भारतीय रेल्वे..... वेगाने बदलाच्या वाटेवर

     

 भारतीय रेल्वे, सध्याचा काळातील केंद्र सरकारचा सर्वात जास्त वेगाने बदलत जाणारा उपक्रम. दर आठवड्यात किमान तरी बातमी ही भारतीय रेल्वेतील बदलांविषयी असतेच. काही बदल तात्कालीक असतात, तर काही दुरगामी परीणाम करणारे असतात. या बदलांच्या मालिकेत गेल्या आठवड्यात 3 बदलांची भर पडली, त्याविषयी सांगण्यासाठी  आजचे लेखन.
     तर मित्रांनो, रेल्वेच्या गाड्यांबरोबर प्रवास करणाऱ्या स्टाफविषयी अर्थात रनिंग स्टाफ(ज्यामध्ये रेल्वे इंजिनाचे चालक, रेल्वे गार्ड , डब्यात तिकीट तपासणारे, पेंट्री कारचे कर्मचारी, काही संवेदनशील भागात रेल्वेमध्ये सुरक्षा देणारे सुरक्षा दले यांचा समावेश होतो). विषयी मोठे परीणाम करणारे दोन बदल रेल्वेमध्ये गेल्या आठवड्यात जाहिर करण्यात आले तर एक  प्रवाश्यांसदर्भात एक बदल झाला.
तर मित्रांनो, आता पर्यत रेल्वे इंजिनात शौचालयाची सोय नव्हती, त्यामुळे रेल्वे इंजिन चालकांची मोठी कुचंबना होत असे.  यावर आता तोडगा काढण्यात आला आहे. भारतीय रेल्वे इंजिनाची निर्मिती करणाऱ्या डीझेल लोकोमोटिव्हि वर्क्स वाराणसी (जो डि एल डब्ल्यु वाराणसी या नावाने प्रसिद्ध आहे ) या कारखन्यामार्फत या पुढे निर्माण करण्यात येणाऱ्या सर्व रेल्वे इंजिनामध्ये बायो टाँयलेट बसवणार असल्याचे जाहिर करण्यात आले आहे. { या कारखन्याच्या नावात जरी डिझेल असले तरी आता भारतीय रेल्वेत डिझेल इंजिन तयार करणे बंद झाल्याने तिथे देखील ईलेक्ट्रिक रेल्वे इंजिन तयार होतात} या आधी तयार करण्यात आलेल्या आणि सध्या वापरात असणाऱ्या रेल्वे इंजिनामध्ये त्यांची दुरुस्ती ज्या डिव्हीजन मध्ये होते, तिथे बसवणार आहेत(आपण प्रवाश्यामध्ये रेल्वे इंजिनावर पुणे, भुसावळ, कल्याण, सोलापूर, नागपुर ,नांदेड अशी नावे बघतो, ती त्या इंजिनाची दुरुस्ती कुठे होणार आहे? हे सांगत असतात.) या बदलामुळे रेल्वे इंजिन चालकांची मोठी सोय होणार आहे.

एका बाजूला रेल्वे इंजिन चालकांची सोय होत असली, तरी त्यांना साह्य करणाऱ्या रेल्वे गार्डच्या पदावर मात्र संक्रात येण्याची दाट शक्यता रेल्वेच्या एका निर्णयामुळे निर्माण झाली आहे, तो म्हणजे मालवाहतूकीच्या गाड्यांमध्ये गार्डच्या ऐवजी पाश्चात्य देशातील मालवाहतूकीच्या गाडीमध्ये शेवटी असते, त्या प्रकारचे यंत्र बसवून गार्ड  हे पद संपवणे होय. रेल्वेने या आधी याची प्रायोगिक तत्वावर चाचणी घेतली होती, त्यावेळी आलेल्या अनुभवातून ही पद्धत रेल्वेत सार्वत्रीक करण्याचे रेल्वेने ठरवले आहे. त्यामुळे रेल्वे गार्ड धास्तावले आहेत.
एका बाजूला रेल्वे कर्मचाऱ्यांंविषयी घडामोड घडत असताना , केंद्र सरकारतर्फे रेलटेल या रेल्वेच्या उपकंपनीतील 25% भागीदारी विक्रीस काढली आहे .स्वर्गीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा कार्यकाळात रेल्वे स्टेशन आणि परीसरात मोफत आणि जलद इंटरनेट देण्यासाठी ही रेल्वे कंपनी स्थापन करण्यात  आलेली आहे. या आधी केंद्र सरकारने रेल्वेच्या IRCTC{Indian Railway Catering &Tourist Cooperation) आणि RVNL(Railway Vikas Niyam Limited) या उपकंपन्यातील अनुक्रमे 25% आणि 15 % समभाग विक्रीस काढले आहेत.त्यानंतर भारतीय रेल्वेच्या तिसऱ्या उपकंपनीतील आपला हिस्सा केंद्र सरकार कमी करत आहे.

बदल हा आपल्या मानवी आयुष्याचा स्थायी भाव आहे. सातत्याने होणारे बदल हीच न बदलणारी गोष्ट आहे, हे जरी मान्य केले, तरी ते बदल दुसऱ्या वर  अनुचित परीणाम करणारे नसावेत, अन्यथा या बदलाला अर्थ राहणार नाही. गेल्या आठवड्यात होणारे बदलांचे चांगले की वाइट परीणाम होतात, हा प्रश्न भविष्यावर सोडणे सयुंक्तिक ठरेल. मात्र हे बदल अन्यायकारक न ठरो, अशी इश्वरचरणी प्रार्थना करुन सध्यापुरते थांबतो, नमस्कार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?