झुक झुक अगीन गाडी(भाग 2)

       

      मित्रांनो, आपल्या भारताची रेल्वे विद्युतवेगाने कात टाकत असल्याचे आपणास ज्ञात आहेच. देशभरात सुरु असणाऱ्या या बदला अंतर्गत  महाराष्ट्रात देखील झपाट्याने बदल होत आहेत. यातील  रेल्वेमार्गाचे दुपद्रीकरण, तिहेरीकरण, आणि चौपद्रीकरण याविषयी माहिती पहिल्या भागात घेतली. आपण याचा पहिल्या भागात घेतली. (ज्यांना ती वाचायची असेल त्यांनी या लेखाच्या खाली असणाऱ्या लिंकवर क्लिक करावी) या भागाात मी बोलणार आहे ते महाराष्ट्रातील विद्युतीकरणाविषयी.
           आपल्या महाराष्ट्रात 5678किलोमीटरचे रेल्वेमार्ग आहेत. त्यातील सुमारे 60% म्हणजेच 3357 किलोमीटरच्या रेल्वेमार्गाचे विद्यूतीकरण झालेले आहे. सध्या रेल्वे झपाट्याने शुन्य कार्बन निर्मिती होण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याच मालिकेत  भारतातील सर्व रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण करण्याचे कार्य करत आहे. या प्रकल्पा अंतर्गत महाराष्ट्रातील पुढील मार्गाचे विद्यूतीकरण सुरु आहे. हे मार्ग विद्युतीकरणाच्या कार्यांमध्ये विविध टप्यामध्ये आहेत, म्हणजेच काही मार्गाचे विद्यूतीकरण करण्याचे रेल्वेचे नजिकच्या भविष्यकाळात करण्याचे नियोजन आहे. काही मार्गाचे काम जवळपास पुर्ण झाले आहे. तर काही मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे.तर हे मार्ग आहेत.

           जसई चिल्ले ते जवाहारलाल नेहरु पोर्ट हा 12 किलोमीटरचा मार्ग, पनवेल ते मडगाव हा 764 किलोमीटरचा मार्ग ,अकोला ते पुर्णा हा 208किलोमीटरचा विदर्भ मराठवाडा जोडणारा मार्ग, 78 किमीचा कुर्दुवाडी ते सोलापूर हा मार्ग, विदर्भातील महत्त्वाचे ठिकाण जोडणारा तूमसर ते बालाघाट हा 110 किमीचा रेल्वेमार्ग, नाशिक जिल्ह्याला मराठवाड्याला जोडणारा मनमाड ते मुदखेड हा मार्ग, कुर्दुवाडी मार्गे जाणारा मिरज ते लातूर रोड हा रेल्वेमार्ग, 280 किलोमीटरचा पुणे ते मिरज हा रेल्वेमार्ग तसेच तेलंगणाला मराठवाड्याला जोडणारा 183 किलोमीटरचा अदियालाबाद ते मुदखेड 
भारताबरोबर आपल्या महाराष्ट्रात देखील रेल्वेची घोडदौड अत्यंत वेगाने सुरु आहे, याचीच साक्ष या घडामोडी देत आहेत असेच म्हणावे लागेल.
या लेखाच्या पहिल्या भागाची लिंक 









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?