भूतान मध्ये रंगणार नाट्य !

       

  आपल्या भारताच्या शेजारच्या देशांमध्ये विविध घडामोडींनी वेग घेतला आहे. काही घडामोडी राजकीय स्वरुपाच्या आहेत.तर काही घडामोडी मोठ्या घोटाळ्यामुळे चर्चेत आलेल्या आहेत .  भूतान सारखे जागतिक राजकारणापासून कोसो मैल दुर राहणारे, भारताच्या संमतीशिवाय अन्य कोणाशी परराष्ट्रीय सबंध न ठेवणारे राष्ट्र देखील याला अपवाद ठरलेले नाही.
             तर मित्रांनो, भूतानच्या राजघराण्याचे संरक्षण करणाऱ्या दलातील सदस्य ब्रिगेडीयर थिनले  भूतान सर्वोच्च न्यायालयाचे  वरीष्ठ न्यायाधीश क्वीनले शेअरींग आणि एक साह्ययक न्यायाधीश येशव दोजी यांच्यावर राजघराण्याविरुद्ध आणि सर्वोच्च न्यायालयाविरुद्ध षडयंत्र रचल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.  त्यांनी भूतानच्या राजघराण्यातील धोका उत्पन होईल, असे वर्तन करणे, वशिलेबाजी, भूतानच्या राजघराण्याचे संरक्षण करण्यासाठी असलेल्या दलासाठी असणाऱ्या पैसाचा दुरापयोग करणे, तसेच अयोग्य पद्धतीने कर्जप्रकरण मंजूर करणे हे आरोप  ठेवण्यात आले आहे. सध्या शांततामय  तसेच आनंदीमय जीवनाची जगाला देणगी देणाऱ्या भूतानमधील जनजीवन यामुळे पुर्णतः ढवळून निघाले आहे. 

        
 गेल्या 2वर्षापासून भूतानमध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली बंदिवासात असणाऱ्या  भारताच्या भूतान दुतावासात राजशिष्टाचार सचिव या पदावर कार्यरत असणाऱ्या श्रीमती वाग्नू  हीच्या  चौकशीमध्ये ही नावे आल्याने या प्रकरणाचा उलगडा झाला. या  तिघांच्या मते ते  वाग्नू हीच्या लाघवी बोलण्याला  फसल्याने त्यांचावर ही परीस्थिती उद्भवली आहे.. त्यांचा हे कार्य करण्यात काहीही वैयक्तिक हेतू नाही. हीने घरच्यांशी बोलत असली तरी भूतानच्या सत्तेच्या वरीष्ठ पातळीवरील लोकांशी बोलत असल्याचे भासवून आम्हाला फसवले असे या तिघांचे म्हणणे आहे. या तीघांना 17 फेब्रुवाारी रोजी अटक करण्यात आली आहे. भूतानच्या सर्वोच्च न्यायालयाने यांचा जामिन अर्ज फेटाळल्याने तिघेही सध्या बंदिवासात आहेत.
सत्य काहीही असले तरी निसर्गाची मुक्त हस्ताने उढळण असलेल्या या देशातील जनसामन्यांचा आयुष्यात यामुळे प्रचंड धक्का बसला आहे. जनसामन्य अस्वस्थ झालेले आहेत.ते पुर्वपदावर लवकरात येवो, अशी मनोकामना  करत सध्यापुरते थांबतो , नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?