भारतीय रेल्वे झपाट्याने कात टाकताना


          मित्रानो , भारतीय रेल्वे सध्या प्रकाशाला लाजवेल या वेगाने कात टाकत असल्यानेच आपणास माहिती असेलच.खचितच असा एखादा आठवडा जातो , ज्यामध्ये भारतीय रेल्वेविषयी एकही बातमी चर्चस येत नाही . केंद्र सरकारच्या सर्वाधिक वेगाने घडामोडी ज्या मंत्रालयात घडतात ते मंत्रालय म्हणजे रेल्वे मंत्रालय , असे म्हटल्यास  अतिशोयोक्ती होणार नाही . दर आठवड्यात किमान एकतर रेल्वे विषयक बातमी ही कानावर येतेच , गेल्याच आठवड्यात तीन घडामोडी घडल्या .  मात्र पारंपरिक माध्यमातून या विषयी फारसे सांगण्यात न आल्याने त्या विषयी सांगण्यासाठो आजचे लेखन 
           तर मित्रानो प्रदूषण कमी व्हावे या हेतूने भारतीय रेल्वे आपल्या सर्व मार्गाचे वेगाने विद्युतीकरण करत आहे . हे आपणास माहिती आहेच . त्याच  कार्यक्रमातर्गत चालवलेल्या  उपक्रमामुळे रेल्वेचा पश्चिम मध रेल्वे हा विभाग पूर्णतः विद्यतीकरण झालेला पहिला विभाग झालेला आहे , तर उत्तर पश्चिम विभागात असणाऱ्या राजस्थानातील दिल्ली ते जयपूर आणि जयपूर ते अजमेर या दोन महत्त्वाच्या  मार्गाचे विद्युतीकरण नुकतेच पूर्ण केले आहे . त्याचबरोबर पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या मीटरगेजचे  रूपांतर ब्रॉडगेजमध्ये करण्यासाठी अतिरिक्त निधी मंजूर केला आहे ज्यामुळे ऊत्तर भारतातून दक्षण भारतात जाण्यासाठी जवळचा मार्ग उपलब्ध होणार हाये . ज्यामुळे सुमारे 180 किमी वाचतील .

या घडामोडी घडत असताना दुधात साखर म्हणावी अशी घडामोड डेडीकडेड फ्रेड कॉरिडोर बाबत घडली . नव्यानेच मॅनेजिंग डायरेक्टर नियुक्त झालेल्यारवींद कुमार जैन या   यांनी  पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले की , चालू आर्थिक वर्षाचा अखेर पर्यंत म्हणजेच 31 मार्च 2021 पर्यंत सध्या ळक्म सुरु असणाऱ्या वेस्टन  डेडीकडेड फ्रेड कॉरिडोर  आणि इस्टन डेडीकडेड फ्रेड कॉरिडोर यांच्यातील  40% भाग मालवाहतुकीसाठी सुरु करण्यात आली आहे . ज्यामुळे कानपुर दिल्ली या भागातून गुजरातच्या बंदरावर सहजतेने जात येऊ शकते . पूर्वी ज्या प्रवाश्याला 40 तास लागायचे त्यासाठी आता फक्त 14 ते 16 तास लागतील 
           भारतीय  रेल्वे जगातील विस्ताराचा बाबतीत  आणि लोकांना रोजगार देण्याचा बाबतीत जगातील प्रमुख असणारी भारतीय रेल्वे आता आधुनिकेबाबत सुद्धा जगातील महत्त्वाची रेल्वे अशा 'किताब मिरवायला सज्ज झाली आहे , हेच यातून सिद्ध होते . भारतीय रेल्वे अशीच पुढं जावो , अशी मनोकामना व्यक्त करून सध्यापुरते थांबतो , नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?