महाराष्ट्र एस टी जिंदाबाद !

 

    दिनांक 14 फेब्रुवारी रोजी मी जव्हार मार्गे नाशिक ते ठाणे प्रवास केला . या प्रवासादरम्यान मला नव्याने जाणवलेल्या  सर्वसामान्यांप्रती असणाऱ्या आपल्या एसटीच्या बांधिलकीवर  प्रकाश टाकण्यासाठी आजचे लेखन .       तर मित्रांनो, आपल्या एसटीचे अनेक मार्ग हे कोणत्याही व्यवसाईक गणिताचा विचार न करता निव्वळ लोककल्याणाचा हेतूने आखलेले असतात. अन्य खासगी वाहतूकदार ज्या मार्गाने कधीही सेवा देणार नाही. अस्या मार्गावर देखील आपली एसटी सेवा देते. जसे  नाशिकच्या ठक्कर बझार स्टँडहुन दुपारी दोन वाजता सुटणारी नाशिकहुन ठाण्याला मोखाडा वाडा मार्गे जाणारी बससेवा होय. गरीबातील गरीब देखील नाशिकहुन ठाण्याला जाण्यासाठी ही बससेवा वापरणार नाही. शहराच्या व्यक्तींना जवळच्या खेड्यात जाण्यासाठी किंवा खेड्यातील व्यक्तींना जवळच्या शहरात येण्यासाठी या प्रकारची सेवा वापरली जाणार , हे निश्चित .या प्रवासात जव्हार या ठिकाणी मी बसस्टँडवर बघीतलेली जव्हार -कसारा- मोखाडा ही सेवा देखील याच प्रकारात मोडणारी .जर आपण नकाशा बघीतला तर मोखाड्याहून जव्हारला सरळ रस्ता आहे. मात्र वाट वाकडी करुन खेड्यातील लोकांना चांगली सेवा देणारी आपली एसटी खरोखरीच महान ठरते.

      सध्या आपल्या एसटी महामंडळ अत्यंत तोट्याचा सामना करावा लागतोय.तसेच केंद्र सरकारच्या सरकारी आस्थापनातील वाटा कमी करण्याचे धोरण आहे. ज्यामुळे होवू नये पण महामंडळाचे खाजगीकरण झालेच तर, नवीन मालक या मार्गावर आपली सेवा देईल का? हा प्रश्न उरतोच.
मी ठाण्याहून परत येताना शिवशाहीने परत आलो. गाडीत 32 जणांची जागा असताना गाडीत फक्त 16 जण होते. गाडी शहापूरनजीक चहापानासाठी थांबली असता गाडीत कोणीही बसलेला नसताना निव्वळ एसी चालू रहावा या हेतून इंजिन आयडीलवर तब्बल वीस पंचवीस मिनीटे सुरु होते. मी याबाबत काही लोकांशी बोललो असता.सुमारे अर्धा ते पाउण लीटर डिझेल यामुळे वाया जावू शकते. सध्याचा डिझेल दरवाढीच्या काळात अश्या प्रकारे प्रत्येक वेळी अर्धा ते पाउण लीटर इंधन वाया घालवणे खचितच योग्य ठरणार नाही. त्यामुळे एसटी प्रशासनाने यावर विचार करणे अत्यावश्यक आहे. 
कारण लाख मेले तरी चालतील मात्र लाखोंचा पोसिंदा जगायला हवा, या न्यायाने लाखो लोकांना खेडोपाडी आणि शहरात येण्याचे काम व्यावसाईक हेतू मनात न ठेवता करणारी ही व्यवस्था टिकणार की नाही , हे यावरच अवलंब आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?