समर्थकांसाठी समर्थकांकरवी..समर्थकांचा राडा

     
                   लोकशाही म्हणजे लोकांसाठी, (for the by people)लोकांकरवी , (by the people) लोकांच्या मार्फत  (of the people) चालवण्यात येणारी शासनव्यवस्था  होय, अशी लोकशाहीची व्याख्या अमेरीकेचे प्रसिद्ध अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी केली होती. मात्र लवकरच ही व्याख्या आपलेच वारसदार समर्थकांसाठी, समर्थकांकरवी, समर्थकांच्या मार्फत चालवण्यात येणारी शासनव्यवस्था असी बदलतील, अशी त्यांना कल्पना नसेल.अब्राहम लिंकन यांना अनपेक्षीत असणारी ही घटना अमेरीकेत 2021  जानेवारी 6 रोजी घडली, ज्यात हे लेखन करेपर्यत 4 निष्पापांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे. आधूनिक जगाचा विचार करता, पहिल्या काही लोकशाही असणाऱ्या अमेरीका या  देशात ही लोकशाहीची हत्या करण्याची घटना घडली आहे.
          निवडीच्या प्रक्रीयेतील काही तरतूदींच्या आधारे, जनाधार असणाऱ्या विरोधी पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना पराभूत करून, सत्तेच्या सर्वोच्च स्थानी असणाऱ्या पोहोचणाऱ्या,  डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कोलांटी उडी घेत, ज्या प्रतिनिधीच्या संख्येमुळे ते निवडून आले, त्याला सोडचिठ्ठी देत, जनमताचा राग आळवला आहे.  परीणामी अमेरीकेत भूतकाळात कधीही झाला नाही, असा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. ज्यामुळे हा लेख लिहण्यापर्यत 4 जणांना प्राणास मुकावे लागले आहे .

     सुरवातीपासून अवास्तव आक्रस्ताळेपणा करणाऱ्या, अवघड प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या,माध्यमांना शिव्याची लाखोली वाहणाऱ्या, राज्यांनी विरोध केला असताना मेस्किकोच्या सीमेवर भिंती बांधणाऱ्या, अमेरीका फस्ट असे म्हणत ग्रीन कार्डवर बंधने लादणाऱ्या, पर्यावरणाबाबत अत्यंत बेपर्वा असणाऱ्या, करोना  संसर्गाचा काळाज बेजवाबदारपणे वागणाऱ्या 45 वे राष्टाध्यक्ष असणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला पराभव मान्य न करता निवडणूकीत गैरप्रकार झाल्याचे सांगत सत्तेवरुन पाय उतार होण्यास नकार दिल्याने हा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. 
         करोना संसर्गामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या टपाली मतदान (पोस्टल वोटींग)मध्ये गैरप्रकार झाले आहेत. टपाली मतदान रद्द करण्यात यावे, अशी सुरवातीपासूनच मागणी करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प  यांनी जार्जिया यासारख्या काही राज्यात फेरमतमोजणी (recounting) घ्यावी, अशी मागणी केली, जी फेटाळली गेली.त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प समर्थकांमार्फत संपुर्ण अमेरीकेत विविध आंदोलने करण्यात आली. ज्याचा शेवट व्हाईट हाउस आणि कँपिटा (आपल्या भारतातील नवी दिल्ली येथे असणाऱ्या नाँर्थ ब्लाँक आणि साउथ ब्लाँक सारखा प्रदेश) याच्या जवळ असणाऱ्या प्रेसीडीनयशील मैदानात होणार होता. त्या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प त्यांना संबोधित करणार होते. त्याप्रमाणे ते संबोधित करत असताना त्यांनी दिलेल्या" आम्ही हार मानणार नाही" या घोषणेमुळे तेथील जनता अत्यंत आक्रमक झाली, ही आक्रमक जनता  तेथील कँपिटा बिल्डींग (आपल्या संसद भवनाच्या समकक्ष)मध्ये शिरली. तिथे क्राँग्रेसच्या ( अमेरीकेच्या केंद्रीय विधीमंडळाला क्राँंग्रेस म्हणतात,  आपल्या संसदेच्या समकक्ष) दोन्ही सभागृहात (सिनेट (लोकसभा समकक्ष )आणि हाउस आँफ रिपेझेनटिव्ह  (राज्यसभा समकक्ष) राष्ट्रपती निवडी संदर्भात कामकाज सुरू होते. त्याठिकाणी निषेध करण्यासाठी जात असताना तेथील सुरक्षा रक्षकांनी अडवल्याने सुरक्षा रक्षक आणि समर्थक यांच्यात चमकम उडाली, ज्यामध्ये समर्थकांना नियंत्रणात ठेवण्यासाठी सुरक्षारक्षकांकडून  अश्रूधूर , बंदूकीच्या फैरी झाडणे, आदी उपाय योजण्यात आले. ज्यामुळे हा मजकूर लिहीत असेपर्यत 4 जणांना प्राणास मुकावे लागले आहे. या घटनेचा अमेरीकेसह जगभरातील नेत्यांनी निषेध केला आहे. आणि तसेही आधूनिक जगातील पहिल्या काही लोकशाही असणाऱ्या देशात असे प्रकार होणे निंदणीयच नाही का?  तिसऱ्या जगात असे प्रकार घडल्यास एकवेळ आश्चर्य वाटणार नाही, पण पहिल्या जगाचे प्रमुख केंद्र असणाऱ्या अमेरीकेत असे प्रकार घडावेत? 

             जागतिक परीपेक्ष्याचा विचार करता, हुकुमशाही प्रवृत्तीच्या , अवास्तव अतिरेकी स्वरूपाचा राष्ट्रवाद असणाऱ्या  व्यक्ती जगभरात निवडून येत आहे जसे  तूर्कस्थानात एर्डोगन, रशियात पुतीन,  त्याच मालिकेत आता अमेरीकेची ही घटना बघावी लागेल, जे निकोप लोकशाहीसाठी धोकादायक आहे. 
             डोनाल्ड ट्रम्प यांची वादाची मोठी पार्श्वभूमी आहे. त्यांंचा बिल्डरचा व्यवसाय, रशियाचा त्यांचा निवडीतील सहभाग, सारेच सातत्याने वादाच्या ठिकाणी होते. त्यात आता ही भर पडली आहे. लोकांनी निवडलेल्या जनमताचा आदर करत डोनाल्ड ट्रम्प सम्मानाने पाय उतार होतील, अमेरीकी संविधानाच्या 25 व्या घटनादूरुस्तीने अमेरीकी काँग्रेसला मिळालेल्या अधिकाराचा वापर करत डोनाल्ड ट्रम्प यांना अशरक्षः शर्टाची काँलर पकडत बाहेर काढण्याची वेळ येणार  नाही, असी आशा व्यक्त करत सध्यापुरते आपली रजा घेतो ,नमस्कार


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?