आत्महत्या !एक गंभीर समस्या

               

भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी हिमांशू राँय,अध्यात्मिक गुरु भय्युजी महाराज, भारताला काँफी पेयाची सवय लावणारे जी. व्ही. सिद्धांत,  ज्येष्ठ समाजसेविका शीतल आमटे , आप आपल्या क्षेत्रातील ही मान्यवर मंडळी. यांची क्षेत्रे वेगवेगळी असली तरी यामध्ये एक दुर्देवी साम्य आहे, ते म्हणजे या सर्व लोकांनी आत्महत्या करुन आपली इहलोकाची यात्रा संपवली.लौकिक अर्थाने या सर्व व्यक्ती सर्वसामान्यांचा दृष्टिने यशस्वी होत्या. अनेकांचे रोल माँडेल होत्या. मात्र  त्यांनी आत्महत्या केल्या.
 दहा वर्षापुर्वी आलेल्या थ्री इडियट या चित्रपटात एका प्रसंगात विद्यार्थ्यांचा आत्महत्येची आकडेवारी सांगण्यात आली आहे. जी त्यावेळीच छातीत धस्स व्हावी, अशीच होती. ज्या प्रमाणे त्यावेळच्या इतर गोष्टीत वाढ झाली आहे, तसीच यामध्ये सुद्धा झाली आहे. यात शंका नसावी. त्यावेळच्या वर्तमानपत्राचे मथळे  आठवून बघा, रोज किती विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली , याच्या आकडेवारीने ते भरलेले असत.

         आपल्याकडे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला दुबळे समजण्याची पद्धत आहे. त्याला जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याची कुवत नसल्याने त्याने भ्याडपण आत्महत्या केली.असे आपणाकडे सहजपणे म्हंटले जाते. मात्र ते काहीसे अयोग्य आहे. प्रत्येक व्यक्तीला आपला जीव प्रिय असतो.अकबर, बिरबल आणि माकडणीची आपण सर्वांनी लहानपणी ऐकलेली गोष्ट हेच तर सांगते. मात्र तरीही ती व्यक्ती आत्महत्या करते. कारण आपल्या समाजात अयशस्वी व्यक्तींकडे बघण्याचा त्या व्यक्तीला  काहीसा अपमानास्पद वाटेल असा  दृष्टिकोन . कवीवर्य कुसुमाग्रज यांनी त्यांचा सुप्रसिद्ध अस्या "स्वातंत्र देवतेची विनवणी, या फटका काव्यप्रकारातील कवीतेत देखील हेच सांगितले आहे.'उणे कुणाचे दिसता किंचीत, देत दवंडी फिरु नका  . (22 वर्षापुर्वी 15 आँगस्टच्या मुर्हुतावर दैनिक सकाळ या वर्तमानपत्रासाठी लिहलेली ही कविता आज जवळपास एका पिढीनंतर देखील तितकीच लागू होत आहे.ही भुषणावह गोष्ट नाहीये, हे लक्षात घेणे आवश्यक आहे )  आपण सहज गंमत म्हणून एखाद्याची कमतरता ओपन सिक्रेट या सबबीखाली सगळ्यांना सांगत सुटतो. मात्र आपल्या या वर्तनाचा त्या व्यक्तीवर काय परीणाम होईल? या कडे आपण सोईस्कर दुर्लक्ष करतो. हा अनुभव येणारा प्रत्येकजण आत्महत्या करतोच असे नाही. मात्र आत्महत्या केलेल्या अनेक व्यक्तींंनी असा अनुभव घेतल्याचे आपणास दिसते. एखादी आत्महत्या झाल्यावर , त्याला आपले दुःख हलके करायला कोणीच नाही का मिळाले ? एकही जीवाभावाचा मित्र /मैत्रीण नाही का ? त्याला असे सहजतेने बोलले जाते. मात्र त्यावेळेस कुसुमाग्रजांच्या या कवीतेचा विचार का केला जात नाही? या कवीतेत व्यक्त केलेल्या भितीपोटी व्यक्ती आपले दुःख दाबून ठेवते, परीणामी ती व्यक्ती या भुतलाच निरोप घेते.
                    जागतिक मान्यतेनुसार लोकसंख्या आणि मानसोपचार तज्ज्ञ यांंचे जे प्रमाण ठरवण्यात आले आहे, त्या पेक्षा आपल्या भारतातील प्रमाण खुपच कमी आहे. त्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी ठोस उपाय होणे आवश्यक आहे. मी लेखाच्या सुरवातीला सांगितल्या तस्या मोठ्या व्यक्तींचा आत्महत्या चर्चिला जातात .मात्र सर्वसामान्य व्यक्तींचा आत्महत्या या चर्चेल्या जात नाहीत.( गेल्या आठवड्यात नाशिकच्या सातपूर या उपनगरात दोन दिवसात 3 जणांनी आत्महत्या केल्या आहेत.) त्याचा आकडा समोर आल्यास आकडा बघणऱ्या व्यक्तीचे डोळे निश्चितच पांढरे होतील. यात कोणालाही शंका नसावी.

      एखाद्या मोठ्या व्यक्तीने आत्महत्या केल्यावर आपणास एकटे वाटले तर माझ्याशी बोला, पण आत्महत्या करु नका,असा आशयाचे संदेश समाज माध्यमांमार्फत फिरतात. मात्र त्याचा कितपत फायदा होतो, याबाबत काहीच समजत नाही. समर्थ रामदास स्वामी यांचा उपासनेला दृढ चालवावे ही शिकवण सातत्याने चालायला हवी. तरच या चित्रात सकारात्मक बदल दिसेल.
      कवीवर्य    भा . रा . तांबे' यांच्या "जन पळभर म्हणतील हाय हाय, तू जाता मागे राहिल काय" यांची कविता प्रत्येकाने एकदा तरी वाचायलाच हवी. ज्यामुळे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींना काही प्रमाणात आळा बसेल.
माध्यमांनी सुद्धा  सामान्य जणांचा विचार करता, काहीही महत्व नसणारे मुद्दे उपस्थित करण्यापेक्षा या मुद्यावर सरकारला  धारेवर धरायला हवे.छर आणि तरच या गंभीर मुद्यावर  सरकार काही कार्यवाही करेल.
       आपल्याकडे जिथे शाररीक आरोग्याची काळजी घेण्याबाबत अनास्था आहे, तिथे मानसिक आरोग्याची काळजी घेण्याची गोष्ट खुप दूरची आहे, याची मला जाणीव आहे. भारतीय समाजात ही जाणीव लवकरात लवकर येवो,असी इश्वरचरणी प्रार्थना करुन आपली रजा घेतो,नमस्कार


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?