जिंदगी है पहेली !

     

कालचीच गोष्ट आहे. युट्यूबवर विरंगुळ्यासाठी हिंदी गाणी ऐकत असताना एका हिंदी गाण्याचा पर्याय समोर दिसला. आनंद चित्रपटातील  " ये जिंदगी है पहेली,  कभी ये रुलाइ, कभी ये हसाइ," हे ते गाणे. सध्याचा परीस्थितीला चपलाख बसणारे. सध्या परीस्थिती ही आपणाला रडवणारी असली तरी ही स्थिती कायम राहणार नाही, हा आशावाद जागवणारी. एका कँन्सरच्या रुग्णाचा दुर्दम्य इच्छा शक्तीवर कथानक असलेल्या या चित्रपटात सांगितलेल्या संदेशाची सध्या नितांत आवश्यकता आहे. 
     सध्याच्या काळात वर्तमानपत्राकडे नजर टाकल्यास किमान दोन ते तीन आत्महत्येचा बातम्या दररोज दिसतात. कोरोनामुळे घटलेले उत्पन, उद्भवलेली अस्थिरतेची परीस्थिती यामुळे निर्माण झालेली तणावाची स्थिती यातून या आत्महत्येचा घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर स्वतःच्या मृत्यू समोर दिसत असताना देखील त्यांचा लवलेशही चेहऱ्यावर न दाखवता , उलट इतरांना आनंद देणारा खऱ्या अर्थाने रोल माँडेल ठरतो, असे मला वाटते. तसेच बाबू मोशाँय हम सब रंगमंच की कतपुलीया है, हमारी दोर उपर वाले की हात मैं है, कोन कैसे उठेगा, ये कोइ नही जानता,हाहाहा ! तसेच "मिटती है ,वो काया है, आत्मा नश्वर है,"  हे डायलाँग आपणास हे जग नश्वर आहे, याची पण जाणीव करुन देतात . माझ्यामते आनंद या चित्रपटाचा शेवट वगळता सर्वच चित्रपट सकारात्मक उर्जा आपणास देतो, ज्याची आपणास  सध्या मोठ्या प्रमाणात गरज आहे.

जीवनाची क्षणभंगूरता, आणि आपण जगत असलेला प्रत्येक क्षण आनंदाने कोणत्या पद्धतीने जगावा ? दुसऱ्याला आनंद देण्यातच खरा आनंद असतो, मनुष्याने असे जगावे की, आपला छोटासा सहवास देखील लोकांना आपली कायमस्वरूपी आठवण करुन देण्यास भाग पडेल. असी शिकवण या चित्रपटातून मिळते. या चित्रपटातून एकत्रीतरीत्या मिळणाऱ्या शिकवणीची अत्यंत कमी वेळेत उजळणी किंवा चित्रपटाचे सार म्हणून या गाण्याकडे बघता येवू शकते. 
मध्यम जून्या कालखंडातील ( कृष्णधवल काळातील चित्रपट हे जूने म्हणून ओळखले जावू शकतात .त्यानंतर पिस्टमन कलर तसेच अमिताभ बच्चनचे कुली, दिवार ,आनंद ते हम आपके है कोन पर्यतचे चित्रपट मध्यम जूने म्हणून ओळखले जावू शकतात. तेव्हापासून नवे आणि अतिनवे काळातील चित्रपट सुरू होतात ) चित्रपटातील सर्वात उत्तम गाणे म्हणून या गाण्याकडे बघता येवू शकते. 
या गाण्याचे संगीत दिले आहे, साहिल चौधरी तर गीत गायले आहे, मन्ना डे यांनी .गीताची रचना योगेश यांची आहे.
1971 साली आलेला आनंद या चित्रपटातील हे गाणी आजही  हवेहवेसे वाटते, त्यातील नाविण्य अजूनही टिकून आहे. हे विशेष . तूम्हीपण यूट्यूबवर हे गाणे ऐका तूम्हालाही एक वेगळी अनुभती अनुभवयास मिळेल. मग ऐकता हे गाणे! 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?