झूक झूक अगीन गाडी

   

  आपल्या भारतीय रेल्वेत सध्या देशभर मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु आहेत, हे आपणास माहिती असेलच.रेल्वेबाबत महाराष्ट्राला कायम सापत्नतेची वागणूक  दिली जात असल्याचे वारंवार सांगितले जाते . मात्र हे खोटे असल्याचे महाराष्ट्रात रेल्वेचे सुरु असणारे प्रकल्प बघताना आपणास दिसते. या प्रकल्पाचे आपण दोन प्रमुख प्रकारे विभाजन करु शकतो. ते म्हणजे 1)पुर्णतः नविन मार्गाची निर्मिती 2)जून्या मार्गात सुधारणा .
जून्या मार्गात सुधारणा या प्रकारचे सुद्धा दोन प्रकारे विभाजन करता येते 1) नविन रुळ टाकणे 2) मार्गाचे विद्यूतीकरण करणे .
पहिल्यांदा जून्या मार्गावर नविन रूळ टाकण्याबाबत बोलूया .
मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात अस्तिवात असणाऱ्या काही रेल्वे मार्गाचे नुकतेच दुपदीकरण करण्यात आले अथवा या कार्यासाठी पुरेसी निधीची तरतूद करण्यात आली. म्हणजेच पुर्वी तिथे एकच रेल्वेमार्ग होता, एकाच मार्गावरुन अप आणि डाउन दोन्ही प्रकारच्या गाड्या धावत असे आता मात्र या मार्गावर अप आणि डाउनसाठी वेगवेगळे रुळ असतील अस्या  मार्गात पुढील मार्ग येतात.
1)पुणे- मिरज -लोढा या 462 किमीच्या रेल्वेमार्गासाठी 4795 कोटी रुपये मंजूर करण्यात आले 
2) मनमाड- दौंड या 208 किमी साठी238 कोटी रुपयांंची तरतूद करण्यात आली.
तर3)नागपूर रांजनगावसाठी या 162किमीसाठी1950 कोटीच्या खर्चाला  मंजूरी देण्यात आली 4)तर मुदखेड परभणी आणि दौड गुलबर्गा या अनुक्रमे 81 किमी आणि 287 किमीच्या रेल्वेमार्गासाठी 950 कोटी अणि 3000कोटी रूपये राखून ठेवण्यात आले आहे.

   या बरोबरच मार्गाचा तिहेरीकरण्याचा कार्यात महाराष्ट्रातील पुढील विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत कल्याण ते कसारा या 67 किमीसाठी 792 कोटी ,भूसावळ ते जळगाव या 24 किमीसाठी 199 कोटी, वर्धा सेवाग्राम नागपूर या 76 किमीसाठी 540कोटी , वर्धा बल्लारशहा या 132किमीसाठी 1272 कोटी ,इटारसी नागपूर  या 280 किमीसाठी2499 कोटी ,मनमाड ते जळगाव या 160 किमीसाठी 1035 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. यात सांगितलले सर्व प्रकल्प रेल्वे मंत्रालयाकडून मंजूर झाले असून कार्य पुरतेबाबत विविध टप्यावर आहेत.
आता बघूया महाराष्ट्रातील कोणत्या मार्गाचे चौपद्रीकरण होत आहे.
वर्धा ते नागपूर या 76 किमीसाठी 637 कोटी, जळगाव ते  भूसावळ या 24 किमीसाठी 261 किमी खर्च करण्यास रेल्वेने मंजूरी देण्यात आली आहे.
भारतात रेल्वेमध्ये होणाऱ्या बदलांपैकी महाराष्ट्रात होणाऱ्या  बदलांपैकी काही बदलांची माहिती आपण या लेखाद्वारे घेतली. या पुढच्या लेखात महाराष्ट्रात होणाऱ्या विद्युतीकरणाविषयी बोलेल . तो पर्यत नमस्कार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?