नाशिकमध्ये काय चाललंय!


नाशिक. भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेल्या महाराष्ट्रातील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर . समस्त भारताला ज्या शहरातून पासपोर्ट, स्टँम्प पेपराचा  दिले  जातात ते शहर . द्राक्ष निर्यातीतून मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते ते शहर म्हणजे नाशिक .  भारताच्या हवाइ दलाला मिग विमाने ज्या शहरातून तयार करुन पुरवली जातात ते शहर म्हणजे नाशिक. आपल्या धार्मिक कार्यामुळे जगभरात ओळखले जाणारे शहर म्हणजे नाशिक . आख्या भारताला स्कापिर्यो ज्या शहरात तयार होवून पुरवले जातात ते शहर म्हणजे नाशिक .   आजमितीस मात्र संपुर्ण शहर मरणासंपन्न झाले आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने अन्य वेळी गर्दीने ओथंबून वाहणाऱ्या शहरात स्मशान शांतता पसरली आहे. आहे ती फक्त भांबावलेली आणि आपल्या आतेष्ठांवर कुठे कोरोनाचे उपचार होवू शकतात का? यासाठी एका रुग्णालयातून दूसऱ्या रुग्णालयात जाणारी जनता.या ठिकाणी खरेतर ज्यांनी शहराची जवाबदारी घेयला हवे असे आमदार खासदार कुठेच दिसत नाही. फक्त पालकमंत्री थोडेसे चित्रात दिसत आहे, ते फक्त बैठकांमध्ये .मात्र बैठकांमध्ये घेतलेल्या निर्णयामुळे परीस्थिती सुधारते आहे,असे म्हणावे तर उत्तर नकारात्मक येते आहे. शहरातील तीन आमदार केंद्रात सत्तेत असणाऱ्या पक्षाचे मात्र, कुठेही त्यांनी आपल्या पक्ष नेर्तूत्वाला सांगून शहरातील जनजीवन पुर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही. नाही म्हणायला एक आमदार मध्यंतरी चर्चेत आल्या होत्या, मात्र तेही जवळचा नातेवाइक लाचखोरीत अडकल्यामुळे. महानगरपालीकेत सुद्धा केंद्रातील पक्षाचीच सत्ता  मात्र चित्र निराशाजनकच आहे. मागच्या विधानसभेच्या वेळी नाशिक शहर माझे दत्तक पुत्र आहे, असे म्हणणारे  एक वरीष्ठ नेते   सुद्धा यावेळी आपल्या दत्तक पुत्राला विसरले आहेत .राज्यातील जनतेशी दुरान्वयेही सबंध नसणाऱ्या विषयांवर प्रचंड प्रमाणात कंठघोष केल्यावर कोरोना विषयावर,  राज्य सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात  धन्यता मांडली जात आहे. 
शहरात एका रुग्णालयात आँक्सिजन सिलेंडर संपल्याने अत्यवस्थ रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवावे लागले होते. कोरोना रुग्णांना जीवनावश्यक असणाऱ्या रेमडीसीवर औषधाचा शहरात तूटवडा झाला आहे. त्यासाठी शहरातील औषधांची घाउक बाजारपेठ असणाऱ्या गोळे काँलनी परीसरात आंदोलन देखील करण्यात आले. शहरातील स्थानिक  प्रशासनाने गर्दीवर नियंत्रण मिळण्यासाठी बाजारपेठेत सशुल्क प्रवेश सुरु केला मात्र सशुल्कतेला विरोध होवू लागल्यावर ते पण बंद करण्यात आले.

आज शहरात मृत्युमुखी पडलेल्या लोकांवर आंतीम संस्कार करण्यासाठी वाट बघावी लागत आहे. शहर बसवाहतूक असो, अथवा अन्य कोणताही प्रश्न असो यावर तावातावाने भुमिका मांडणाऱ्या कोणत्याही नगरसेवकांनी यावर रस्त्यावर उतरुन कार्यवाही केल्याचे दिसत नाही ये..शहरवासीयांना वालीच उरला आहे का ? असा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे. शहरवासीयांनी कोरोनात जगले तर देवाचे आभार मानायचे दुर्देवाने आप्तस्वकीयांचा मृत्यू झाल्यास स्वतःच्या दैवाला दोष देत शांत बसायचे का ? असा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?