हे तूम्हाला माहिती आहे का ?

             

          सध्या भारताच्या बाबतीत घडणाऱ्या घडामोडी बघितल्यास एक गोष्ट सातत्याने आपल्या कानावर पडते,  ती म्हणजे भारताच्या जीडीपीच्या आकड्यांविषयी . भारताचा जीडीपी इतका झाला  तितका झाला असे आपण नेहमी ऐकतो , मात्र जीडीपी म्हणजे काय ? तो कमी जास्त होतो म्हणजे काय ? त्याचा कमी जास्त होण्यामुळे काय काय परिणाम होतो ? या विषयी फारच कमी लोकांना माहिती असते. माझे आजचे लेखन त्या विषयी माहिती देण्यासाठी . 
            जिडीपी अर्थात ग्रॉस डेमॉस्टीक प्रॉडक्ट  म्हणजे एका विशिष्ट कालावधीत (जो आता आता पर्यंत वर्ष  असे , मात्र आता  दर दोन महिन्याचा देखील जीडीपी मोजला जात असे ) एखाद्या देशात त्या देशात उत्पादित झालेल्या उत्पादने , सेवा यांचे अंतिम मूल्य होय . हे मूल्य काढताना त्या देशाच्या भौगोलिक क्षेत्राचा विचार होतो . त्या विशिष्ट देशातील नागरिकांनी इतर देशात कमावलेले मूल्य यात गृहीत धरले जात नाही . मात्र परदेशातील कंपन्यांनी त्या देशात उत्पादित केलेल्या उत्पादनाचे मूल्य यात मोजले जाते . उदाहरणार्थ  अतुल नावाच्या एखाद्या  अनिवासी भारतीयाने अमेरिकेत 1000 अमेरिकी डॉलर इतके उत्पन्न कमवले, आणि जपानी मालकीच्या होंडा या कंपनीने आपल्या देशात जर 50,000 रुपयांच्या गाड्या बनवल्या , तर आपल्या भारताचा जीडीपी काढताना होंडा या मुळातील जपानी मालकीच्या कंपनीच्या 50,000 रुपयांच्या विचार होईल , मात्र अतुल हा  भारतीय नागरिक असून देखील त्याने अमेरिकेत कमावलेले  1000 अमेरिकी डॉलरचा विचार होणार नाही . देशाच्या जीडीपीच्या विचार करताना ग्राहक जी वस्तू वापरणार असतो , त्या वस्तूच्याच विचार होतो , ती वस्तू तयार करताना लागलेल्या कच्या मालाच्या किमतीचा विचार होत नाही .
       आपल्या भारतात दर दोन  महिन्याला जो जीडीपी सांगितलं असतो , तो  मागच्या वर्षात त्याच काळात असलेल्या जिडीपीशी तुलना करतो , म्हणजेच जेव्हा आपण म्हणतो की एप्रिल ते जून 2020  या कालावधीत जेव्हा जिडीपीची वाढ उणे 23 असते तेव्हा तो .एप्रिल ते जून 2019 मधील जीडीपीशी तुलना करून काढलेला असतो . अमेरिकेत मात्र  मागच्या  महिन्यावरून पुढचा जीडीपी काढला जातो . 

या जीडीपीच्या मोजण्याचा दोन पद्धती आहे , एक म्हणजे रियल जीडीपी आणि दुसरी  म्हणजे नॉमिनल जीडीपी . 
जेव्हा एखाद्या वर्षाला मूलभूत वर्ष मानून जेव्हाजेव्हा जीडीपी काढला जातो तेव्हा त्यास  रियल   जीडीपी म्हणतात. ज्यामध्ये प्रत्येक वर्षी महागाईमुळे एखाद्या वस्तूची किंमत वाढली तरीही मूलभूत वर्षचीच किंमत प्रमाण मानून त्या वर्षात उत्पादित झालेल्या उपादनाची किंमत मांडली जाते .उदा मूलभूत वर्षात खुर्चीची किंमत 100 असेल आणि त्यावेळेस 100 खुर्च्या निर्माण झाल्या तर त्या देशाच्या जीडीपी झाला 100*100= 100,00 झाला . मात्र कालांतराने पुढच्या वर्षी 80 खुर्च्याच निर्माण झाल्या . मात्र या काळात खुर्चीची किंमत 150 झाली तर जीडीपी होईल 150*80 =12000 म्हणजे उत्पादन कमी होऊन देखील जीडीपी वाढला , त्यामुळे अर्थव्यवस्थेची मुळातील वाढ लक्षात यावी यासाठी जरी किंमत 150 असली तरी ती 100 म्हणूनच  जीडीपी काढला जाईल जो 80*100 =8000 ठरेल . जर या जीडीपीला लोकसंख्येच्या संख्येने  भागले असता जीडीपी  कॅपिटा मिळतो . बांगलादेशने  निकषावर भारताला मागे टाकले आहे 
तर दुसऱ्या पद्धतीती अर्थात नॉमिनल  जीडीपी काढण्याचा या पद्दतीत हा बदल विचारत घेतला जात नाही . 
जीडीपी सारखीच दुसरी बाब म्हणजे जिएनपी होय . ज्यामद्ध्ये परदेशी कंपन्यांनी दुसऱ्या देशात केलेले काम विचारता घेतले जात नाही . मात्र त्या देशाच्या लोकांनी परदेशात कमावलेले उत्पन्न लक्षत घेतले जाईल . जीडीपीच्या वेळी घेतलेले उदहारण बघायचे असल्यांस जी एन पी काढताना अतुलच्या उत्पन्न ग्राह्य धरले जाईल ,मात्र होंडा कंपनीचे उत्पन्न विचारत घेतले जाणार नाही 
         अर्थशास्त्र हा खूप गहन विषय आहे . मी सांगितलेले त्यातील खूपच प्राथमिक आहे , याची मला जाणीव आहे . माझा या लेखनाचा हेतू ज्याला या ची काहीच माहिती नाही त्याला विषय ओळख व्हावी हा आहे . जो या लेखातून साध्य झाला आहे असे मला वाटते त्यामुळे इथेच थांबतो , नमस्कार . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?