गैरप्रकाराची किड ठेचायलाच हवी!


कोणताही खेळ हा खरेतर खिलाडू वृत्तीने खेळायला हवा. मैदानी खेळांमध्ये संघाच्या खेळांडूसमोर सहभागी देशांचे राष्ट्रगीत वाजवत असताना समोर लहान मुले, मुली याचसाठी असतात. बालसुलभ, मनात कोणतीही वैर भावना खेळाडूंनी खेळताना जोपासू नये, ही या मागची भावना असते. बहुसंख्य खेळाडू याच भावनेने खेळतात.मात्र प्रत्येक गोष्टीला अपवाद असतातच . काही खेळाडू जिंकण्यासाठी गैरप्रकाराचा अवलंब देखील करतात. जगात प्रत्येकजण प्रत्येकाला सदा सर्वकाळ फसवू शकत नाही. या गैरप्रकार करणाऱ्या खेळाडूंचे बिंग कधीना कधी फुटतेच. असेच एका बुद्वीबळपटूचे बिंग इंडोनेशियात आँनलाइन स्पर्धै दरम्यान फुटले.आणि एकच गहजब झाला.
बुद्धीबळ सारख्या बुद्धीच्या खेळात खेळात अधिकाधीक प्रगती होण्यासाठी आधूनिक तंत्रज्ञानाची मदत घेणे यात गैर काहीच नाही. काँम्प्युटर, अँप , पुस्तके, व्हिडीओ यांची मदत घेतल्यास आपले कच्चे दुवे सहजतेने समजतात, नव्या चाली समजतात.ज्याचा प्रत्यक्ष खेळात प्रतीस्पर्ध्यावर मात करायला उपयोग होतो. मी स्वतः युट्युबवर बुद्धीबळाविषयी अनेक व्हिडीओ बघतो..तसेच चेस डाँट काँम, लीचेस डाँट काँम सारख्या वेबसाइटवर आणि त्यांचा अँपवर तसेच चेसविकी ( जगात भारी नाशिक )या अँपवर  बुद्धीबळविषयक विविध कोडी सोडवतो, आणि आँनलाईन खेळतो सुद्धा. मात्र प्रत्यक्ष खेळताना या आयुधांचा वापर करायला नको, असे मला वाटते. बुद्धीबळाचे पटावरील युद्ध स्वतःच्या बुद्धीचातुर्यावर खेळायला हवे. ज्याचा भंग या खेळाडूने केला आहे. जे दूर्देवच आहे.
आपल्या मराठीत एक म्हण आहे","सुक्याबरोबर ओलेही जळते, " या म्हणीनूसार आँनलाइन पद्धतीने बुद्धीबळ खेळणाऱ्या अन्य प्रामाणिक खेळाडू देखील आता संशयाचा फेऱ्यात काहीसे अडकले जाणार. सध्याचा कोरोनाच्या अनिश्चितेचा काळात अन्य खेळाच्या स्पर्धा थांबलेल्या असताना ,किंवा विना प्रेक्षक तसेच कमी प्रेक्षकांचा साक्षीने होत असल्यातरी ,बुद्धीबळाची तसी स्थिती नव्हती. बुद्धीबळाच्या अनेक आँनलाईन स्पर्धा होत होत्या. आता त्यावर काही प्रमाणात मर्यादा येतील. हा लेख लिहीत असताना आँनलाईन खेळाडू  ज्या खोलीत तो खेळाडू बसणार आहे, त्या खोलीत दोन कँमेरे असावे, खेळाडूंना खेळादरम्यान कुठेही जाता येणार नाही. खोलीत इतर कोणी नसावे.असे निर्बंध लादल्याचे वृत्त आहे. ज्याचा परीणाम वयस्कर तसे मधूमेह सारख्या व्याधी असणाऱ्या खेळांडूवर विपरीत परीणाम होणार , हे तर उघड आहे. आपल्या शाररीक अक्षमतेमुळे त्यांना खेळातून निवृत्ती घ्यावी लागू शकते. 
या धक्क्यातून बुद्धीबळ सावरेल सुद्धा मात्र "बुंदसे गयी वो.हौदसे नही आती", या उक्तीप्रमाणे एखादा सनसनाटी विजय सुद्धा आता संशयतेच्या धुक्यातूनच बघीतला जावू शकतो.यामुळे गुणी खेळाडूवर सुद्धा अन्याय होवू शकतो. दोषी खेळाडूवर योग्य ती कारवाई होईल सुद्धा मात्र बुद्धीबळाचा क्रीडा विश्वाला जो तडा गेला तो बुजणे अशक्यच !


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?