एका हुकुमशहाचा अस्त ?

       

         ही गोष्ट आहे, एका सत्ताधिकाऱ्याची . एक अस्या सत्ताधिकाऱ्याची जो गेली 20 वर्षे सत्तेत आहे. सध्याचा त्याचा कालावधी जर विचारात घेतला तर हा कालावधी होतो तब्बल 24 वर्षे.बर हा सत्ताधिकारी देशाच्या सर्वोच्च स्थानी बसण्याचा आधी त्या देशातील महत्तवाचा शहराचा महापौर असतो. तत्कालीन  सत्ता प्रमुख जो अट्टल मद्यपी असतो. देशातील वाढता असंतोष बघून तो तत्कालीन सत्ताधीश टिव्हीवर जाहिर करतो, मी राजीनामा देत असून माझा उत्तराधिकारी हा असेल. आणि या सत्ताधिकाऱ्याचा जन्म होतो, या सत्ताधिकाऱ्याने याचा आधी त्या देशाच्या गुप्तहेर म्हणून कामही केले असते. देशाच्या संविधानात सलग तीनदा सत्तेच्या मुख्य स्थानी राहण्याची अनुमती नसल्याने तो दोन टर्म झाल्यावर एक टर्म आपल्याच चेल्याला उभा करतो. त्याची टर्म संपल्यावर पुन्हा सत्तेचा मुख्यस्थानी विराजमान होतो. मी बोलत आहे, रशियाचे अध्यक्ष ब्लादमीर पुतीन यांच्याविषयी 
            सध्या त्यांच्या विरोधात उणे पन्नास अंश सेल्यीयस तापमान असताना रशियाचा सुमारे 70 शहरात निदर्शने चालू आहेत. रशियन पोलीस निदर्शकांवर पाशवी पद्धतीने मारहान करणे,  त्यांच्यावर अश्रूधूराचा मारा करणे, अतीथंड पाण्याचा मारा करणे, हे उपाय योजून पांगवण्याचा प्रयत्न करत आहे. आतापर्यंत रशियन पोलीसांनी 3 हजार लोकांना अटक केली आहे. आणि हे घडत आहे, ते पुतीन यांची भष्ट्राचाराची कृष्णकृत्याची कृत्ये  आपल्या प्राणांची बाजी लावून जगासमोर आणणाऱ्या एका व्यक्तीचा अटकेमुळे अँलेक्सी नवाली   हे त्यांचे नाव .

            1976 जून 4 रोजी युक्रेनमध्ये जन्मलेले  अँलेक्सी नवाली कट्टर पुतीन विरोधक समजले जातात.त्यांनी 1999साली राजकारणात प्रवेश केला. त्यांनी सुरवातीला याबलोको  या  पक्षात कार्य केले. ज्याची विचारधारा  लिबरल ( याला मराठीत काय म्हणतात ? ते सांगावे). आहे. पक्षाच्या शीर्ष नेत्यांशी मतभेद झाल्यामुळे  त्यांना 2007 साली त्या पक्षातून काढण्यात आले. हळूहळू  त्यांनी स्वतःची भष्ट्राचारविरोधी आघाडी काढली. आणि पुतीनविरोधी भष्ट्राचाराची मोहिम जोरात सुरू केली.
             त्यांना 2020 आँगस्ट 20 मध्ये चहातून विष देवून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. जो त्यांचावर झालेला तीसरा हल्ला होता.या आधी त्यांच्यावर 2018 आणि2019 मध्ये त्यांचावर हल्ला झाला होता 2020 आँगस्ट20 रोजी झालेल्या हल्यात ते बेशुद्धावस्थेत गेले. रशियात योग्य उपचार होत नाही, हे लक्षात आल्यावर त्यांचा कुटुंबियानी बर्लिनकडे धाव घेतली.तिथून उपचार घेवून बरे झाल्यावर ते रशियात आले. ते रशियात आल्यावर लगेचच त्यांना अटक करण्यात आली. आणि त्यांचा अटकेच्या विरोधात अत्यंत थंडगार वातावरणात रशिया पेटला.ते रशियात आल्यावर अटक होण्याचा आधी त्यांना मिळालेल्या थोड्या वेळात त्यांनी युट्युबवर एक व्हिडिओ पोस्ट केला. ज्यात रशियाच्या पुर्व सीमेवर असलेल्या काळा समुद्राच्या किनाऱ्यावर त्यांनी स्वतःसाठी अलिशान महाल बांधला . त्याचे आवार त्यापासून जवळ असणाऱ्या शहरापेक्षा जास्त असल्याचे सांगितले आहे.

            सध्या रशियाची आर्थिक स्थिती वाईट आहे. 2014 मध्ये रशियाने युक्रेन देशावर आक्रमण करुन त्यांचा रशियन भाषिक प्रांत क्रिमीया आपल्याकडे घेतल्यावर अमेरीका आणि युरोपीय देशांनी त्याचावर निर्बंधे घातली . तसेच त्यांची जी8 या संघटनेतून हक्कालपट्टी केली. त्यामुळे  तेल उत्पादन आणि शस्त्राचे यांचा देशाच्या  निर्यातेमध्ये सुमारे55%  वाटा असणाऱ्या रशियाची आर्थिक घडी फिस्कटवली. ती इतकी फिस्कटली की सध्या  74 ते 75 रुबाल (रशियाच्या चलनाचे नाव) दिल्यावर एक अमेरिकी डाँलर मिळतो. एक लाख रुबाल दिल्यावर 96 हजार भारतीय रुपये मिळतात.यामुळे रशियातील जनता प्रंचड त्रासलेली आहे. ज्याचे प्रत्यंतर सध्या रशियामध्ये दिसत आहे. 
         एकेकाळच्या जागतिक महासत्ता असणाऱ्या आणि सध्याचा काळातील जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा असणाऱ्या{ अधिक माहितीसाठी अमेरीकेचे क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य अलास्का आहे जे रशियाने अमेरीकेला विकले आहे. }देशाची वाटचाल कुठे होते हे बघणे उत्सुकतेचे ठरेल. यातील घडामोडी तूमच्या पर्यत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असेलच, तूर्तास इतकेच, नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?