अत्यावश्यक महत्त्वाचा मुद्यांंना बगल


व्यवस्थापनशास्त्रात कामाचे 4 प्रकारे विभाजन करण्यात येते. पहिल्या प्रकारात   महत्तवाची  आणि तातडीने करायला हवी असी कामे येतात.सध्याचा करोनाचा काळ वगळता इतर वेळचा विचार करता विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज भरायचा शेवटचा दिवस असताना परीक्षेचा अर्ज भरणे , हे या प्रकारचे काम म्हणता येईल. दुसऱ्या प्रकारात काहीसी  कमी महत्त असणारी  जी कामे केली नाही तरी चालेल मात्र जर करायची असल्यास आताच  करावी लागतील असी कामे येतात. उदाहरणार्थ हाउसफुल होणाऱ्या चित्रपटाला येतोस का? असे मित्रांनी विचारल्यावर येणारा प्रतिसाद तर   तिसऱ्या प्रकारात जी कामे करणे अत्यावश्यक आहेत. मात्र ती कामे आताच तातडीने केली पाहिजे असे नसते अशी कामे येतात. उदाहरणार्थ एखादे नविन कौशल्य शिकणे. तर चौथ्या प्रकारात जी कामे आताच तातडीने करायची गरज नसते. किंबहूना जी कामे केली नाही तरी चालू शकते, असी कामे येतात. उदाहरणार्थ व्यसन करत कट्यावर बसणे.  हे सविस्तर सांगायचे कारण म्हणजे 2021 फ्रेबुवारी 28 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी मन की बात या कार्यक्रमात केलेले भाष्य .

   माझ्यामते यात सांगितलेले सर्व कार्यक्रम हे तिसऱ्या प्रकारात मोडणारे आहेत. अर्थात हे  कार्यक्रम आवश्यक आहेत, यात शंकाच नाही.मात्र या कार्यक्रमापेक्षा अन्य महत्तवाचे प्रश्न  सध्या भारतात आहे. जे सोडवणे अत्यावश्यक आहे. यामध्ये भारतात असणारा बेरोजगारीचा प्रश्न, वाढत्या इंधन दराचा प्रश्न, देशात वाढत असणाऱ्या आत्महत्या आणि मानसिक  रोग्यांचे प्रमाण या प्रश्नांचा समावेश करता येईल. द हिंदू मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार जगभरातील सर्वाधिक आत्महत्या या आपल्या भारतात होतात .  यावर पंतप्रधानांनी काहीतरी भाष्य करणे अत्यावश्यक होते.ज्यावर त्यांनी अवाक्षर देखील काढले नाही. असो.
      पंतप्रधान यांनी मांडलेला जलसुरक्षेच्या मुद्दा महत्तवाचा आहे, आजमितीस आपल्या भारतासह जगभरात चांगले पाणी न मिळाल्याने विविध विकारांनी गस्त असणाऱ्या व्यक्तींची संख्या झपाट्याने वाढतीये. त्यांच्या आरोग्यासाठी चांगले पाणी आवश्यक आहे, यात वादच नाही.मात्र हे उपाय व्यक्ती जगल्यातरच करण्यास अर्थ आहे, आणि वाढते मानसिक अनारोग्य या समस्येमुळे जर व्यक्तींनी आत्महत्या करुन जीवन संपवले तर चांगल्या पिण्यायोग्य पाण्याची सोय कुणाला करणार ? आत्महत्या केलेल्या व्यक्तींच्या भुताला ? हिंदीत एक म्हण आहे , शिर सलामत तो पगडी पच्चास त्या म्हणीप्रमाणे व्यक्तीचा जीव वाचवणे आवश्यक आहे. व्यक्तीस राहण्याजोगी परीस्थिती निर्माण करणे त्या नंतरची स्थिती आहे. आजमितीस भारतात आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींचा संख्येत झपाट्याने वाढ आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य करणे आवश्यक होते.असो.
मात्र गेल्या काही महिन्यातील मन की बात चा विचार करता 2021 फेब्रुवारी तील मन की बात उत्तम होती , हे मात्र नक्की!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?