राष्ट्रीय विज्ञानदिन विशेष !


आजपासून 91वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सन 1930 मधील . त्यावेळी पारतंत्र्यात, वैज्ञानिकदृष्ट्या अप्रगत  असणाऱ्या भारत या देशातील चंद्रशेखर वेंकटरामन् या शास्त्रज्ञाने लावलेल्या अदभूत शोधाची. मुक्तपणे विहार करणाऱ्या प्रकाशलहरीतील उर्जा आणि विशिष्ट ठिकाणी आदळून येणाऱ्या प्रकाशलहरींची उर्जा यात फरक असतो. मुक्तपणे विहार करणाऱ्या प्रकाशलहरी पेंक्षा विशिष्ट ठिकाणी आदळून येणाऱ्या प्रकाशलहरींची उर्जा कमी किंवा अधिक असू शकते, हाच तो शोध. ज्याला आज रामन् इफेक्ट म्हणून ओळखले जाते. या शोधामुळे चंद्रशेखर यांना भारतरत्नासह, ब्रिटीश सरकारकडून मानाचा सर या पुरस्कारसह जगभरात प्रख्यात असलेला भौतिक शास्त्राचा नोबेल पुरस्कार  आणि अन्य प्रतिष्ठीत पुरस्कार मिळाले. . हा शोध जाहिर झाला तो 1930 फेब्रुवारी 28 ला . आज भारतात आपण हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो.त्यानिमित्ताने सर्व विज्ञानप्रेमींना खुप खुप शुभेच्छा. 

            आज रामन इफेक्टचा वापर वैद्यकशास्त्र, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र यासारख्या अनेक ठिकाणी करण्यात येतो. आजच्या अद्यावत प्रकाशलहरींच्या अभ्यासाचा पाया हा रामन इफेक्टवर आधारित आहे, जो एका भारतीयाने शोधला आहे, याचा आपणास एक भारतीय म्हणून अभिमान असायला हवा.मित्रांनो, भारताने आतापर्यत नैसर्गिकशास्त्रात मिळवलेली सर्वात मोठी उपलब्धी आहे. यामुळे  विज्ञानामध्ये ही संकल्पना रुढ झाली.

      अजूनही आपल्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन पुरेस्या प्रमाणात रुजलेला नाही, तर आजपासून 91 वर्षापुर्वी काय परीस्थिती असेल, याचा विचारच करु शकतो. महाविद्यालयात  विज्ञानाचे शिक्षण घेणे , आणि वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाळगणे, या पुर्णतः भिन्न बाबी आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाळगने म्हणजे कोणतीही गोष्ट आहे, तसी अंधपणे न स्विकारता, बुद्धीला पटली तरच स्विकारणे. एखादी गोष्ट असी का ? तसी का नाही ? याबाबत प्रश्न पडणे.  तर्कबुद्धीचा अवलंब करणे. इतर करत आहेत म्हणून एखादी गोष्ट नकरता चौकस राहुन त्या गोष्टीची चित्किसा करणे होय. महाविद्यालयात कला अथवा वाणिज्य शाखेचे शिक्षण घेणारी व्यक्ती सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारी होवू शकते.याउलट महाविद्यालयात विज्ञानाचे शिक्षण घेणारी व्यक्तीसुद्धा  स्वतः.च्या वैयक्तिक आयुष्यात वैज्ञानिक दृष्टिकोनाला तिलांजली देणारी जीवनशैली अंगिकारु शकते. आपल्या भारतीय संविधानातसुद्धा 51अ या कलमा अंतर्गत नागरीकांनी वैज्ञांनिक दृष्टिकोन बाळगणे हे त्यांचे मुलभूत कर्तव्य सांगितले आहे. त्यामुळे राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्याने  "विज्ञान शाप की वरदान", मानवी आयुष्यात विज्ञानाचे महत्व/स्थान, विज्ञान नसते तर?, या सारख्या विषयांवर निबंध  वक्तृत्वस्पर्धा  घेण्याबरोबर समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजण्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. आधूनिक तंत्रज्ञानानेयुक्त मोबाईल वापरणे म्हणजे विज्ञाननिष्ठ नव्हे .त्यास विज्ञानाचे उपयोजन (Applied Science) म्हणतात.तर पुर्वी नसलेले तंत्रज्ञान शोधून त्यावर मोबाईल तयार करणे म्हणजे विज्ञाननिष्ठ होणे. जर आपण असे केले तर आणि तरच खऱ्या अर्थाने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरे करण्यासाठी लायक असू !  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?