्वर्गापेक्षा सुंदर म्हणून ज्या देशाचे वर्णन केले आहे, तो देश म्हणजे श्रीलंका.

    या श्रीलंका देशाबरोबर भारताचे सध्याचे सबंध काहीसे तणावपुर्ण आहेत, आणि याला कारणीभूत आहे. तो चीन. चीनच्या कर्जाखाली श्रीलंका अक्षरशः पुर्णतः झोपला असल्याने श्रीलंकेतील सर्वसामान्य जनता कोणत्याही देशाबरोबर विकासकामे करण्याचा बाबतीत, तेथील सरकारला सातत्याने विरोध करत आहे. तसेच काही दिवसापुर्वीच भारताच्या बाजूने काम करणाऱ्या विक्रमसिंहे यांचे सरकार जावून चीनला सोईस्कर भुमिका घेणाऱ्या राजपक्षे यांचे विक्रमी बहूमताने सरकार आले आहे. श्रीलंकेच्या एकसदनी सभागृहात एकूण 225 जागा आहेत, त्यातील 145 जागा या राजपक्षेच्या पक्षाला मिळाले आहेत. (2/3 बहूमतासाठी 151 जागा आवश्यक) तर भारताच्या बाजूच्या विक्रमसिंहे यांना अवघी 1जागा मिळाली आहे. तर काही काळापुर्वी विक्रमसिंहे बरोबर असणाऱ्या  सरजित प्रेमदासा ज्यांनी  नंतर  स्वंतत्र्य पक्ष काढला , त्यांना 54 जागा मिळाल्या आहेत.
त्यामुळे भारत श्रीलंकेत विकसीत करू इच्छिणाऱ्या  मट्टाला विमानतळाबाबत श्रीलंकेकडून नकारघंटा मिळाली आहे मट्टाला विमानतळ श्रीलंका कर्ज न फेडू शकल्याने 99 वर्षांसाठी चीनच्या घश्यात गेलेल्या हंबनपोट्टा या बंदरापासून हाकेच्या अंतरावर आहे.मात्र त्यामुळे खच्चून न जाता भारताने प्रयत्न सुरुच ठेवल्याने कोलोंबो बंदरातील पुर्व टर्मिनल भारत आणि जपान संयुक्तरीत्या विकसीत करणार आहे. मात्र त्याला स्थानिक राजकर्त्याचा विरोध आहे.
भारतीय रेल्वेने काही डिझेल रेल्वे इंजिन श्रीलंकन रेल्वेने पाठवली होती, आणि अजून काही पाठवण्यात येणार  होती. मात्र श्रीलंकेत  भारतीय रेल्वे इंजिन असणाऱ्या रेल्वे गाड्यांना आठवड्याभरात दोन ते तीन अपघात झाल्यावर, भारतीय रेल्वेकडून पाठवण्यात येणारे रेल्वे इंजिन श्रीलंकेत चालण्यास सक्षम नाहीत, त्यामुळे श्रीलंकेत विनाकारण रेल्वे अपघात होत आहेत, अशी भुमिका श्रीलंकन रेल्वेतील इंजिन चालकांनी घेतल्याने श्रीलंकन रेल्वेने भविष्यातील भारताकडून होणारी रेल्वे इंजिनाची निर्यात रद्द केली, आणि ती इंजिने चीनकडून आयात करण्याचा निर्णय घेतला.भारत, अमेरीका, जपान, आँस्टोलिया या देशांच्या चीनविरोधी आघाडीत अर्थात क्याँडमध्ये श्रीलंकेने सहभागी व्हावे यासाठी भारताचे प्रयत्न सुरु आहेत. 

           कोणताही देश एखाद्या देशाबरोबर कायमस्वरुपी मित्र नसतो. 1962 ला आपल्याला चीन विरोधी लढ्यात मदत नाकरणारा रशिया 1971 साली बांगलादेशच्या युद्धात मोठ्या प्रमाणात सहकार्य करण्यास तयार झाला. भारताच्या पंतप्रधान इंदीरा गांधी याच्याविरुद्ध अत्यंत हीन दर्जाची टिपप्णी करणारा अमेरीका पुढे भारताचा मित्र झाला.ही या व्यवहाराची काही प्रातनिधीक उदाहरणे.त्यानुसार श्रीलंका जरी सध्या चीनच्या बाजूने झूकलेला वाटत असला तरी  आपल्याबरोबर येईल, या बाबत दुमत नसावे. भुगोलाचा विचार करता श्रीलंकेला चीनपेक्षा भारतच अधिक जवळ आहेच .तरी श्रीलंका भारत पुन्हा एकत्र येतीलच, तो दिवस लवकरच येवो, असी सदिच्छा व्यक्त करुन सध्यापुरते थांबतो, नमस्कार
भूतान विषयक लेखाची लिंक 

मालदीव विषयक लेखाची लिंक 

म्यानमार विषयक लेखाची लिंक 

बांगलादेश विषयक लेखाची लिंक 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?