आत्महत्या एक दुर्लक्षीत जीवघेणी समस्या

             

   सध्या कोणतीही वर्तमानपत्रे चाळली असता त्यामध्ये आत्महत्येचा बातम्या दिसतातच . एखादे वर्तमानपत्र जर रोज डोळ्याखालून घातले तरी त्या वर्तमानपत्रात आलेल्या दिसतात . आणि या आत्महत्या करणाऱ्या लोकांचा वयोगट जर बघितला तर त्याचा वयोगट प्रामुख्याने  तिशीच्या आतबाहेर असल्याचे आपणास सहजतेने दिसते . खरेतर हे वय काही करून दाखवण्याचे मात्र या वयात हि माणसे आपली जीवनयात्रा संपवतात . मात्र एखाद्या खेळाडूच्या वैयक्तिक आयुष्यावर प्रचंड खाल करणारी आपली पारंपरिक माध्यमे ज्या प्रमाणात  प्रकाश टाकायला हवा  त्या प्रमाणात प्रकाश टाकत नाहीत . असे माझे निरीक्षण आहे .(माझे निरीक्षण परिपूर्ण आहे अशा माझा मुळीच दावा नाहीये ) त्यामुळे या नवमाध्यमाद्वारे त्याविषयी सांगण्यासाठी आजचे लेखन 
           तर मित्रानो अकबर आणि बिरबलाची माकडिणीचीगोष्ट आपल्याला माहिती असेलच एकदा बिरबल अकबर फिरायला गेल्यावरत्यांना  एका मोकळ्या हौदात एक माकडीण आपल्या पिल्लासोबबत खेळताना दिसते,   हे  बघून अकबर बिरबलास म्हणतो बघ त्या माकडणीचे आपल्या पिल्लवर किती प्रेम आहे . बिरबल अकबरला  थांबवून त्या हौदात पाणी सोडायला सांगतो .त्या हौदात जसजसे पाणी वाढते तसतसे ती माकडीण अस्वस्थ होते आणि हौदात फिरायला लागते .जेव्हा तिच्या नाकातोंडात पाणी जायला लागते त्या वेळी ती आपल्या पिल्लाला पायाशी घेत त्याच्यावर उभी राहते . आणि मग बिरबल अकबरला म्हणतो बघा प्रत्येकाला आपला जीव प्रिय असतो . आपल्याला    पण हे उदाहरण लागू होते  एकटा प्रिय असलेला जीव कोणीपण सहजासहजी का सोडून देईल ? 

             आत्महत्या करणाऱ्यांना आपल्याकडे कमकुवत समजण्याची मानसिकता आहे., ज्याला खऱ्या आयुष्यात संकटाला सामोरे जाण्याची ताकद नसते . अशी भित्री  माणसे  आत्महत्या करतात असे आपल्याकडे सर्वसाधारणपणे समजले जाते  जे माझ्या मते चुकीचे आहे . आत्महत्या हा प्रकारचा खूनच समजायला हवा दुर्दैवाने एखाद्या संकटात सापडलेल्या मनुष्याला आपल्याकडे आधार देण्याऐवजी तू माझे ते ऐकले नाहीस म्हणून या संकटात आलास जर माझे ऐकले असते तर या संकटात सापडला नसतास असे म्हणून अयोग्यवेळी उपदेशाचे दोष पाजले जातात . ज्यावेळी खरेतर खोटे असले तरी त्याचा मनाला आनंद वाटेल असे बोलणे योग्य असताना  वस्तुस्थितीची जाणीव असावी असे म्हणून अप्रिय असे सांगितले जाते .परिणामी परिस्थितीमुळे आधीच हतबल झालेल्या व्यक्तीचा उरला सुरला आत्मविश्वास गळतो . परिणामी जे होऊ नये असे वाटत असते तेच होऊन जाते . सध्याचा तीव्र स्पर्धेच्या काळात दुसऱ्याचे म्हणणे आपले काही मतप्रदर्शन ना करता नुसते ऐकून घेणे आवश्यक आहे .            सन  2019 डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात इंडियन  मेडिकल असोशियान (IMA)चा एक अहवाल प्रसिद्ध झाला होता ज्यामध्ये भारतात मानसिक रोग्यांचे प्रमाण चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले होते . मात्र करोना संसर्ग रोखणे आणि अर्थव्यवस्थेचा समस्येमुळे केंद्र सरकारने यावर काही कार्यवाही ना केल्याचीच शक्यता आहे . 

         आपल्याकडे शालेय विद्यार्थ्यांपासून याबाबत सजग करण्याचे प्रयत्न झाले पाहिजे . तर आणि तरच सध्या ज्याप्रमाणे वर्तमानपत्रात येणाऱ्या आत्महत्येच्या बातम्या येत आहे , त्याचा संख्येवर काही प्रमाणात प्रतिबंध करण्यात येऊ शकतो ,यास लवकरात लवकर सुरवात होवो ,अशी  अशा बाळगत सध्यापुरते इथेच थांबतो , नमस्कार .  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?