गेली ती नाशिक पुणे रस्त्यातील रंजकता

 

 आजचीच गोष्ट आहे. सहजच व्हाँटसपवर बघत असताना एका व्हाँटसप ग्रुपवर एक पोस्ट दिसली.पोस्टमध्ये मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर झालेले बदल आणि त्यामुळे प्रवाश्यातील मज्जा कशी संपली, हे सांगितले होते. पोस्ट वाचल्यावर मी सातत्याने प्रवास करत असलेल्या नाशिक पुणे रस्त्यातील गेल्या काही वर्षापासुन  झालेले बदल डोळ्यासमोरुन झरझर जावू लागले. ते आपणापर्यत पोहचवण्यासाठी आजचे लेखन .
      नाशिक पुणे रस्त्यातील चंदनापरी घाटाची मज्जा  काही औरच असायची. तेथील वेडीवाकडी वळणे,  गणपतीची मुर्ती याची गंम्मतच काही और होती.  नाशिककडून येताना घाटातील अवघड टप्पा चांगल्या पद्धतीने पार पडल्याबद्दल आभार मानायला आणि पुण्याकडून येताना हा टप्पा चांगला  पार पडण्यासाठी प्रार्थना करण्यासाठी अनेकांचे हात सहजतेने जोडले  जात असे .मी गमतीने मनोमनी  घाटात घाट चंदनापुरी असे माझ्या मित्रांना म्हणत असे.चंदनापुरी घाटातून पुण्याकडे जाताना दिसणारे नेढे(डोंगराला पडलेले  भोक ज्यातून आरपार जाता येईल असे मोठे छिद्र ). तर पुण्याकडून नाशिकला येताना  अवघड वळणानंतर डाव्या बाजूला दिसणारी इंग्रजी  व्ही आकाराची चढण, तर यापुर्वी या परीसरात काय काय भौगोलिक चमत्कार घडले आहेत?   हे सांगणारा ( चंदनापुरी घाट भौगोलिक बदल अभ्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. ज्यांना प्राकृतिक भुगोलाचा अभ्यास करायचा आहे, त्यांचासाठी हा स्वर्गच म्हणायला हवा) वस्तूस्थितीदर्शक पुरावाच म्हटले तर चूकीचे होणार नाही     

     पुण्याकडून येताना संगमनेर शहराच्या सुरवातीच्या तो अरुंद पुल , त्यावरुन होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे येणारी मज्जा तसेच संगमनेर शहरातून जाताना तिन बत्ती भागातून जाताना येणारी मजा काही औरच होती. तेथील इंग्रजी एन सारखी वळणे, गर्दीचा धोका अंगावर घेत एसटी डायव्हरचा बस पुढे नेण्याचा प्रयत्न (आता ही रंजकता संगमनेर बायपासमुळे काहीसी कमी झाली असावी). नाशिककडून येताना  अमृतवाहिनी काँलेज दिसले की समजायचे संगमनेर आले.नाशिक पुणे प्रवाशाचा सुमारे एक तृतीयांश  भाग संपल्ययाची ती खुण होती. संगमनेर बसस्टँडमध्ये रस देण्यासाठीची विक्रेत्यांची गडबड काही औरच असायची. पुण्याकडून येताना आळेफाटानंतर सुरु झालेल्या उतारावरुन जाताना ब्रेक मारला की समजायचे बोटा गाव आले, त्यानंतर गतीरोधक आले की संगमनेर आल्यची खुण पटायची , आणि शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी पुण्यात वास्सव्यास असणाऱ्या मला नाशिक जवळ आले आहे. हे समजायचे, आणि आतापर्यत फोनवर भेटणारे आतेप्ठ मित्र परीवार प्रत्यक्षात भेटणार म्हणून अत्यंत आनंद.होण्यास ,सुरवात होयची. तर आळेफाटाच्या चढ चढताना आता पुण्यात पोहोचल्यावर पुन्हा एकदा रहाटगाडे सुरु होणार याची खुळगाठ दिसायची.           
      हे सगळे आता इतिहासजमा झाले आहे, अथवा होत आहे.आपल्या जगात बदल हाच सदैव कायमस्वरुपी टिकणारा घटक मान्य केले आणि या रस्त्यावर नविन गमतीजमती येतील हे मान्य केले तरी  जूने ते सोने हेच खरे.त्याची सैर अन्य कोणाला येणे कदापी शक्य नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?