बातमीतील चीन (भाग7)

 

आपल्याकडे कोरोनामुळे स्थिती अत्यंत चिंताजनक असताना आपल्या भारताचे शत्रू राष्ट्र चीन याबाबत तीन घडामोडी गेल्या आठवड्याभरात घडल्या. शत्रूवर कायम लक्ष असणे आवश्यक आहे. या चाणक्य नितीनूसार चीनबाबत घडलेल्या तीन्ही बाबी आपणांस सांगण्यासाठी आजचे लेखन.
तर मित्रांनो, गुरुवारी दूपारी क्येटा शहरातील चीन वकिलातीजवळ असणाऱ्या हाँटेलमध्ये स्फोट झाला. सुदैवाने त्यावेळेस काही कामानिमित्त चीनी अधिकारी दुसऱ्या ठिकाणी गेल्यामुळे या स्फोटातून वाचले.क्येटा  पाकिस्तानातील बलूचीस्थान प्रांताच्या राजधानीचे शहर आहे. सध्या चीन पाकिस्तान इकाँनाँमिक काँरीडर अंतर्गत बलूचीस्थानामध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. ज्यास स्थानिक जनतेचा विरोध आहे. या विकासकामांमुळे बलूचीस्थानचा फायदा होण्याऐवजी शोषणच होईल.असी स्थानिकांची भुमिका आहे. ते सातत्याने आपला विरोध दर्शवत असतात. या आधी पाकिस्तान अमेरीका यांच्यात घनिष्ठ मैत्री असताना दोनदा पाकिस्तानातील अमेरीकी दुतावासावर हल्ला झाला होता. तहरीके ए तालीबान यांनी या हल्ल्याची जवाबदारी स्विकारली आहे. तहरीके पाकिस्तानची भुमिका पाकिस्तानात शारीया कायदा लागू करावी, असी आहे. ते पाकिस्तानी लष्कराला आपला विरोधक समजतात.तहरीके ए तालीबान हे पाकिस्तानी तालिबान म्हणून ही विख्यात आहे.चीनने त्याचा बिल्ड रोड इनेसेटिव्ह (BRI) हा विरोध करण्यासाठी रचलेले कारस्थान म्हणून प्रतिक्रिया दिली आहे. इम्रान खान यांनी दहशतवादाचा हल्ला कदापी सहन करण्यात येणार नाही, असे सांगितले आहे.
दुसरी बातमी चीन श्रीलंका सबंधावर आधारीत आहे.श्रीलंकेने चीनला 99वर्षासाठी वापरण्यास दिलेल्या हब्बनपोर्टा या बंदरावर चीनतर्फे कित्येक दिवसापासून उभ्या असणाऱ्या जहाजाला किनारा सोडण्याचा आदेश दिला आहे. नार्वे या देशातून चीनला जाताना बिघडल्याने हे जहाज हब्बनपोर्टा या बंदरावर उभे होते.  युरेनियम या किरणोत्सगारी पदार्थाची चोरटी वाहतूक करणारे हे जहाज असल्याची गुप्तवार्ता मिळल्यावर श्रीलंकेने हे आदेश त्या जहाजाला दिले. चीनच्या सरकारी जहाज कंपनीचे हे जहाज होते. भारताने या श्रीलंकेच्या कृतीचे समर्थन केले होते.आंतरराष्ट्रीय मानकांनुसार किरणोत्सगारी पदार्थाची वाहतूक करणारे जहाज दूसऱ्या देशाच्या किनाऱ्यावर थांबवायचे असल्यास सबंधीत देशाला पुर्व माहिती द्यावी लागते. जी यामध्ये देण्यात आलेली नाही.
आता बघूया तिसरी घडामोड .ही घडामोड आँस्टोलीया चीन यादरम्यानची आहे. आँस्टोलीया या देशातील राज्यांना अन्य देशांबरोबर करार करण्यास बरीच मोकळीक आहे. त्याचाच फायदा घेत आँस्टोलीया देशातील व्हिटोरीया या राज्याने 2017 साली चीनबरोबर बिल्ड रोड इनेसेटेव्हि या प्रकल्पाअंतर्गत काही करार केले. ज्यामुळे या राज्यात रोजगार निर्मिती, दळणवळणाच्या सोयी निर्माण होणार होत्या. आँस्टोलीया या देशाचे राष्ट्रीय परराष्ट्र धोरण चीनविरोधात आहे.त्यामुळे राष्ट्रीय धोरणाविरूद्ध राज्याचे धोरण कसे जावू शकते? यावर आँस्टोलीया देशात बराच वादंग झाला. ज्याची परीणीती आँस्टोलिया या देशाने राष्ट्रीय धोरण महत्तवाचे मानत याला रद्द केले .व्हिटोरीया या राज्याचा प्रिमियरने  ( आपल्या मुख्यमंत्री समकक्ष) पहिले मला राज्याचा विकास करण्यासाठी निवडले आहे. असे कारण देत याचे समर्थन केले होते. मात्र पुढे राष्ट्रीय निती मुख्य मानून हा करार रद्द केला.
चीन आपला प्रमुख शत्रू आहे. त्याविषयी आपणास माहिती असणे आवश्यक आहे. माझा त्यासाठीचा हा छोटासा प्रयत्न होतो, जो आपणाला आवडला असेल, असे मानून सध्यापुरती आपली रजा घेतो, नमस्कार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?