आपली यस्टी कात टाकती आहे!


महाराष्ट्राची एसटी , भारतातील पहिले राज्य परीवहन महामंडळ , भारतात सार्वजनिक परीवहन सुरु होण्यास कारणीभूत ठरलेल्या 1956 चा भारतीय सार्वजनिक परीवहन कायदा अस्तिवात येयचा आधी तब्बल 8 वर्षे आधी अस्तिवात आलेले राज्य परीवहन महामंडळ, भारताला 1984 साली पहिल्यांदा आरामदायी प्रवाशाची अनुभुती देणारे राज्य परीवहन महामंडळ, इलेक्ट्रीक  बसेसचा समावेश आपल्या ताफ्यात करणारे देशातील पहिले राज्य परीवहन महामंडळ म्हणजे आपली महाराष्ट्राची एसटी 
तर ही आपली एसटी सध्या विशेष चर्चेत आहे, ते कारण म्हणजे  आपल्या एसटीच्या विविध डेपोकडून चालवण्यात येणाऱ्या सहली . नाही म्हणायला या प्रकारच्या सेवा आपल्या एसटीकडून या आधीपण देण्यात येत होती. पण ती सेवा पुणे, मुंबई, औरंगाबाद,नागपूर  या सारख्या शहरातील डेपोकडूनच चालवण्यात टकंयेत होती, मात्र आता शिरपूर (जिल्हा धूळे), कोपरगाव, शेवगाव , श्रीगोंदे (जिल्हा अहमदनगर) सारख्या ग्रामीण भागातील एसटीच्या डेपोकडून शिरपूर घूष्णेश्वर मंदीर अंजिठा-वेरूळ आणि परत शिरपूर , तसेच शिरपूर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, सप्तशृंगी देवी मंदिर आणि परत शिरपूर सारख्या सहलींचे आयोजन करण्यात येत आहे. येथे शिरपूरचे उदाहरण प्रातनिधीक स्वरुपाचे आहे, शिरपूर सारखे, वाई ( जिल्हा सातरा)परभणी असे  महाराष्ट्र एसटीचे कित्येक डेपो आहेत, ज्यांनी अस्या सहलीचे आयोजन केले आहे. तसेच पुर्वी प्रामुख्याने धार्मिक स्थळांना जसे अष्टविनायक वगैरे स्थळांना या सहलीच्या माध्यमातून भेटी दिल्या जात असत. मात्र सध्या सुरु झालेला सहलींच्या माध्यमातून लोणावळा , महाबळेश्वर सारख्या पर्यटन स्थळाला देखील आता भेटी देवू शकतात. माझा मते हे दोन्ही बदल स्वागातार्ह्यच आहेत.

मी स्वतः आपल्या एसटीःतर्फे चालवण्यात येणाऱ्या 4 दिवसांचा आवडेल तिथे प्रवास, तसेच 200 रुपयाचे कार्ड घेवून वर्षभरात एसटीच्या मार्फत फिरताना 10% सवलतीचा अनेकदा लाभ घेतला आहे.त्यामुळे एसटीच्या योजना किती लाभदायी असतात, हे मला माहिती आहे. माझी हे लेखन वाचणाऱ्या सर्वांना आग्राहाची विनंती आहे की, आपण किमान एकदा तरी एसटीच्या या योजनांचा लाभ घ्यावा. सध्या करोना चा संसर्गाचा धोका कमी होत आहे. तसेच खाजगी वाहतूकदरांकडून घेण्यात येणाऱ्या सुरक्षेपेक्षा कैकपटीने अधिक सुरक्षा महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून घेतली जाते. त्यामुळे महामंडळाच्या बसेसमधून फिरण्यात काही धोका नाही. आपण फिरताना अनेक ठिकाणी खाद्यपदार्थ विकत घेवू , ज्यामुळे ते खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या लोकांच्या हातात पैसा खुळखुळेल , परीणामी ते आपल्या गरजेच्या वस्तू विकत घेतील, या वस्तू तयार करणाऱ्या लोकांचा हातात त्यामुळें पैसे खुळखुळतील. असे चक्र सुरु झाल्याने अर्थव्यवस्थेला बळकाटी येईल. सरकारच्या अर्थव्यवस्थेत पैसा ओतण्यास काही मर्यादा आहेत, त्या मर्यादा आपल्या फिरण्यातून दूर होवु शकतात, मग जाता ना फिरायला ?



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?