बदलती शेजारची गणिते (भाग 1)


आपल्या भारतात करोनाविषयक बातम्यांनी, आणि महाराष्ट्रात पुजा  चव्हाण च्या मृत्यूविषयी माध्यमे बातम्यांचा रतिब घालत असताना, आपल्या भारताच्या शेजारील देशांमध्ये अनेक घडामोडी घडत आहे. ज्यामध्ये श्रीलंका, नेपाळ, आणि म्यानमार मधील घडामोडींचा उल्लेख अपरीहार्य आहे.  माझे आजचे लेखन त्याविषयी सांगण्यासाठी . पहिल्यांंदा श्रीलंका या देशाविषयी बघूया 
तर मित्रांनो आपल्या भारताच्या दक्षीणेला असणाऱ्या श्रीलंका या देशात दोन समांतर घडामोडीनी मोठी उलथापथ होत आहे. या दोन्ही घडामोडींशी भारताचा जवळचा सबंध आहे.त्यामुळे त्या आपणाला माहिती असणे आवश्यक आहे. पहिले जूना संदर्भ असलेली घटना बघूया
तर, सन 2018 मध्ये ख्रिस्ती धर्मिय बांधवांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या इस्टर डेच्या दिवशी श्रीलंकेत चर्चमध्ये स्फोट झाले होते,ज्यात काही लोकांचा मृत्यू झाला होता, त्या घटनेविषयी चौकशी करणाऱ्या आयोगाने नुकताच अहवाल सादर केला आहे. ज्यात त्यावेळचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरसेना  यांना या हल्ल्यासाठी दोषी धरुन त्यांना शिक्षा करावी ,असी सुचना करण्यात आली आहे. भारताकडून संभाव्य हल्ल्याची माहिती देवूनही आवश्यक ती कार्यवाही न केल्याने ही दुर्घटना घडली असल्याचे यात सांगण्यात आले आहे.या ठिकाणी विचारात घेण्याची गोष्ट म्हणजे मैत्रीपाला सिरसेना हे भारताला अनुकुल भुमिका घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. या उलट सध्या सत्तेत असणारे गोतबिया राजपक्षे, हे  चीनला अनुकूल होणारी भुमिका घेण्यासाठी विख्यात आहे. त्यांचा राजवटीत कोलोंबा बंदरातील पुर्व टर्मिनल विकसीत करण्याचे कंत्राट चीनला देण्यात आले आहे. कोलोंबा बंदरातील बराचश्या भाग या आधीच चीन विकसीत करत आहे. कोलोंबो बंदरातील पुर्व भाग विकसीत करण्यासाठी भारत आणि जपान सयुंक्तरीत्या प्रयत्नशील होते. मात्र हंब्बनपोटा हे बंदर चीनकडे गेल्याने श्रीलंकेत जनतेत असंतोष असल्याचे कारण देत श्रीलंकेने  कोलोंबो बंदरातील पुर्व भाग तूम्हाला विकसीत करण्यासाठी देता येणार नाही, असे सांगून हा प्रस्ताव नाकारला होता. मात्र त्यानंतर अत्यंत कमी दिवसात हे कार्य चीनकडे देण्यात आले. त्या घडामोडींचा पार्श्वभूमीवर याकडे बघायला हवे. तामिळनाडूतील जनतेचे श्रीलंकेतील तामिळींबरोबर कौंटुंबिक सबंध आहे. श्रीलंकेचा प्रसिद्ध गोलंदाज मुथ्थया मुरलीधरन् हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. आपल्या भारताचा एक चांगला पंतप्रधान आपण श्रीलंकेतील वादंगामुळे गमावला आहे. त्यामुळे श्रीलंकेतील घडामोडी आपल्यासाठी महत्तवाचा आहे.

आता बघूया दूसऱ्या घडामोडीकडे . या घडामोडीत श्रीलंकेबरोबर अजून एक सहभागी देश आहे, तो म्हणजे पाकिस्तान . पाकिस्तानची सुत्रे हातात घेतल्यावर प्रथमच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहेत . या आधी 1986मध्ये इम्रान खान पाकिस्तान क्रिकेट संघाचा कप्तान म्हणून श्रीलंकेत आले होते. त्यानंतर आता पाकिस्तानचा पंतप्रधान म्हणून दौरा करत आहे.या दौऱ्यात त्यांनी श्रीलंकेबरोबर अनेक करार केले आहेत. ज्याद्वारे त्यांचा श्रीलंकेला  आपल्या कंपूत अर्थात चीनच्या कळपात घेण्याचा प्रयत्न असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. यासाठी त्यांनी आर्थिक अवस्था वाईट असल्याने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी {(International monetary Fund) IMG} कडूनही कर्ज घेण्यास पात्र न.ठरलेल्या श्रीलंकेला 15  अब्ज अमेरीकी डाँलरचे साँफ्ट कर्ज दिले . [ जागतीक बँकेकडून कर्ज घेण्यासाठी अनेक बांबीची पुर्तता करावी लागते.तसेच कर्ज घेतल्यावर ज्या गोष्टीसाठी कर्ज घेतले  त्याच बाबींवर खर्च होत आहे. याचा अहवाल जागतीक बँकेला द्यावी लागते. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कर्जासाठी कमी बंधने असतात] साँफ्ट लोन हा दिर्घ मुदतीसाठी कर्जाच्या बदल्यात वस्तू खरेदी करण्याचा प्रकार असतो. पाकिस्तानने श्रीलंकेबरोबर केलेल्या  करारात पाकिस्नतान चीनच्या मदतीने तयार करणाऱ्या जे एफ 17 या प्रकारची किमान 5 विमाने खरेदी करण्याचे बंधन घालत आहे. 【 जे एफ 17 ज्या प्रकारची विमाने आहेत, त्याच प्रकारची भारताची विमाने म्हणजे तेजस होय,】
                पाकिस्तानने श्रीलंकेला दिलेले कर्ज म्हणजे एखाद्या भिकाऱ्याने त्याहुन गरीब असणाऱ्या व्यक्तीस केलेले अर्थसाह्य इतक्या संकुचित नजरेतून बघण्यासारखे नाही. किंबहूना कोणतीच आंतरराष्ट्रीय घडामोड या नजरेतून बघता येत नाही. उघडपणे श्रीलंकेला मदत करता येत नसल्याने चीनने अप्रत्यक्षरीत्या केलेली मदत म्हणूनच याकडे बघायला हवे. चीन आपल्या सभोवतालच्या देशांवर विविध प्रकारे नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करुन भारतविरोधी आघाडी उभारत आहे. त्याच कार्यक्रमातील एक साखळी म्हणून श्रीलंकेतील या दोन्ही घटनांकडे बघायलाच हवे. 
आपल्या भारताच्या नेपाळ आणि म्यानमार देशात सुद्धा अत्यंत वेवान घडामोडी घडत आहेत.त्याविषयी पुढच्या भागात बोलतो..तूर्तास इतकेच नमस्कार





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?