मुंबई आताची ,आणि त्यावेळची !


 मी जिथे चहा पितो, त्या चहाच्या टपरीवर सातत्याने जूनी गाणी वाजत असतात.  दोन तीन दिवसापुर्वीचीच गोष्ट आहे.नेहमीप्रमाणे तिथे मी चहा पिण्यासाठी गेलो असता, एक अत्यंत उत्तम गाणे तिथे वाजत होते. "ए दिल मुस्किल है जिना यहा ,...... ये बाँम्बे हे मेरी जान!"
       गुरुदत्त प्राडक्शनची निर्मिती असलेल्या सि. आय. डी. या चित्रपटातील हे गाणे त्या वेळच्या मुंबईतील  स्थिती कसी होती? यावर छान भाष्य करते . हा चित्रपट सन1956 रोजी प्रदर्शित झाला. त्यामुळे आपणास तेथील मुंबईची स्थिती समजते. आताची स्थिती कसी आहे? हे आपण जाणतातच.नायक मुंबई किती वाइट आहे, यावर भाष्य करत असतो, तर नयिका मुंबई शहर किती उत्तम आहे, यावर भाष्य करुन त्यास नामोहरण करते. असी गाण्याची मध्यवर्ती कल्पना आहे. जाँनी वाकर आणि वहीदा रेहमान यांच्यावर चित्रीत झालेल्या या गाण्याचे गीतकार आहे गीता दत्त आणि मोहमद्द रफी . गाण्याचे संगीतकार आहेत ओ पी नय्यर . सुमारे 4 मिनीटाच्या या गाण्यात आपणास मुंबईचे महत्त्व अधोरेखीत होते.
गाण्यामध्ये सध्याचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई बाहेर ट्राम जाताना दिसतात . गाण्यामध्ये सुद्धा ट्रामचा उल्लेख आहे. मात्र सध्या मुंबईत ट्राम नाही , हे आपण जाणतातच. तसेच गाण्यामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे मिल देखील आता नाहीत. मात्र गाण्यामध्ये वर्णन केलेली आणि आजही अस्तिवात असणारी गोष्ट म्हणजे अर्थकारणातील महत्त्व .  अर्थात गाण्यामध्ये  वर्णन केलेली अर्थकारणाची संसाधने बदलली आहेत. गाण्यामध्ये सट्टा, रेस , चोरी ही अर्थकारणाची संसाधने सांगितली आहेत. सध्या मुंबईची  अर्थकारणाची संसाधने कोणती आहेत., हे आपणास माहिती आहेच असो.गाण्यामध्ये नरीमन पाँइटसुद्धा दिसतो. आजही तो तितकाच सुंदर आहे,किंबहूना आज त्याचे महत्त्व वाढलेले दिसते.गाण्यामध्ये दिसणारा टांगा तर कधीच इतिहास जमा झालेला आहे.असो.गाण्यामध्ये आपणास अँबेसिडर कारच्या टँक्सी सर्वत्र दिसतात. तर त्यानंतर सुमारे 20 वर्षांनी आलेल्या ऐताहासिक चित्रपट असणाऱ्या सिंहासन.(मराठी)मध्ये आपणास पद्मनी या कार टँक्सी म्हणून दिसतात.आता टँक्सी म्हणून काय वापरतात? हे जगजाहिरच आहे .असो.

 मुंबईमध्ये परीश्रम केल्यास कोणालाही पैसा सहजच मिळेल. येथे छानछौकीला नाही, तर तूमच्या अंगभूत कला कौशल्याला महत्त्व आहे. तूमच्यात कला कौशल्य असल्यास तूम्हाला मरण नाही, येथे फसवणूक होण्याची शक्यता असल्याने जपूणच वागले पाहिजे असा संदेश देवून गाणे संपते.
गाणे सुंदर आहे. किमान एकदा तरी बघावेच असे आहे. चित्रपट गुरुदत्त प्राँडक्शनचा आहे, म्हणजे चित्रपटाचा दर्जा उत्तमच असणार हे ओघाने आलेच. चित्रपट बघीतल्यास सोन्याहून पिवळे . सध्या कोरोना संसर्गाचा  धोका वाढत असल्याने अनेक जणांना घरी बसावे लागत आहे. त्यावेळेस वेळ घालवण्यासाठी गुरुदत्ताचे चित्रपट हा खुप मोठा विरंगुळा होवू शकतो. ज्ञानवर्धक चितंनशील करमणूक म्हणून विचार करायचा झाल्यास गुरूदत्ताचा चित्रपटांशिवाय अन्य चित्रपट येवूच शकत नाही. मग  ऐकताय ना गुरुदत्ताच्या चित्रपटातील गाणी .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?