माझे आवडते गाणे !


आनंद या चित्रपटातील गाण्याविषयीच्या माझा पोस्टवर प्रतिक्रिया देताना एकाने मला तूझ्या आवडत्या गाण्याविषयी वाचायला आवडेल. असी प्रतिक्रिया दिल्याने माझ्या आवडत्या गाण्याविषयी सांगण्यासाठी आजचे लेखन.
तर माझे आवडते गाणे आहे, जब वी मेट या चित्रपटातील " तूमसे ही" हे गाणे.  मोहित चौहान यांच्या आवाजात रेकाँर्ड केलेले , आणि प्रितम यांनी संगीतबद्ध केलेले गाणे. ज्या गीताची रचना इर्शाद कामील यांनी केली होती.
युवा उद्योजक आदित्य कश्यप यांनी नैराश्यातून बाहेर पडत उद्योगाची घडी पुन्हा नव्याने बसवताना गायलेले हे गाणे. सर्व प्रकारच्या व्यस्ततेतून मोकळा वेळ काढत आपल्या छंदाला मोकळा वेळ देत गायलेले गाणे. म्हणजे हे गीत .
या गीतानंतर चित्रपट संपुर्ण 180% फिरतो. आतापर्यत नैराश्यामुळे सर्वकाही सोडून विनम्सक अवस्थेत फिरत, प्रसंगी आत्महत्येचा प्रयत्न केलेला युवा उद्योजक स्वतःच्या आयुष्यात नव्याने रंग भरतो, आपल्या अडचणी सोडवण्याचा नव्याने पुर्णतः उत्साहात प्रयत्न करायला लागतो. ज्यात त्याला यशही मिळायला लागते आधीच्या स्थितीपेक्षा त्याची स्थिती खुपच सुधारते.आतापर्यत अपयशी समजला जाणारा युवा उद्योजक आदित्य कश्यप एक यशस्वी उद्योजक म्हणून गणला जायला लागतो.

 या उलट स्थिती एका खचलेल्या युवा उद्योजकापासून यशस्वी उद्योजकापर्यत प्रवासास कारणीभूत ठरलेल्या नायीकेच्या अर्थात गीतचा होता. दुसऱ्या गावी असणाऱ्या आपल्या प्रियकराबरोबर लग्न करायला मिळणार या आनंदात काहीही  विचार न करता पळून गेलेल्या मात्र प्रियकराने लग्नास नकार दिल्यावर त्यामुळे खचून जावून नैराश्याचा अवस्थेत बसली असता एका मिशनरी संस्थेत कार्यरत असणाऱ्या महिलेचा संपर्कात येवून एका शाळेत शिक्षीकेचे नोकरी करण्यास सुरवात करते.तीने घरच्यांशी सबंध तोडलेले असतात. 
एका अपघातामुळे नायिका आणि नायकाची भेट होते नायिका पुन्हा उत्साही होते. आणि त्यांचे लग्न होवून चित्रपट संपतो.
मला हे गाणे आवडते यासाठी की या गाण्याचा आधी नायकाने त्याच्या कंपनीतील शेअर्स होल्डरांशी साधलेला संवाद . ज्यामध्ये तो आपण या स्थितीतून पुन्हा बाहेर पडून कोणी विचार केला नसेल.या प्रकारची आत्मविश्वास वाढवणारा संवाद करतो, आणि प्रत्यक्ष कामाला सुरवात करतो आहे , हे दाखवणारा प्रसंग .तसेच  गाण्यामध्ये दाखवण्यात येणारा आत्मविश्वास असणारा नायक .गाण्याचा बोल उत्तम तर आहेच. मात्र संगीत आणि या गाण्यात नायकाला देण्यात आलेल्या हालचालीसुद्धा  उत्साह  वाढवणाऱ्या आहेत. सुमारे सव्वाचार मिनीटाच्या या गाण्यामुळे उत्साह वाढतो, असा माझा अनुभव आहे. मग घेताय ना मला येणारा अनुभव तूम्ही सुद्धा 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?