वंदन धगधगत्या अग्निकुंडाला !


स्वातंञ्यवीर विनायक दामोदर सावरकर हे आपल्या भारतमातेचे असे एक सुपुञ होते कि ज्यांना स्वत:हून लोक स्वातंञ्यवीर म्हणत मला तरी जगात स्वातंञ्यवीर सावरकरांखरीच असा एकही व्यक्ती माहीती नाही की ज्याला लोक Liberty warrior or Independent warrior /Freedom warrior अश्या नावाने ओळखले जाते  हिंदू धर्मात पहिल्या पूजेचा  मान मिळालेल्या गणपती चे नाव घेऊन आलेल्या नाशिकजवळच्या भगुरचा या वीराची महती इथेच संपत नाही सावरकरांनी काय केले याच्या ऐवजी काय केले नाही असे विचारणे जास्त संयुक्तीक ठरेल त्यांनी भाषेबाबत कार्य केले त्यांनी सयमसुचकता म्हणजे काय ? ती कशी वापरतात याचा वस्तुपाठच घालून दिला

सिध्दहस्त लेखक म्हणजे काय याचा वस्तू पाठच जणु सावरकरांनी घालून दिला त्याचे लेखन मुलत: वाचले कि कळते एखाद्या भाषेवर प्रभुत्व म्हणजे काय पलेदार शब्द लांबलचक वाक्य अश्या साजशृंगीत भाषेत लेखन करावेत ते सावरकरांनीच सध्या त्यांचे जे लेखन प्रसिध्द केले जाते ते बहुसंख्य वेळेस पुनर्लेखन  केलेले साहित्य असते त्यांचे मुळ साहित्य जो वाचेल त्याची मराठी अम्रुताहूनी मधुर होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे त्यांचे कमला हे मराठीतील माझ्या माहितीतील तरी एकमेव खंडकाव्य आहे मराठीतील सर्वोत्क्रुष्ट लेखक म्हणून भी तर त्याचेच नाव घेईल आणी अत्यंत हालपेष्टा सहन करत त्यांनी ही साहित्यरचना केली है विशेष 

 सावरकर यांनी मराठीला दिलेले योगदान पण खुप महत्वाचे आहे सध्या आपण सहजतेने वापरत असणारे कितीतरी शब्द हे मुळच्या इंग्रजी शब्दांना सावरकरांनी दिलेले मराठी शब्द आहेत हे आपणास जाणवत देखील नाही उदा संपादक संपादकीय वगैरे. मला स्वातंञ्यवीर सावरकरानंतर एकच व्यक्ती आढळते ज्यांनी मराठीत शिरलेल्या अन्य भाषिक शब्दांना मराठी शब्द दिले ती म्हणजे छञपती शिवाजी महाराज त्यांनी मराठी वरील फारशीचा प्रभाव दूर केला होता तर स्वातंञ्यवीरांनी मराठी   भाषेवरील इंग्रजीचा  प्रभाव दूर केला स्वातंञ्यवीर सावरकर यांनी मराठीत आणलेले कित्येक शब्द माञ रूढ होवू शकले नाहीत हे दुर्दैव मान्य करायलाच हवे

सावरकर यांचे मोठेपण येथेच संपत नाही त्याचातील अजून एक मला आवडलेला गुण म्हणजे त्यांची समयसुचकता त्याचा आयुष्यात ती जागोजागी दिसते मग थी जगप्रसिध्द मार्सेलीसची उडी असो किंवा त्यांनी दुसऱ्या  महायुध्दाचा प्रसंगी तरुणांना केलेला उपदेश असो या आणी अश्या प्रत्येक प्रसंगी त्यांची समयसूचकताच दिसते  स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गुणांची जरी यादी करायची म्हटली तरी एखाद्याची झोप उडू शकते

समाजसुधारक, विज्ञाननिष्ट, भाषातज्ज्ञ, उत्कृष्ट संघटक प्रखर देशभक्त, समयसुचक, सिध्दहस्त लेखक, भविष्यसूचक, बलोपासक, त्यांचा गुणांची यादी प्रचंड आहे माञ मी पामर दुर्दैवाने येव्हढीच करु शकलो असो मला सावकरांचा ऋषितुल्य  व्यक्तीमत्वातील आवडलेल्या गुणातील एक गुण म्हणजे त्यांच्यातील समाज सुधारक होय



