वंदन अभ्यासू व्यक्तिमत्वाला


   ती व्यक्ती अर्थशास्त्रातील तज्ज्ञ होती, ती व्यक्ती राजशास्त्र, कायद्यांच्या बाबतीत तज्ज्ञ होती, ती व्यक्ती इतिहास आणि कृषिशास्त्र , समाजशास्त्र या एकमेकांशी सबंध नसणाऱ्या विषयातील तज्ज्ञ होती. त्या व्यक्तीचे नाव आहे. डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर .2021 एप्रिल 14 रोजी त्यांची 130वी जयंती , त्यानिऐमित्ताने सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.
       वर्षोनवर्षे शिक्षण आणि पाणी यासारख्या मुलभूत गोष्टी नाकरलेल्या समाजातील या महामानवाने स्वकष्टातून समस्त भारतीयांच्या कल्याणाचा वसा घेतला. डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे घटनानिर्मितीतील योगदान अतूलनीय आहे. मसुदा समितीतील अन्य सदस्य,
देश सोडल्यामूळे , आजारी असल्यामुळे किंवा निधन पावल्यामुळे कार्यरत नसल्याने घटना निर्मितीची सर्व जबाबदारी त्यांनी एकट्याने लिलया पेलली. आणि जगातील एक सर्वोत्तम संविधान त्यांनी तयार करण्यात मोलाची भूमिका बजावली.
      डाँक्टर बाबासाहेबांचे संविधान निर्मितीतील योगदान सर्वश्रूत आहेच. मात्र त्यांचे भारतीयांसाठी एव्हढेच योगदान नव्हे,  ते कामगार मंत्री असतांना त्यांचा प्रयत्नामुळे अनेक कामगार हिताचे कायदे समंत झाले. कामगरांचे किमान वेतन, कामाचे ठराविक तास , साप्ताहिक सुट्टी, तसेच अन्य लाभांची सक्ती उद्योजकांवर करण्यासाठीचे कायदे त्यांचामुळेच समंत झाले.दामोदर, कोसी आदी नद्यांना आलेल्या पुरामुळे बिहार आणि ओडीसा राज्यात प्रचंड हानी होत असे. या हानीपासून या प्रदेशांची सुटका होणे, तसेच या पाण्याचा समाजासाठी विधायक वापर व्हावा, यासाठी उभारण्यात आलेल्या हिराकुड आणि दामोदर प्रकल्पाची उभारणी करण्यामध्ये डाँक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान मोठ्या प्रमाणात आहे. डाँक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थशास्त्रात देखील भरीव योगदान दिले. त्यांची डाँक्टरेट ही त्यांच्या अर्थशास्त्रातील अभ्यासासाठी होती..त्यांचा याविषयीचा प्राँब्लेम आँफ रुपी हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्यांचे पाकिस्तान थाँटस् आणि हू वेअर क्षूद्राज हे दोन ग्रंथ त्याचा सामाजिक आणि ऐताहासीक विषयावरील अभ्यास किती सखोल होता, हे दर्शवून देतात.
समाजातील शोषित, वंचित घटकांना त्यांचे न्याय हक्क मिळावेत. वर्षोंवर्षै दाबलेल्या अवस्थेत गुलामीचे जीवन जगणाऱ्या समाज घटकांना समानतेचे जीवन जगता यावे, यासाठी त्यांनी जीवनभर संघर्ष केला. महाड येथील चवदार पाण्याचा सत्याग्रह, काळाराम मंदिर सत्याग्रह, गोलमेज परीषदेत दलितांसाठी मागितलेले स्वतंत्र्य मतदारसंघ , दलितांमध्ये त्यांचा अधिकाराची जाणीव व्हावी , या हेतूने सुरु केलेली , मुकनायक, बहिस्कृत जनता आदी दैनिके, आणि पाक्षीके  ही त्यातील काही प्रातिनिधीक उदाहरणे. वर्षोनवर्षै शिक्षण घेवू न शकलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी,  त्यांच्यावर होत असलेल्या अपमानास्पद टिकाटिपण्णीला प्रतिबंध करण्यासाठी त्यांनी आरक्षण आणि अँट्रोसिटीचा कायदा तयार केला.आज दलित बांधव आपणास अनेक क्षेत्रात आघाडीवर दिसतात, याचे मुळ या गोष्टीत आहे, हे नाकारुन चालणार  नाही.
डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तळागाळातील शोषित, पिडीत वर्षोंवर्षै अन्याय सहन करणाऱ्या जनतेला मुक्ततेचा श्वास घेण्यासाठी साह्य केले. त्यांचा शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा या  त्री सुत्रावर आज अनेक बांधव मार्गाक्रमण करत स्वतःचा आणि आपल्या समाजाचा विकास करत आहेत. स्वतः डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर या त्री सुत्रीचा आपल्या जीवनात अवलंब केला . आधी केले मग सांगितले याचा अवलंब केल्यामुळे आज देखील त्यांचे विचार तितकेच महत्तवाचे ठरतात.आजदेखील त्याचे महत्त तसूभर देखील कमी झालेले नाही. आणि यापुढेही होणे अशक्यच आहे 
त्यांचे कार्य एका ब्लॉग पोस्ट
 मध्ये मांडता येणे अशक्यच.तरी पुन्हा एकदा सर्वांना डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?