पुन्हा अस्थिरतेच्या वळणावर पाकिस्तान

   

आपल्या भारताबरोबरच स्वतंत्र्य झालेल्या मात्र सुरवातीपासूनच लोकशाहीचा खेळखंडोबा झालेल्या पाकिस्तानात पुन्हा एकदा लोकशाही धोक्यात आली आहे. आपल्या भारताच्या  राज्यसभेच्या समकक्ष असणाऱ्या पाकिस्तानातील केंद्रीय विधीमंडळात अर्थात सिनेटमध्ये सदस्य निवडून आणण्यात सत्तारुढ पक्षाला अपयश आल्याने विरोधी पक्षांनी शनिवार दिनांक 5 मार्च 2021 रोजी अविश्वासाचा ठराव मांडण्याचे ठरवले आहे. जर हा ठराव समंत झाल्यास तेथील विधीमंडळ विसर्जीत होवून नव्या निवडणूका होतील. पाकिस्तानचा इतिहासात सध्याचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या आधी नवाज शरीफ हे एकमेव पंतप्रधान आहेत. ज्यांनी त्यांचा 5 वर्षाचा कालावधी पुर्ण करुन दुसऱ्या लोकनियुक्त सरकरकडे सत्ता हस्तांतरीत केली. नवाज शरीफ आता पर्यत 4ते5 वेळा पाकिस्तानचे पंतप्रधान झाले आहेत. त्यातील एकदाच त्यांनी त्यांचा पुर्ण 5वर्षाचा कार्यकाळ पुर्ण केला आहे. तो अपवाद वगळता पाकिस्तानात एकतर लष्करी उठाव किंवा भष्ट्राचाऱ्याचा आरोप , हत्या , निधन यामुळेच पाकिस्तानातील पंतप्रधान बदलला जातो.

      पाकिस्तानातील वरीष्ठ सभागृहातील(आपल्या राज्यसभा समकक्ष) सदस्य तेथील कनिष्ठ सभागृहातील (आपल्या लोकसभा समकक्ष) लोक मतदानामार्फत ठरवतात . त्यामुळे नँशनल  अस्बेंलीमध्ये बहूमत असणाऱ्या पक्षाचा सदस्य निवडुन येणे क्रमप्राप्त आहे. मात्र 2021 जून 11 रोजी सध्याचे पाकिस्तानचे अर्थमंत्री अब्दूल हफिझ शेख आणि सिनेट(पाकिस्तानचे वरीष्ठसभागृह)चे सदस्य असणारे अब्दूल हफीझ शेख कार्यकाळ संपत असल्याने त्यांचा जागेवर नविन सदस्य निवडण्यासाठी अब्दूल हफीझ शेख   आणि विरोधी पक्षांचे उमेदवार  पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसुफ रझा गिलानी  यांच्यात लढत असताना 164 विरुद्ध 169 मतांनी युझूफ रझा गिलानी
 हे निवडून आले. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने 7 मते रद्द केली. या विजयामुळे पाकिस्तानच्या विरोधी पक्षांनी सरकारविरोधात अविश्वासाचा ठराव आणला आहे.ज्यावर शनिवार 6 मार्च रोजी मतदान होणार आहे. सध्याचे इम्रान खान सरकार लष्कराच्या पाठिंब्यावर सत्ता टिकवून आहे. जनतेचा पुर्ण भ्रमनिरास इम्रान खान सरकारने केला आहे. असा विरोधी पक्षाचा आरोफ आहे
    आपण भष्ट्राचाराची पायामुळे खणून काढत असल्याने विरोधी पक्षांनी आपल्याला हटवण्यासाठी केलेली चाल म्हणून इम्रान खान याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. सिनेटच्या निवडणूकीत मोठ्या प्रमाणात गैर व्यवहार होतो. तो कमी करण्यासाठी विरोधी पक्ष तोंडी समंती देतात , मात्र प्रत्यक्ष कार्यवाहीच्या वेळी युटर्न घेतात असा आरोप इम्रान खान यांनी केला आहे.पाकिस्तानची आर्थिक स्थिती बघता सध्या आहे ,तेच सरकार तिथे असणे आवश्यक आहे. देशाचे वरीष्ठ सभागृह असणाऱ्या सिनेटमधील नाट्यानंतर कराची स्टाँक एक्सेंज मोठ्या प्रमाणात कोसळले आहे.
सध्या आपल्या भारताच्या शेजारील देशात प्रचंड प्रमाणात घडामोडी घडत आहे. म्यानमार , नेपाळ, भूतान श्रीलंकेनंतर आता पाकिस्तानात मोठ्या घडामोडी घडत आहे. त्यातील भूतान वगळता इतर देशातील घडामोडी मी तूम्हाला सांगितल्या आहेच. पुढील वेळी भूतान विषयी बोलेल , तो पर्यत नमस्कार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?