जरा याद करो उनको

   

 दिनांक 13 डिसेंबर 2001..., स्थळ संसदेची इमारत नवी दिल्ली......., वेळ सकाळी अकराची....., संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु असल्याने देशातील सर्व खासदार संसदेच्या प्रांगणात हजर.ज्यामध्ये सोनिया गांधी, अटलबिहारी वाजपेयी,लालकृष्ण अडवाणी, पि सी चिदबरन् आदी देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे खासदारांचा समावेश असतो....... नेहमीप्रमाणे सर्व सुरळीत सुरु असते. आज काही वेगळ घडणार आहे. याची पुसटशी देखील शंका तेथील सुरक्षा रक्षकांना नव्हती. अचानक खासदारांसाठी असलेले स्टिकर लावलेली एक कार संसदेच्या आवारात घूसते. नेहमीच्या ठिकाणी न थांबता सरळ संसदेच्या आवारात घूसते. खासदाराची गाडी आहे. कशाला तपासायचे? असा विचार करुन सुरक्षा रक्षक  त्या गाडीला तसेच पुढे जावू देतात. जी सुरक्षा रक्षकांची चूक असल्याचे नंतर लक्षात येते , कारण ही गाडी संसदेच्या इमारतीला खेटून उभी राहते. त्या कारमधून आलेल्या व्यक्ती गोळीबार करत  संसदेच्या मुख्य सभागृहाच्या दिशेने पळायला सुरवात करतात.  आणि एकच हल्लाबोळ होतो.मग समजते की काश्मीरी दहशतवाद्यांनी भारताच्या सार्वभौम संसदेवर हल्ला केला आहे.  आज 2020 साली या घटनेला 19 वर्षे पुर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने या हल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व वीरांना भावपूर्ण श्रध्दांंजली.
आजमितीस या हल्यामागच्या मुख्य सुत्रधार मुळचा काश्मीरी असलेल्या आणि दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक असणाऱ्या अफजल गुरु याच्यावर योग्य त्या पद्धतीने न्यायालयात खटला दाखल करुन त्याला फाशी देण्यात आले आहे. या हल्यात सहभागी असणाऱ्या सर्व दहशतवाद्यांंना जागेवरच कंठस्नान घालण्यात आले. या हल्यात आपले देखील काही  शुर जवान, तसेच काही संसदेचे कार्यालयीन कर्मचारी मात्र आपण गमावले, त्यांचा बलीदानाला शतशः नमन. त्यांनी आपल्या प्राणाचे मोल देवून देशातील सर्वच्या सर्व खासदारांचे प्राण वाचवले.जर हा हल्ला यशस्वी झाला असता तर भारताची प्रचंड हानी झाली असती. तसेच जगात प्रचंड प्रमाणात नाच्चकी देखील झाली असती. जी त्यांनी आपल्या प्राणाचे मोल देवून वाचवली.

यानंतर भारतीय संसदेची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली. ससंदेची काही प्रवेशद्वारे बंद करण्यात आली. त्यामुळे त्या नंतर दहशतवाद्यांचे असे साहस परत करण्याची हिंमत झाली नाही. याबात संसदेच्या सुरक्षेची जवाबदारी असणाऱ्या सर्वांचे कौतूक करावे , तितके कमीच आहे. या हल्यात हौतात्म आलेल्या वीर जवानांना तसेच संसद कर्मचाऱ्यांना आणि त्या नंतर संसदेच्या सुरक्षीतेची जवाबदारी डोळ्यात तेल घालून करणाऱ्या सुरक्षा जवानांना मानाचा सलाम करुन थांबतो
जय हिंद 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?