बातमीतील चीन (भाग 6)


सध्या आपला महाराष्ट्र कोरोनाचा संकटाशी निकराचा लढा देत असताना आपल्या भारताच्या शेजारील चीन देशाबाबत सुद्धा नाट्यमय घडामोडी घडत आहे.  ज्यामध्ये तूर्कस्थानच्या राजधानीत  अर्थात अंकारा शहरात असणाऱ्या चीनच्या दुतावासाच्या पाण्याचा पुरवठा अंकाराच्या महापौरांनी तोडणे, तसेच चीनने भूटान बरोबरच्या सीमाविवादात आंतीम तोडगा काढण्यासाठी बोलणी सुरु करण्याची तयारी करणे या घडामोडी महत्तवाचा आहेत.
    तर मित्रांनो, चीनच्या अतिपश्चिमेकडे लडाखच्या उत्तरेला गिलगीट बाल्टीस्तानला लागून चीनचा सिंकीयांग (काही ठिकाणी याला झिंकीयांग असेही म्हणतात)हा प्रांत आहे. पुर्व तूर्कस्थान या नावाने सुद्धा प्रसिद्ध असलेल्या या प्रांतात मुस्लीम समाजबांधवांची संख्या प्रचंड आहे. वंशाचा, आणि भाषेचा  विचार करता येथील स्थानिक चीनपेक्षा तूर्कस्थानला अधिक जवळचे आहेत. गेल्या काही दिवसांपासून चीन येथील मुस्लिम बांधवांवर अत्याचार करत असल्याचा बातम्या सातत्याने येत आहे. ज्यामुळे तूर्कस्थानात या मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात असणाऱ्या देशामध्ये जनमत चीन विरोधी आहे. सध्याचे सरकार चीनविरोधी उघड भूमिका घेत नसले तरी विरूद्ध पक्ष जनमताचा बाजूने आहे. अंकारा या राजधानीच्या शहरातील स्थानिक प्रशासन विरोधी पक्षाच्या हातात आहे. गेल्या आठवड्यात चीनच्या राजदूताने तूर्कस्थानातील या वाढत्या चीनविरोधावर भाष्य केल्याने नाराज होवून अंकारा स्थानिक प्रशासनाने चीनच्या दूतावसाचा पाणीपुरवठा तोडला आहे. चीनमार्फत पाणी तोडल्यामुळे चीन तूर्कस्थान सबंधावर विपरीत परीणाम होणार नाही. मात्र वाढत्या चीनविरोधी वातावरणामुळे परीणाम होतील. तूर्कस्तान प्रशासनाने त्यावर काहीतरी कृती करणे आवश्यक आहे ,अशी प्रतिक्रिया  व्यक्त करण्यात येत आहे . चीन आणि तूर्कस्थान हे दोन्ही पाकिस्तानचे जवळचे मित्र आहेत. त्यामुळे पाकिस्तान याबाबत काय भुमिका घेतो, हे बघणे उत्सुकतेचे ठरेल. 
एकीकडे हे होत असताना चीन भूटान बरोबर असणारा त्याचा सीमावादावर आंतीम तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे. चीन त्यांची जमिनीवरील सीमा 14 देशांबरोबर शेअर करतो (कोणत्याही देशाने इतर देशांशी भुसीमा शेअर करण्याचा हा विक्रम आहे)त्यापैकी भूटान आणि भारत वगळता अन्य देशांशी असणारे त्यांचे सीमा विवाद संपले आहेत. भूटान बरोबर त्यांचा 4 भुभागाबाबत वाद आहे. त्यातील 3 भूटान चीन सीमेवर आहेत. एक सीमाविवाद अरुणाचल प्रदेश भूटान सीमेवरील प्रदेशावरून आहे. चीन अरुणाचल प्रदेश स्वतःचा प्रदेश असल्याचे मानत असल्याने त्या भागाशी सलगता येईल. असा चीनचा दावा आहे. यातील भूटान अरुणाचल प्रदेश सीमेवरील प्रदेश वगळता अन्य तीन प्रदेशावरील हक्क  जर भूटानने सिक्कीम भूटान चीन या तिघांच्या सीमा एकत्र येतात. त्या भागातील एक मोठा प्रदेश चीनला दिल्यास  चीन सोडून देइल,असे आश्वासन चीनने दोन वर्षापूर्वी दिले होते. मात्र भारताने चातूर्याने हा प्रस्ताव हाणून पाडला. आता पुन्हा भूटान चीन सीमावादाबाबत बोलणी सुरु झाली आहे.
गेल्या काही दिवसांचा आढावा घेतल्यास चीनबाबत बातमी नाही, असा आठवडा जात नाही. माझा वेळोवेळी आपणास याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न असेलच. तूर्तास इतकेच, नमस्कार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?