भारताचे अशांत शेजार (भाग 4)


पाकिस्तान , आपल्या भारताच्या 3 राज्य आणि दोन केद्रशासित प्रदेशांबरोबर सीमा शेअर करणारे, भारतातील सर्वाधिक चर्चेत असणारे राष्ट्र.कधी दहशतवादी कारवाईमुळे तर कधी राजकारणी लोकांच्या आरोप प्रत्यारोपामुळे पाकिस्तानचे नाव भारतात सातत्याने घेतले जाते.तर या पाकिस्तान बरोबर तीन मोठ्या घडामोडी गेल्या पंधरवाड्यात घडल्या.
पहिली म्हणजे भारताने कोरोना लस पाकिस्तानला मोफत दिली, ज्याविषयी या आधीच बरेच काही बोलून झाले आहे. त्यामुळे मी त्या विषयी बोलणार नाही. मी बोलणार आहे.पाकिस्तानच्या दुसऱ्या दोन घडामोडीविषयी .
       तर मित्रांनो, पाकिस्तानच्या काश्मीरविषयक दाव्याविषयी कायम पाकिस्तानची पाठराखण करणारा, नाटो या अमेरीकाप्रणीत सैनीकी कराराचा भाग असणाऱ्या , तसेच युरोपीय युनियनचा भाग होवू इच्छिणारा देश, ज्या देशातील बहुसंख्य भाग हा आशिया खंडात असून काही भाग युरोपात आहे, असा मुस्लिम बांधव बहुल देश,ज्या देशाचे सविंधान आतापर्यत धर्मनिरपेक्ष होते, मात्र सध्याचे सरकार ते धर्माधिदिष्ठ करण्याचा प्रयत्न करत आहे असा देश  अर्थात तूर्कस्थान या देशाबरोबर पाकिस्तानचा होणाऱ्या संरक्षणविषरक करारात अमेरीकेने खोडा घातला  आहे. तूर्कस्थान पाकिस्तानला हत्यारे वाहुन नेण्याची क्षमता असणाऱ्या काही हेलीकाँप्टरची निर्यात करणार होता. ज्यामध्ये वापरण्यात येणारी काही यंत्रसामुग्री अमेरीकेतील खासगी शस्त्र निर्माण करणारी कंपनी करणार होती.मात्र अमेरीकेच्या नवनियुक्त  राष्ट्राध्यक्षाने सदर यंत्रसामुग्री  ही फक्त तूमच्या संरक्षणासाठी तयार करण्यात येणाऱ्या हेलिकँप्टरसाठी वापरण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. तूम्हाला आम्ही तयार केलेल्या यंत्रसामुग्रीचा वापर करत नवीन हेलीकँप्टर तयार करुन ते विकता येणार नाही. जर तूम्ही ते विकले तर आम्ही तूम्हाला यापुढे यंत्रसामुग्री देणार नाही,असे सांगितल्याने तूर्कस्थान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांसाठी आवश्यक असणारा करार खोळंबला आहे. हा तूर्कस्थान देश मुस्लीम जगतात सौदी अरेबियाचा कट्टर विरोधक समजला जातो, काही महिन्यापुर्वी आँरगनायझेशन आँफ इस्लामिक कंट्रीज या संघटनेत दोन तुकडे होण्याची शक्यता याच तूर्कस्थानमुळे झाली होती.असो.

या एका धक्यातून पाकिस्तान सावरतोच , पाकिस्तानला दूसरा धक्का बसलाय. ज्या देशाला देश अस्तिवात आल्यानंतर जगात पहिल्या काही क्रमांकाने मान्यता दिली. सुरवातीच्या काळात प्रचंड अर्थसाह्य केले तो, देश अर्थात सयुंक्त अरब अमिरात (UAE)ने पाकिस्तानला दिलेले कर्ज परत मागितले आहे. {समर्थ रामदास स्वामी यांनी मुर्खाची लक्षणे सांगताना नोकर मालकाच्या पुढे गेल्यास मालक मुर्ख समजावा, असे सांगितले आहे. या उदाहरणात सयुंक्त आधी अरब अमिरात गरीब होते, आता पाकिस्तान आहे} यु. ए. इ. ने पाकिस्तानला दिलेले कर्ज पाकिस्तानच्या अर्थसंकल्पात लष्करावर केल्या जाणाऱ्या तरतूदीएव्हढे आहे. यु. ए. इ. ने पाकिस्तानला दोन प्रकारे कर्ज दिले होते..त्यातील पहिला प्रकार म्हणजे तेल खरेदी करुन त्याचे पैसे काही कालावधीने हळू हळू देणे [ याला इंग्रजीत Soft loanम्हणतात. मराठीत काय म्हणतात ते जाणकरांनी सांगावे] दुसरा प्रकार म्हणजे थेट वित्तीय पुरवठा करणे. जो आता युएइने परत मागितला आहे. हा वित्तीय पुरवठा पाकिस्तानातील बँकिग प्रणाली सुधारण्यासाठी दिला आहे. सध्याची पाकिस्तानची अवस्था जूने कर्ज फेडण्यासाठी नविन कर्ज काढणाऱ्या व्यक्तीसारखी झाली आहे. एकेकाळी आशियातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या देशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या पाकिस्तानची आर्थिक व्यवस्था वाईट आहे. इतिहासाचा विचार करता जेव्हा पाकिस्तानची आर्थिक स्थिती अडचणीची होते.तेव्हा भारतातील दहशतवाद कमी होतो. त्यामुळे भारताचा लष्करी खर्च कमी होवून भारताची प्रगती होते.
हा लेख लिहीत असताना मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानचे वरीष्ठ सभागृह असणाऱ्या सिनेट (आपल्या राज्यसभा समकक्ष)मध्ये सभापती निवडण्यासाठी मोठ्या प्रमाणात गैर प्रकार झाल्याचे वृत्त अलं जझीरा ने दिले आहे. त्याविषयी आणि त्या सारख्या अन्य गोष्टींविषयी पुढच्या वेळेस बोलेल, तो पर्यत नमस्कार 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?