जागतिक पुस्तक दिन विशेष !


आज 23 एप्रिल अर्थात  जागतिक पुस्तक दिन, त्यानिमित्ताने सर्व पुस्तक प्रेमींना मनःपूर्वक शुभेच्छा
इंग्रजी साहित्यातील एक महान साहित्यीक शेक्सपियर  याचा स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो आज या साहित्यकाराची जयंती(Birth anniversary ) आणि पुण्यस्मरण (Death anniversary )दिवस सुध्दा
     आजकाल पुस्तकाची परीभाषा अनेकार्थाने बदललली आहे. आता आता पर्यत मराठी भाषेत न आढळणारा आँडिओ बूक हा प्रकार आता मराठीत चांगलाच रुळला आहे.अनेक अँप त्यासाठी वापरली जात आहे.येत्या काही दिवसात प्रिंट आँन डिमांड मुळे पारंपारीक पुस्तकाची दूकानांचे स्वरुप पुर्णतः बदलून जाईल, मात्र पुस्तकाचे महत्व कमी होणे अशक्य. मध्यंतरी समाजमाध्यमांवर बराच रुळलेला मात्र कायदेशीर नसणारा प्रकार म्हणजे पुस्तकाचा पिडीएफ फाईल, हे सुद्धा पुस्तकाचे एक  साधनच म्हणता येवू शकते. माझ्या माहितीत असे दोन नियतकालीके आहेत, जी मला खुद्द प्रकाशकाकडूनच व्हाँटसप मार्फतच येतात, असो. किंडल सारख्या पुस्तकां
विषयीच्या गँझेटमुळे वाचताना आपल्या डोळ्याला सोइस्कर होईल, असा प्रकाश ठेवता येतो, तसेच वाचताना एखाद्या शद्बाचा अर्थ माहिती नसल्यास त्याचा अर्थ देखील समजू शकतो, तसेच कागदी पुस्तकाच्या स्वरुपात साठवल्यास ज्यास खुप जागा लागेल,असी पुस्तके अत्यंत कमी जागेत राहू शकतात.तसेच त्यांचे तेल, पाणी, वाळवी, अस्या गोष्टींपासून संरक्षण होते.  पुस्तकांसाठी बुक गंगा सारख्या वेबसाइट देखील उत्तम कार्य करत आहे.
पुस्तकांविषयी  होणाऱ्या कार्यक्रमांविषयी बोलायचे झाल्यास सध्याचा न्युज 18 लोकमत (त्यावेळचे आयबीएम लोकमत) चा अवश्य उल्लेख करावाच लागेल. पुर्वी या वृत्त वाहिनीवर दर रविवारी, "वाचाल तर वाचाल" हा पुस्तकांवर आधारित कार्यक्रम.होत असे.केतकी जोशी ह्या वृत्तनिवेदिका हा कार्यक्रम सादर करत.मात्र कालांतराने तो बंद पडला. राज्यसभा टिव्हीवर (भविष्यात याचे नामकरण संसद टिव्ही असे होणार आहे) किताबनामा हा पुस्तकांविषयी सध्या होणारा एक उत्कृष्ट कार्यक्रम आहे. ह्या दोन कार्यक्रमांचा अपवाद वगळता मला तरी पुस्तकांवर काही कार्यक्रम झाल्याचे मला माहिती नाही.
    सर्वसाधरणपणे मार्च महिन्यात दिल्लीच्या प्रगती मैदानात विश्व पूस्तक मेळा हे पुस्तकांचे  भल्लेमोठे पुस्तक प्रदर्शन भरते.(जगभरात डंका बजावणाऱ्या मराठी  भाषिकांच्या पुस्तकांचे या मेळ्यातील स्थान काय ,हे मात्र कृपया विचारू नका )जगभरातील नामवंत प्रकाशनाची पुस्तके वाचकांना हाताळता येतात.क्राँसवल्ड सारखी मोठी पुस्तकांची अनेक दूकाने पुण्यात आढळतात.(इतर महाराष्ट्रातील स्थिती विषयी मात्र कृपया विचारू नका ) आपल्याकडील मराठी साहित्य संमेलनातसुद्धा मोठ्या प्रमाणावर पुस्तक विक्री होते. जे एका उत्तम समाजाचे लक्षण म्हणता येईल.
      सध्या आपल्या मराठीचा विचार करता अनेक नवनवीन लेखकांची पुस्तके प्रसिद्ध होत आहेत. पुर्वीपेक्षा वेगळ्या विषयांवरची ,मुळची इतर भाषेतील मात्र मराठीत अनुवादीत केलेली अनेक पुस्तके प्रसिद्ध होत आहे. काही प्रकाशक अडचणीत देखील आहेत. पुस्तकांचे लेखक आणि प्रकाशक यात अनेक विषयांवर वाद देखील आहे. मात्र ही त्रासदायक परीस्थिती नक्कीच बदलेल, अशी मला आशा आहे, आणि याच आशेवर मी तूमची रजा घेतोय, नमस्कार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?