हिवसाळ्याचा निमित्ताने


आज गुरुवार  दिनांक 2021 जानेवारी 7 रोजी नाशिकमध्ये भर दुपारी सुमारे दिडतास मुसळाधार पाउस झाला. याआधी डिसेंबर 2020 मध्ये पाउस पडला होता,त्यामुळे "नाशकात हिवसाळा हा ऋतू सुरु झाला आहे' , 'स्वेटर घालावा की रेनकोट असा प्रश्न नाशकातील हवामानामुळे निर्माण झाला आहे, अश्या आशयाचे मेसेज सोशल मिडियामध्ये  वेगाने फिरु लागले.  विनोदासाठी या प्रकारचे मेसेज उत्तम असले तरी पर्यावरणाचा प्रश्न किती गंभीर बनला आहे. याची  साक्षच हा पाउस देत आहे.
             हवामानबदलामुळे 2020साली सर्वाधिक हानी पोहलेल्या देशांमध्ये भारताचा क्रमांक पहिला आहे, अशा अहवाल नुकताच सयुंक्त राष्ट्रसंघातर्फे प्रसिद्ध करण्यात आला आहे, त्या पार्श्वभूमीवर बघीतल्यास या पावसाचे गांभीर्य लक्षात येते.पाश्चात्य देशातील निवडणूकांमध्ये राजकीय पक्षांच्या जाहिरनाम्यात हवामान बदल हा विषय असतोच, आपल्याकडे काय विषय असतात? हे आपण जाणतातच.नाही म्हणायला शालेय आणि महाविद्यलयीन स्तरावर आपणाकडे पर्यावरण हा विषय शिकायला असतो, मात्र त्याचे अपेक्षीत परीणाम साध्य होतात का ? हे ही आपणास माहिती आहेच. काही जागरुक नागरीक याबाबत सातत्याने प्रयत्न करत  आहेत, हे मला माहिती आहे. मात्र त्यांचे प्रयत्न हवामान बदलाच्या आक्राळविक्राळ स्वरुपाच्या संकटापुढे थिटे पडता आहेत, हे नाकरण्यात काही अर्थ नाही. या प्रयत्नाची गती सतत वाढती ठेवणे आता अत्यंत गरजेचे झाले आहे. तर आणि तरच आपण हवामान बदलाला तोंड देवू  शकू 

माझ्या आकलनानूसार सध्या होत असलेले पर्यावरण रक्षणाचे बहुतांशी प्रयत्न हे शहरी भागात होत आहेत, मात्र या हवामान.बदलाच्या संकटात सर्वाधिक पिसल्या जाणाऱ्या ग्रामीण भागात तूलनेने कमी प्रयत्न होत आहेत. त्याची गती सुद्धा आपणास वाढवावी लागेल. सध्या आपण ज्या मुद्यांवरुन एकमेकांशी भांडतोय ते मुद्दे तात्कालीक आहे. मात्र हवामानबदलाचे संकट सार्वत्रीक कायमस्वरुपाचे आहेत. या संकटाला  लोक जात, धर्म, भाषा,वर्ण, लिंग ,गरीब श्रीमंत असा कोणताही  भेद न बघता सामोरे जाणार आहेत. समस्त मानवजातीसमोरचे हे संकट आहे. जर मानवजातच राहिली नाही, तर भांडणार  तरी कुणाशी ? त्यामुळे हे मुद्दे अस्तिवात राहण्यासाठी तरी आपण हवामान.बदल या संकटाशी लढले पाहिजे.
या हवामान बदलाच्या संकटात सर्वाधिक नुकसान हे गोर गरीब जनतेचे होणार आहे. त्यांना रोजच्या जीवनाची भ्रांत असल्याने ते स्वतःहुन याबाबत काहीच करु शकणार नाहीत, इच्छा असली तरी ते याबाबत काहीच अरु शकणार नाहीत. त्यामुळे तरी आपण त्यांना या संकटापासून वाचण्यासाठी हात देवूया , मग लागणार ना हवामान बदलाच्या संकटाशी लढायला 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?