दादासाहेब फाळके एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व!

             आज 2021 फेब्रुवारी 16 अर्थात भारताच्या चित्रपटश्रुष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा 75वा स्मृती दिन . त्यानिमित्ताने आज अब्जावधीची उलाढाल करणाऱ्या भारतीय चित्रपटश्रुष्टीच्या जन्मदात्यास विनम्र आदरांजली.
           समाजात कोणतीही नविन गोष्ट रुजवणे कधीही कठीणच असते, मात्र एकदा रुजली की तीची वाढ होण्यास तितकासा त्रास होत नाही. हा निसर्गाचा नियम भारतीय चित्रपटश्रुष्टीला देखील लागू होतोच. त्यामुळे दादासाहेब फाळकेंना भारतात ही कला रुजवण्यासाठी प्रचंड कष्ठ घ्यावे लागले. त्यांना या नविन कलेबाबत लोकांनी नाना प्रश्न विचारुन भंडावून सोडले. त्यांचाबरोबर काम करण्यास नकार दिला, जे आपण हरीश्चंद्राची फँक्टरी या चित्रपटात बघीतले आहेच.
 त्र्यंबकेश्वर सारख्या आजही धार्मिक कार्यासाठी विख्यात असणाऱ्या आणि क्षेत्रफळाचा विचार करता जेमतेम असणाऱ्या गावात त्यांचा जन्म झाला होता, ही गोष्ट दुर्लक्षून चालणार नाही. एखाद्या मोठ्या महानगरातील व्यक्तीने भारतीय चित्रपटश्रुष्टीची निर्मिती  केलेली नाही. तर आजही प्रचंड धार्मिक पगडा असणाऱ्या गावातील व्यक्तीने ती केली आहे. ही बाब आपण विशेषतत्वाने लक्षात घेणे आवश्यक आहे.त्यांचा कार्याची महती यामुळे अधिकच वाढते, असे मला वाटते.
             दुर्देवाने त्यांची जन्मभूमी असणाऱ्या त्र्यंबकेश्वर अथवा त्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या नाशिकमध्ये त्यांची काहीही गौरवास्पद खुणा जपून ठेवलेल्या नाहीत. नाही म्हणायला जून्या नाशकात वडाळनाका परीसरात त्यांचा नावे एक रस्ता आहे. आणि नाशिकच्या इंदीरानगर या उपनगरात त्यांच्या नावे एक संग्रालय आहे, मात्र या संग्रालयाच्या स्थितीबाबत न बोललेलेच बरे.असो.
          त्यांचा नावे बाँलीवूडमध्ये एक पुरस्कार आहे, मात्र त्यांना अजूनही भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आलेला नाही. भारतात एका मोठ्या उद्योगाची पायाभरणी करणाऱ्या व्यक्तीबाबतची ही उदासिनता अयोग्यच म्हणावी असी आहे. असो .
           आपण आयफा सारख्या पुरस्कारांचे रंगतदार सोहळे बघतो. ते ज्या चित्रपटांवर आधारीत असतात .त्याची सुरवात दादासाहेब फाळकेंनी केली होती. आज हजारो लोकांचा पोटापाण्याचा आणि अब्जावधी रूपयांची उलाढाल करणाऱ्या व्यवसायाची मुहुर्तमेठ त्यांंनी रोवली. या अर्थाने त्या सर्वांचे अप्रत्यक्ष पालनकर्ता म्हणून त्यांना  संबोधतल्यास वावगे ठरणार नाही. आज त्यांची 75वी पुण्यतिथी या निमित्ताने त्यांना पुनश्च आदरांजली वाहुन सध्यापुरते थांबतो नमस्कार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?