अवकाश क्षेत्रातील उभरती महासत्ता भारत !

           


सन 2021 चा राष्ट्रीय विज्ञान दिन भारताच्या इतिहासात सोन्याच्या अक्षरांनी लिहला जाईल . कारण या दिवशी भारताने  आपण अवकाश क्षेत्रातील ऊभारती महासत्ता असल्याचे जगाला दाखवूंन दिले आहे . या दिवशी जागतिक प्रमाणवेळेनुसार सकाळी पाच वाजण्याचा सुमारास(भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी साडेदहा वाजता ) स्वतःच्या 4 कृत्रिम उपग्रहांबरोबर अन्य दोन राष्टांचे प्रत्येकी एक आणि एका खाजगी अवकाश संस्थेचे  13 असे तब्बल 19 कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडले आहेत . हे सर्व कृत्रिम उपग्रह पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल या उपग्रह प्रक्षेपण वाहनातून सोडण्यात आले.  पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल या प्रक्षेपण वाहनाच्या DW प्रकारच्या वाहनातून हे उपग्रह अवकाशात झेपावले . पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल या प्रक्षेपण वाहनाचे हे 53वे उड्डाण होते . यासाठी केंद्र सरकारने 2019 जुलै 5  रोजी स्थापन केलेल्या  New Space India Limted { NSIL } या इसरो च्या व्यावसायिक हेतूसाठी स्थापन केलेल्या विभागाची मदत घेण्यात आली . 

 ब्राझील येथेही संशोधकांनी भारतीय संशोधकांच्या मदतीने स्वतः तयार केलेल्या अमोझोन 1 या उपग्रहांसह मेक्सिको देशाच्या एका उपग्रहा तसेच अमेरिकेच्या एका खाजगी अवकाश संशोधन संस्थेच्या 13 परदेशी उपग्रह यावेळी अवकाशात सोडण्यात आले . ब्राझील बरोबर उपग्रह निर्मितीसाठी सन 2014 मध्ये BRICS च्या अधिवेशनामध्ये मेमरांडं ऑफ अनडरस्टँडिंग  (MOU ) करण्यात आले होतेब्राझील मधील  शास्त्रज्ञांनी तयार केलेला हा पहिला उपग्रह होता  . ब्राझील मधीलच नव्हे तर जगातील प्रमुख नदी असलेल्या अमेझॉन नदीच्या खोऱ्यात असणाऱ्या जंगलांना लागणाऱ्या आगीच्या योग्य निदानासाठी याचा वापर होणार आहे . मेक्सिको आणि अमेरिकेच्या उपग्रहांच्या उपयोग संदेशवहनासाठी होणार आहे .भारतासाठी बंगालच्या उपसागरातील जहाजांवर लक्ष ठेवणे , संदेशवाहनासाठी तसेच नवीन अवकाश  युगाच्या आरंभ करण्यासाठी होणार आहे . अवकाश युगाच्या प्रारंभ करणाऱ्या उपग्रहाच्या एका सोलर पॅनेलवर नरेमद्र मोदी तर दुसऱ्या पॅनेलवर भागवत गीतेचे चिन्ह असणार आहे तसेच भारताच्या  एका खाजगी संस्थेकडून पाठवण्यात येणाऱ्या एक उपग्रहांवर काही  व्यक्तींची  नावे  कोरण्यात आली आहेत . 

एका चर्चच्या ओसाड पडलेल्या जागेत शब्दशः सायकलवरून रॉकेटचे भाग वाहून नेऊन ज्या देशाच्या अवकाश संशोधन संस्थेची सुरवात झाली त्या देह्ष्टीने कोणतीही विकसित देशाची मदत न घेता इथपर्यंत मारलेली उडी खरोखरीच अभिनंदनास पात्र आहे . भारतीय अवकाश संस्था यापुढे अशीच गगनभरारी घेवो , अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून सध्यापुरते थांबतो , नमस्कार 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?