सिंहावलोकन खगोलशास्त्र 2020


सन 2020 मधील सर्वात चर्चीत असणारी गोष्ट करोना असली तरी खगोलशास्त्रात अनेक घडामोडी घडल्या . त्याविषयी सांगण्यासाठी हे लेखन .
 तर मित्रानो, आपल्या सौरमालेच्या बाहेर पृथ्वीपासून   17 अब्ज प्रकाशवर्ष दूर असणाऱ्या  एका ठिकाणहून दोन कृष्णविवर एकत्र आल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे .शास्त्रज्ञांनी या जागेला GW190521 असे नाव दिले आहे  आपण जी घटना आता बघतो आहोत ती घटना 17 अब्जवर्षांपूर्वी घडून गेली आहे . त्या वेळी निर्माण झालेल्या  गुरुत्त्वीय लहरी प्रकाशाच्या वेगाने प्रवास करत आता आपल्या पर्यंत पोहोचल्या आहेत विश्वाचे वय साधारणतः 17ते  20 अब्ज असावे असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे . त्या हिशोबाने विश्व जन्मला आल्यावर लगेच ही घटना घडलेली असावी . विश्वााची निर्मिती नेमकी कोणत्या प्रकारे झाली याची माहिती मिळण्यासाठी याचा उपयोग होवू शकतो. आइस्टाइनच्या सापेक्षवादाच्या सिद्धांताच्या आधारे हा शोध घेण्यात आला.

एकीकडे सौरमालेच्या बाहेर दोन कृष्णविवर एकत्र आलेले आढळून आले असताना आपल्या सौरमालीकेतील सुद्धा अनेक महत्तवाचे शोध 2020 या वर्षी लागला .आपल्या सौरमालिकेतील सेरस(याचे विविध नावे प्रचलीत आहेत. मात्र सर्वाधिक सेरेस हेच नाव प्रचलीत आहे). या बटू ग्रहाची माहिती काढण्यासाठी नासाने DAWN नावाचे  यान सन 2007 रोजी यान सोडले होते जे 2015  वेळी पोहोचले . त्या यानाने 2018  पर्यंत या बटूग्रहाच्या अभ्यास केला आणि त्याची माहिती पृथ्वीवर पोहोचवली. ज्याचे विश्लेषण करताना या बटुग्रहावर खाऱ्या अथवा गोड्या पाण्याचा महासागर असल्याचे पुरावे नासाला मिळाले  आहेत .
सेरेस , हा मंगळ आणि गुरु या ग्रहाच्या मध्ये असणाऱ्या लघुग्रहांच्या पट्यातील  (ASTEROID BELT )सर्वात मोठा घटक ( OBJECT) आहे. एका अंदाजानुसार लघुग्रहांच्या पट्यातील  (ASTEROID BELT ) असणाऱ्या वस्तुमानातील 25% वस्तुमान सेरेसवर आहे . याचा  शोध सन 1801मध्ये लागला . आणि त्यास सन  2006 मध्ये बटू ग्रहाच्या दर्जा मिळाला . खगोल शास्त्रज्ञांचा मते जीवश्रुष्टीसाठी पाणी हा अत्यावश्यक पदार्थ आहे. त्या दृष्टीने या शोधाला विशेष महत्व आहे.
      या 2020 वर्षात 3 देशांनी मंगळावर आप आपली याने पाठवली ..ज्यामध्ये अवकाशसंशोधनात कधीही नाव नसणाऱ्या आखाती देशातील युनाटेड अरब अमिरात या देशाचा देखील समावेश आहे त्याविषयी आता बोलूया .   तर ,मित्रांनो तीन अवकाश संशोधन संस्थांंनी मंगळ  ग्रहावर तीन मोहीमा राबवल्या .युनाटेड अरब  अमिरात देशाची  स्पेस एजन्सी, चीनची अंतराळ संशोधन संस्था, नासा या त्या तीन  अवकाश संशोधन संस्था आहेत . युनाटेड अरब अमिरात मार्फत  14 जुलैला मोहिमेची सुरवात झाली. . तर चीन या देशाची स्पेस एजन्सी मार्फ़त 23 जुलैला मोहिमेची सुरवात झाली. आणि नासा या अवकाश संस्थेमार्फत जुलै ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मोहिमेला सुरवात होणार झाली. 

तसेच गुरु शनी यांच्यातील युती, तसेच एका दिर्घ कक्षा असणाऱ्या धुमकेतूचे दर्शन, 3सुर्यग्रहण आणि 2 चंद्रग्रहण  याही गोष्टी खगोलशास्त्रप्रेमींना या वर्षात बघता आल्या.
एकदरीत खगोलशास्त्रासाठी हे वर्ष उत्तमच गेले असे म्हणता येईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?