अंदमानातील त्या छळछावणीतून सुटल्यावर रत्नागिरीत  सावरकरांना स्थानबध्दतेत ठेवले होते त्या वेळेस त्यांनी मानवतेचे महान मंदिर असे ज्याला म्हणता येइल असे पतितपावन मंदिर उभारले थी त्यांचा समाजसुधारणेची सुरवात होती त्यानंतर त्यांनी समाजातील जाती प्रथेवर प्रचंड प्रमाणात आसूड ओढले.  माझ्या माहितीतील तरी डॉ बाबा साहेब आंबेडकरांखेरीज  स्वातंञ्यवीर सावरकर एकमेव क्रांतीकारक आहे ज्यांनी समाजसूधारणेला पण महत्व दिले लोकमान्य टिळकांचा समाजसुधारणेवरून गोपाळ गणेश आगरकरांशी झालेले मतभेद जग जाहीर आहेच महात्मा फुले यांनी समाज सुधारणेला प्रचंड पाठबळ दिले पण त्यांची राष्टीय सभेविषयक मते प्रतिकूल होती माञ सक्रीय राजकारणात राहून समाजसुधारणा करणारे स्वातंञ्यवीर म्हणूनच ईतरांपेक्षा उजवे ठरतात
त्यांचे संघटन कौशल्यपण वाखण्याजोगे होते मिञमेळा पुढे ज्याचे अभिनव भारत असे नामकरण करण्यात आले ते उभारताना असो किंवा पुढे हिंदू महासभेचे कार्य करताना आपल्याला त्यांचातील उत्क्रुष्ट संघटक सहज दिसतो
विज्ञानप्रेम हा सुध्दा त्याचातील मला विशेष भावलेला गुण आहे.  प्रखर धर्मप्रेमी असूनही धर्मातील अनिष्ट चालीरीतीवर हल्ला चालवणारे समाजाने आता विज्ञानाची कास धरली पाहिजे हे सागणारे सावरकर खरोखर महान व्यक्तीमत्व होते गाय उपयुक्त पशू आहे मानवाने तिचा जास्तीत जास्त वापर केला पाहीजे किंवा माझा निधनानंतर माझे कोणतेही क्रियाक्रम करू नये असे म्रुत्यूपञात सांगणारे सावरकर मला त्यामुळे अधिकच वंदनीय ठरतात सावरकर म्हणजे हिंदूत्व असा संकुचित अर्थ घेणार्यांनी सावकरांचा या विचाराचा अभ्यास करण्याची नितांत गरज आहे काही  वर्षापूर्वी नाशकात आंतरराष्टीय स्वातंञ्यवीर सावरकर संमेलन झाले त्यात आलेला माझा अनुभव सांगून आपली या पोस्ट पूरती विस्तार भयास्तव रजा घेतो स्वातंञ्यवीर सावरकर ब्लॉगच्या एकापोस्ट च्या आवाक्यात येणारा विषयच नाही असो तर अनुभव असा आहे की या संमेलनात हिंदूत्व या विषयावर वक्त्यांचे विचार ऐकायला सभामंडपाचा दिडपट गर्दी होती म्हणजे सभामंडपाची जर तीनशे लोकांची क्षमता असेल तर साडेचारशे लोक आले होते माञ हिंदूत्व हा विषय संपल्यावर लगेच पाच मिनीटांनी विज्ञाननिष्ट सावरकर या विषयावर वक्ते आपले विचार मांडणार होते माञ त्यासाठी फक्त सत्तर ऐंशी लोक उपस्थित होते (आकड्याचा खरेपणावर बोलण्यापेक्षा मुद्दा समजून घ्यावा ही विनंती मि सभामंडपातील लोक मोजलेले नाहीत पण एक अंदाज येण्यासाठीचे काल्पनिक आकडे वापरलेले आहेत लोक किती प्रमाणात कमी झाले याचाअंदाज येण्यासाठी ) जय स्वातंञ्यवीर सावरकर जय स्वातंञ्यवीर सावरकर जय स्वातंञ्यवीर सावरकर


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?