बदलती शेजारची गणिते (भाग3)


आपल्या भारताच्या 27 पैकी संवेदनशील राज्य म्हणून ओळख असणाऱ्या अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड, मणीपूर या राज्यांबरोबर एकंदरीत 1600 किमीची सीमा शेअर करणाऱ्या म्यानमारमध्ये 2021 फ्रेबुवारी1 रोजी लष्करी उठाव करुन जेमतेम बाळसे धरणाऱ्या लोकशाहीला गुंडाळल्यानंतर हा लेख लिहण्यापर्यत त्याविरुद्ध म्यानमारच्या नागरीकांनी जोरदारपणे आंदोलन सुरु केले आहे. म्यानमारला ब्रिटीश सत्तेपासून 1948 रोजी स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर 1962 पर्यत लोकशाही नांदल्यावर 1962 मध्ये उठाव करुन लष्कराने तेथील सत्ता हस्तगत केली. तेव्हापासून 2011 ते2021 चा कालखंड वगळता तिथे लष्कराचीच सत्ता राहिली.या 50 हुन अधिक वर्षाच्या लष्करी राजवटीत लोकशाहीसाठी1988आँगस्ट 8 रोजी झालेले आंदोलन आणि 2007 ला आंदोलन झाले .1988आँगस्ट 8 ला झालेले आंदोलन.हे 888 आंदोलन म्हणून ओळखले जाते. या आंदोलनामुळे तेथील लष्करी प्रशासन नमले नाही. मात्र 2007 साली काही महिने चाललेल्या आंदोलनामुळे लष्करी प्रशासन नमले.त्यांनी लोकशाहीचा देखावा तयार करण्यासाठी एक संविधान तयार केले. ज्यानुसार 2020 नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणूकीत गैरप्रकार झाले असे सांगून तेथील लष्कराने नव्या विधीमंडळाच्या पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लष्करी उठाव करुन सर्व लोकशाहीवादी नेत्यांना नजरकैदेत टाकले.त्याविरुद्ध मर्यादित का होईना लोकशाहीचा आस्वाद घेणाऱ्या म्यानमारच्या लोकांनी आंदोलन सुरु केले. ज्यामध्ये हा लेख लिहण्यापर्यत 7 नागरीकांचा मृत्यू झाला आहे. लष्कराने याविरुद्ध कडक पाउले उचलू असे सांगून देखील आंदोलने तीव्र स्वरुपाची आहेत. जर्मन मालकी असणाऱ्या DW या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार सध्या सुरु असणारे आंदोलन या आधीच्या आंदोनापेक्षा उग्र आहे.


म्यानमारला लागून असणाऱ्या भारताच्या राज्यात भारतापासून वेगळ्या होण्याचा कारवाया खूप आधीपासूनच सुरु आहेत. नूकतेच म्यानमारला लागून असणाऱ्या नागालँड या राज्याला केंद्र सरकारकडून अशांत प्रदेश म्हणून जाहिर करण्यात आले आहे. या प्रदेशातील फुटीरतावादी चळवळींना म्यानमारमधूनच वित्त आणि शस्त्रात्र पुरवठा होतो. लूटुपुटु का असेना लोकशाही सरकार असताना आपल्या सरकारने म्यानमारमध्ये घूसुन त्यांचा बिमोड केला होता.बांगलादेश आणि भारत तसेच म्यानमारच्या सीमा जिथे एकत्र येतात , त्याच भागात रोहिंग्या मुस्लीम राहतात. रोहिंग्या मुस्लिमांमुळे आपल्या भारतात झालेले राजकारण सर्वश्रुत आहेच. ईशान्य भारताशी सिलीगुडी काँरीडाँर वगळता इतरचा संपर्क रहावा म्हणून भारत बांगलादेशच्या समुद्र किनाऱ्याबरोबर म्यानमारच्या समुद्र किनाऱ्यावरुन ईशान्य भारताच्या सरहद्दीपर्यत रस्ता बांधण्याची कामे सुरु आहेत.त्यावर या राजवटीचा काय परीणाम होतो? हे बघावे लागेल. हा लेख लिहीत असताना मिळालेल्या माहितीनूसार म्यानमारच्या लष्कराने तेथील निकाल जाहिर केले असून तिथे अँग सँग स्यू की यांच्या पक्षाला दोन तिर्तूयांशपेक्षा जास्त जागा मिळालेल्या आहेत. मात्र लष्कराने सत्ता सोडलेली नाही.बघूया भविष्यात काय होते? माझ्या आपणापर्यत ते बदल पोहचवण्याचा प्रयत्न असेलच तूर्तास इतकेच.नमस्कार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?